viral

Breaking: पुलवामा नंतर जम्मू बस स्टैन्ड वर बस मध्ये झाला ग्रेनेड ने हल्ला, 26 लोक जखमी तर काही लोक ठार

गुरुवारी सकाळी जम्मू मध्ये एक जोरदार बस धमाका झाला, स्फोट जम्मू मधील एका बस स्टैन्ड वर झाला. स्फोटाची खबर मिळताच जम्मू कश्मीर पोलीस घटना स्थळी पोहचली आणि पूर्ण परिसराला ताब्यात घेतले. हा स्फोट गर्दीच्या जागी झालेला आहे. स्फोटा नंतर परिसरामध्ये धावपळ झाली. स्फोटामध्ये २६ लोक जखमी झाल्याची बातमी आहे, सूत्रांच्या अनुसार जखमींना हॉस्पिटल मध्ये उपचार देण्यात येत आहे.


सकाळी 11.30 वाजता झाला स्फोट

सकाळी 11:30 वाजता स्फोट झाला. राज्य परिवहनच्या एका बस मध्ये हा स्फोट झाला आणि स्फोटाच्या वेळी बस जम्मू मधील एका बस स्टैन्ड वर उभी होती. जखमींना जम्मू मेडिकल कॉलेज मध्ये एडमिट केले आहे जेथे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. ज्या बस वर हल्ला झाला त्यामध्ये जवळपास 12 ते 15 लोक बसले होते, तर पोलिसांना ग्रेनेड हल्ल्याची शक्यता वाटत आहे.

हाई अलर्ट लागू

पुलवामा हल्ल्या नंतर 14 फेब्रुवारी पासून जम्मू-कश्मीर मध्ये हाई अलर्ट लागू आहे. पुलवामा हल्ल्या नंतर असे इनपुट आले होते कि ज्यामध्ये शक्यता सांगण्यात आली होती कि अजून एक हल्ला केला जाऊ शकतो. त्यामुळे पूर्ण राज्यात सुरक्षा वाढवण्यात आली होती. आपल्या माहितीसाठी 14 फेब्रुवारी रोजी पुलवामा मध्ये सीआरपीएफ च्या बस वर हल्ला झाला होता ज्यामध्ये 40 पेक्षा जास्त जवान शहीद झाले होते. हा हल्ला जैश-ए-मोहम्मद या आतंकवादी संघटनेने केला होता.


Show More

Related Articles

Back to top button