या अभिनेत्रीच्या ड्रेसमुळे गुगल ने ‘गुगल इमेज सर्च’ हा ऑप्शन देणे सुरु केले होते हे तुम्हाला माहीत आहे का?

शुक्रवारी हॉलिवूड ऐक्ट्रेस जेनिफर लोपेज ने मिळणं फैशन वीक मध्ये सगळ्यांची मने जिंकली. यादरम्यान तिने एक जंगल ड्रेस परिधान केला होता. या अगोदर देखील जेनिफर ने 2000 साली देखील ग्रॅमी अवार्ड्स दरम्यान काहीसा असाच ड्रेस परिधान केला होता.

परंतु या ड्रेस बद्दल चर्चा करण्या मागचे कारण समजल्यावर तुम्हाला आश्चर्य होईल. कारण हि गोष्ट अत्यंत कमी लोकांना माहीत आहे कि जेनिफरच्या याच ड्रेस मुळे गुगल इमेजची सुविधा गुगल ने देणे सुरु केले होते.

खरंतर याच दरम्यान जेनिफरचा ड्रेस पाहण्यासाठी अनेक लोकांनी यास इंटरनेट वर सर्च केलं होत. तेव्हा Google ने ठरवलं कि आता पासून गुगल इमेज हे वेगळे ऑप्शन लोकांना देण्यात यावे.

19 वर्षांनी पुन्हा जेव्हा जेनिफर लोपेज ने असाच ड्रेस परिधान करून रॆम्प वॉक केला तेव्हा अनेकांच्या जुन्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या. या ड्रेस ने लोकांमध्येच एक इतिहास निर्माण केला नाही तर याने गुगल च्या इतिहासात देखील जागा मिळवली.