inspirationPeople

भारताच्या कारगिल विजयात काय होती इस्राईलची भूमिका, कशी निभावली होती इस्राईलने भारता सोबतची मैत्री

इस्राईल आणि भारत हे फार जुने मित्र राष्ट्र आहेत. कारगिलच्या युद्धात देखील इस्राईलने भारताची मदत केली होती. 1999 मध्ये जेव्हा दहशतवाद्यांच्या रुपात जेव्हा पाकिस्तानी जवान कारगिल आणि द्रास सेक्टर मध्ये घुसले होते त्यावेळी भारताने ऑपरेशन विजय केले होते. भारतीय जवानांना अशी ट्रेनिंग नव्हती की ते डोंगर आणि उंच ठिकाणाला लढा देऊ शकतील.

 

पाकिस्तानी सैन्य त्यावेळी उंच भागावर होते आणि भारताला याची माहीती नव्हती की पाकिस्तानचे सैन्य नेमके कुठे आहे. तर दुसरीकडे त्यांच्या फायटर जेट आणि सैन्याची इन्फोर्मेशन काढणे अवघड झाले होते. त्यानंतर भारताने इस्राईलची हेल्प मागितली होती.

इस्राईलकडे हेल्प मागताक्षणीच इस्राईलने कारगिल सेक्टरमध्ये घुसखोरीविरोधात प्लान बनवण्यास सुरुवात केली. इस्राईलच्या सैन्याकडे याबाबतचा पूर्ण अनुभव आणि तंत्रज्ञान दोन्ही आहे. बोर्दरवर कंट्रोल, काउंटर टेरेरिज्म आणि लिमिटेड वॉरमध्ये त्यांच्या एवढे प्रभावी आणि अचूक जगात कोणीही नाही.

एकीकडे अमेरिका इस्राईलवर दबाव टाकत असून सुध्दा इस्राईलने आपल्या मैत्रीचे कर्तव्य पार पाडले आणि इस्राईलने कारगिलच्या अगोदर ऑर्डर केलेले शस्त्रे ताबडतोब भारताला पोहोचवली. हेरोन आणि सर्चर सारखे ड्रोन जे उंचावरून निरीक्षण करतात आणि शत्रू नेमका कोठे आहे याची माहीती देतात ते भारताला पुरवले.

इस्राईल एवढ्यावरच थांबला नाहीतर त्याने मिलिट्री सॅटेलाइट्सवरुन इमेजेस पाठवली. तर बोफोर्स फिल्ड गनसाठी आवश्यक असलेल्या गोळ्या आणि हत्यार देखील पुरवली. रनभूमीत मिराज 2000H फायटरसाठी इस्राईलने लेजर गायडेड मिसाईल देखील पुरवली. युध्दाच्या अशा नाजूक आणि आवश्यक प्रसंगी इस्राईलने भारताला मदत करून इस्राईल भारताचा खरा मित्र आहे हे सिद्ध केले होते.

लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका

वाचा : 21 व्या वर्षी घरदार सोडले बनली साध्वी, आज फक्त आवाज ऐकण्यासाठी येतात लाखो लोक


Show More

Related Articles

Back to top button