celebritiesinspirationPeople

या भारतीय वीरांगनेवर भारतच नाही तर पाकिस्तान सुध्दा अभिमान करतो

22 वर्षाची होती ती मुलगी. वयाच्या या उंबरठ्यावर जेथे बालपण आणि तरुणपण यामध्ये संतुलन बनवण्याच्या प्रयत्नात अनेक प्रश्न, जिम्मेदारी, समजदारी आणि अजून बरेच काही डोक्यात असते. पण ही तरुणी काही वेगळीच होती. 31 वर्षापूर्वी 5 सप्टेंबर 1986 साली तिच्या वाढदिवसाच्या 23 तास अगोदर तिच्या डोक्यात एकच विचार होता आणि तो म्हणजे 400 लोकांचा जीव वाचवने.

आतंकवाद्यांकडून हाईजैक केले गेलेल्या विमानात संघर्ष करताना तीने आपले प्राण गमावले पण विमानात असलेल्या प्रवाश्यांचे प्राण वाचवले. तिच्या या असाधारण साहस आणि बलिदाना बद्दल तिला देशाचा सर्वोच्च वीरता सम्मान “अशोक चक्र” देऊन सम्मानित करण्यात आले. ती फौजी नव्हती ना कोणी सोशल वर्कर, तिच्याकडे कोणतेही हत्यार नव्हते आणि नाही आतंकवाद्याचा सामना करण्याचे ट्रेनिंग. ती तर फक्त पैन एम 73 फ्लाईट क्रू मेंबर होती.

7 सप्टेंबर 1963 साली चंदीगड मध्ये जन्मलेली निरजा भनोट घरात सर्वात लहान होती. आपले आईवडील आणि दोन मोठ्या भावंडांची लाडकी निरजाला सर्व प्रेमाने लाडोम्हणत. एका सामान्य मध्यम वर्गीय कुटुंबात जन्मलेल्या निरजाचे वडील हरीश भनोट मुंबई मध्ये पत्रकार होते. तसेच निरजा पैन एम मध्ये लागण्या अगोदर मॉडेलिंग करायची तीने बिनाका टूथपेस्ट, विको, गोदरेज डिटर्जेट इत्यादीच्या जाहिराती मध्ये काम केले होते.

निरजाचे साहस

5 सप्टेंबर 1986 मध्ये पैन एम 73 फ्लाईट मुंबई ते न्युयार्क जात होती. प्लेन मध्ये 361 प्रवासी होते आणि 19 कर्मचारी. हे विमान मुंबई ते कराची आणि तेथून ते फ्रेंकफर्ट मार्गे न्युयार्कला जाणार होते. पण कराची मध्ये जिन्ना एयरपोर्ट मध्ये फिलीस्तिन चे अबू निदाल ऑर्गनायझेशनचे चार आतंकवादी हत्यार घेऊन सिक्युरिटी गार्डच्या वेशात विमानात घुसले आणि गोळीबार करत फ्लाईट हाइजैक केली. विमानात भारतीय, पाकिस्तानी, ब्रिटीश आणि अमेरिकन प्रवाशी होते. प्लेन मध्ये नीरजा सर्वात सिनियर फ्लाईट अटेंडेंट होती. फ्लाईट हाईजैक झाल्याची बातमी तिला पायलट ला द्यायची होती पण तेवढ्यात आतंकवाद्यांनी तीचे केस पकडून तिला ओढले पण तीने कोडीग भाषेत ओरडून सूचना कॉक पीट पर्यंत पोहचवली. सूचना मिळताच पायलट, सह-पायलट आणि फ्लाईट इंजीनियर सुरक्षित निघून गेले.

आता सर्व प्लेन ची जबाबदारी निरजावर होती. सर्व प्रवाश्यांचे जीव धोक्यात होते. आतंकवाद्यांनी निरजाला सर्व प्रवाश्यांचे पासपोर्ट जमा करायला सांगितले जेणे करून त्यांना सर्वांची नागरिकता ओळखता येईल. त्यांचे प्रमुख निशाण्यावर अमेरिकन प्रवाशी होते. नीरजाने आपल्या बुद्धीचातुर्याची झलक दाखवत तीने त्या नागरिकांचे पासपोर्ट लपवले. 41 अमेरिकन प्रवाश्याच्या पैकी 2 मारण्या मध्ये आतंकवाद्याना यश आले. आतंकवादी पायलटची मागणी करत होते जेणे करून ते त्यांना पाहिजे तेथे विमान घेऊन जाऊ शकतील पण पाकिस्तानी सरकारने मागणी मान्य केली नाही. एक ब्रिटीश प्रवाश्याला विमानाच्या दरवाजावर आणून मारण्याची धमकी देण्यात आली पण निरजाने आतंकवाद्याशी बोलून कसेबसे त्याची सुटका केली.

17 तास विमान चालू राहिल्यामुळे विमानाचे इंधन संपले आणि विमानात अंधार झाला. या अंधाराचा फायदा उचलत हाईजैकर्स अंधारात गोळीबार करू लागले. तर नीरजाने मौका मिळताच विमानाचे संकटसमयीचे दरवाजे उघडले आणि प्रवाशांना बाहेर काढू लागली. ती स्वता सुध्दा बाहेर जाऊ शकत होती पण माणुसकीच्या नात्याने ती जास्तीत जास्त प्रवाश्याचा प्राण वाचवू इच्छित होती. तीने सर्व प्रवासी बाहेर काढल्या नंतर शेवटी 3 लहान मुलांना बाहेर काढण्यासाठी तिला थोडा वेळ लागला. पण शेवटी त्यांनाही सुखरूप बाहेर काढले. निराजाने मरण्यापूर्वी 360 लोकांचे प्राण वाचवले होते. आतंकवादी 20 लोकांना मारण्यात यशस्वी झाले होते. यानंतर पाकिस्तानी सेनेने चार पैकी तीन आतंकवादी मारले तर एक पळून जाण्यात यशस्वी झाला.

निराजाच्या या साहसा बद्दल भारत सरकारने अशोक चक्र हर पदक देऊन सन्मानित केले. अशोक चक्र मिळवणारी ती सर्वात तरुण नागरिक होती. तर पाकिस्तानी सरकारने तिला पाकिस्तानचा सर्वोच्च सन्मान “तमगा-ए-इंसानियत” दिले. हा सन्मान मिळवणारी ती एकमेव भारतीय आहे.


Show More

Related Articles

Back to top button