astrology

वाईट नशिब देखील चमकू शकते या 5 उपायाने, 3 सप्टेंबरला करा

दरवर्षी गोकुळाष्टमी मोठ्या उत्साहात आपण साजरी करतो. हा दिवस भगवान श्रीकृष्णाची कृपा मिळवण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो. यादिवशी केलेले काही सोप्पे उपाय बिघडलेल्या नशीब सुधारू शकतात. यावर्षी 3 सप्टेंबर सोमवार रोजी  गोकुळाष्टमी आहे. भगवान श्रीकृष्णाची कृपा मिळवण्यासाठी खाली काही उपाय आहेत जे तुम्ही करू शकता.

तुळशीची पूजा करणे

भगवान श्रीकृष्णाच्या पूजे मध्ये तुळशीला विशेष महत्व आहे. त्यामुळे जन्माष्टमीच्या दिवशी तुळशी समोर गायीच्या तुपाचा दिवा लावावा आणि ॐ वासुदेवाय नमः मंत्र बोलताना 11 प्रदक्षिणा करा. या उपायाने घरामध्ये सुख-शांती राहील आणि कोणत्याही प्रकारचे संकट येणार नाही.

खिरीचा नैवेद्य

धनाची इच्छा असलेल्या लोकांनी जन्माष्टमीच्या दिवशी कोणत्याही कृष्ण मंदिरात जावे आणि पांढरी मिठाई किंवा खिरीचा नैवेद्य द्यावा. त्यामध्ये तुळशीची पाने आवश्य टाकावीत. यामुळे भगवान श्रीकृष्ण लवकरच प्रसन्न होतील.

 

गरजू लोकांना दान करा

भगवान श्रीकृष्णाला पितांबरधारी देखील म्हणतात, ज्याचा अर्थ पिवळे वस्त्र धारण करणारा. जन्माष्टमीच्या दिवशी पिवळे कपडे, पिवळे फळ आणि पिवळ्या रंगाचे धान्य पहिले भगवान श्रीकृष्णाला अर्पण करा, यानंतर या सर्व वस्तू गरीब आणि गरजू लोकांना दान करावे.

पिंपळाला जल अर्पण करा

जर तुम्ही कर्जाच्या जाळ्यात अडकले असाल तर पिंपळाच्या झाडाला पाणी घालावे आणि संध्याकाळी दिवा लावावा. पिंपळा मध्ये देवाचा वास असतो असे मानले जाते. या उपायाने कर्ज मुक्ती लवकर होण्यास मदत होऊ शकते.

 मंत्र जप करावा

धनप्राप्तीची इच्छा असणाऱ्या लोकांनी जन्माष्टमीच्या दिवशी पुढील मंत्र ५ माळ जप करावा. ऊं ह्रीं ऐं क्लीं श्री:


Show More

Related Articles

Back to top button