food

पोटा मध्ये होणारी जळजळ शांत करण्यासाठी 5 रामबाण उपाय

जास्त मसालेदार आणि तळलेले पदार्थ खाण्यामुळे शरीराला नुकसान पोहचते आणि सोबतच याचा पहिला दुष्परिणाम तुमच्या पाचन तंत्रावर पडतो. एसिडीटी, फूड एलर्जी, फूड पॉइजनिंग, डायरिया इत्यादी सोबतच पोटामध्ये जळजळ होण्याची समस्या देखील होऊ शकते. पोटामध्ये जळजळ होण्याचे इतर अनेक कारणे असू शकतात. ही जळजळ शांत करण्यासाठी तुम्ही काही आरोग्यदायक पेय पदार्थ पिऊ शकता. चला पाहू असे काही पेय पदार्थ जे पोटाची जळजळ शांत करण्यासाठी उपयोगी ठरते.

पोटाची जळजळ शांत करण्यासाठी आरोग्यदायक पेय

  • सौंफचे पाणी
  • पुदिना ज्यूस
  • गाजर-पुदिना ज्यूस
  • बीट ज्यूस
  • पालक आणि सैलेरीचा ज्यूस

सौंफचे पाणी

सौंफ म्हणजेच बडीशेप आरोग्यासाठी फायदेशीर असते यामुळे पोटाची जळजळ शांत होऊ शकते. सौंफच्या पाण्यामध्ये असलेली सुदिंग प्रोपर्टीज पोटाची जळजळ शांत करतो. यासाठी रात्रभर सौंफ पाण्यात भिजत ठेवा आणि सकाळी या पाण्यास गाळून उकळवून घ्या आणि थंड करून सेवन करावे हे फायदेशीर राहील.

पुदिना ज्यूस

पुदिन्यामध्ये मिन्थॉल असते जे थंडावा देते. पुदिना ज्यूस पोटाची जळजळ शांत करण्यासाठी फायदेशीर असतो. यास बनवण्यासाठी पुदिना बारीक वाटून त्याचा रस काढावा आणि त्यामध्ये मध आणि लिंबू मिक्स करावा आणि सेवन करावे. याच्या सेवनामुळे पोटाची जळजळ आणि जीव घाबरणे शांत होते.

गाजर-पुदिना ज्यूस

गाजर आरोग्यासाठी फायदेशीर असते याचा ज्यूस फक्त शरीरासाठी फायदेशीर असते असे नाही तर पोटाच्या जळजळीला कमी करण्यासाठी देखील उपयोगी ठरतो. गाजर आणि पुदिना मिक्स करून त्याचा ज्यूस पिण्यामुळे आरोग्यास लाभ मिळतात.

बीट ज्यूस

बीट हे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. यामध्ये असलेले एंटी-ऑक्सीडेंट्स आरोग्यासाठी फायदेशीर असते सोबतच यामध्ये सूदिंग प्रोपर्टीज पण असतात. याचे सेवन केल्याने पोटाची जळजळ कमी होते.

पालक आणि सैलेरीचा ज्यूस

या ज्यूस मध्ये पोषक तत्व असतात जे शरीरासाठी लाभदायक असतात. सोबतच पचन तंत्रावर सूदिंग इफेक्टस टाकतात. पोटास थंडावा देण्यासाठी पालक, सैलेरी आणि पुदिना पाने मिक्स करून ज्यूस बनवा आणि दिवसातून दोन वेळा सेवन करा.


Show More

Related Articles

Back to top button