Breaking News

का काही लोक श्रीमंत होतात, तर काही लोक कायम गरीबच राहतात, लक्ष्मी माते ने इंद्र देवाला सांगितले या बद्दल

माता लक्ष्मी ही संपत्तीची देवी मानली जाते. लक्ष्मी मातेची उपासना केल्याने गरिबी दूर होते आणि माणसाला कधीही पैशाची कमतरता भासत नाही. तरी सुद्धा असे बरेच लोक आहेत जे लक्ष्मी मातेची पूजा करतात, परंतु त्यांच्या जीवनात पैशाची कमतरता असते आणि ते नेहमीच गरीब असतात.

असे का असते कि माता लक्ष्मी काही लोकांच्या जीवनात धन वर्षा करते आणि काही लोकांना नेहमी गरीब ठेवते? हा प्रश्न बर्‍याच लोकांच्या मनात येतो. शास्त्रानुसार एकदा इंद्रदेवच्या मनात असा प्रश्न आला की कोणी श्रीमंत राहतात आणि कोणी गरीब चे गरीबच राहतात? आपल्या प्रश्नाचे उत्तर मिळण्यासाठी इंद्रदेव माता लक्ष्मीकडे गेले.

लक्ष्मी माता आणि इंद्रदेव यांची कथा

लक्ष्मी मातेकडे जाऊन इंद्रदेव तिला म्हणाले, आई, तुला संपत्तीची देवी म्हटले जाते. जे तुझी उपासना करतात त्यांच्यावर तू कृपा करतेस. परंतु काही लोक तुमची उपासना करुन देखील गरीब का राहतात? तुम्ही अशा लोकांच्या घरात का विराजमान होत नाहीत?

इंद्रदेव यांचा हा प्रश्न ऐकून लक्ष्मी माता म्हणाली, जे लोक माझी उपासना करतात त्यांच्यावर मी कृपा करते हे खरे आहे. परंतु अशी पुष्कळ लोक आहेत जे माझी उपासना करतात. पण तरीही माझी कृपा त्याच्यावर नाही होत. ज्यामुळे ते गरीब राहतात.

लक्ष्मी माते ने इंद्रदेव यांना सांगितले की प्रत्येक माणूस त्यांच्या कर्मामुळे गरीब आणि श्रीमंत बनला आहे. म्हणूनच ज्यांचे कर्म वाईट आहेत अशा लोकांनी कितीही पूजा केली तरी, त्यांना त्याचे फळ मिळत नाही. अश्या प्रकारे मी त्यांच्या घरात कधीही वास करत नाही. जिथे नेहमी भांडण होते. ज्या लोकांच्या घरात नेहमी क्लेश असतो. त्यांनी कितीही पूजा केली तरी मी त्यांच्या घरात विराजमान होऊ शकत नाही. मला फक्त अशाच घरात राहायला आवडेल जेथे शांती असेल.

मन स्वच्छ नसते

काही लोक माझी उपासना करतात. पण त्यांचे मन स्वच्छ नाही. म्हणूनच, मी त्याच्या पूजेमुळे समाधानी होत नाही आणि त्याच्या आयुष्यात धन येत नाही. लक्ष्मी मातेने इंद्रदेवला सांगितले की एखाद्या व्यक्तीने माझी कितीही पूजा केली तरी अश्या  शकत नाही जेथे अशांती आहे. पण जिथे शांतता आणि आनंद आहे तेथे कुटुंबातील लोक एकत्र राहतात. मी फक्त त्या घरातच राहू शकेन. त्याचप्रमाणे, स्त्रियांचा अपमान करणार्‍यांच्या आयुष्यात नेहमीच पैशाचा अभाव असतो. काही लोक अन्नाचा देखील अपमान करतात, यामुळे मी त्यांच्या घरात वास करत नाही.

म्हणून, ज्या लोकांना मला त्यांच्या घरात विराजमान करण्याची इच्छा आहे अशा लोकांनी माझी उपासना करण्याबरोबरच स्त्रीचा आदर केला पाहिजे. अन्नाचा नेहमी आदर करा. घरात शांतता ठेवा, मनापासून कार्य करा आणि वाईट कृत्ये कधीही करु नका. जो या गोष्टींची काळजी घेतो आणि दर शुक्रवारी माझी उपासना करतो, त्याच्या जीवनात कधीही धनाची कमी होत नाही.

देवी लक्ष्मीची ही चर्चा ऐकल्यानंतर, इंद्रदेवला समजले की आई तिथेच राहू शकते जेथे शांती असते. ज्या लोकांचे मन खरं असते त्यांच्यावर लक्ष्मी मातेची कृपा होते. त्याच वेळी, ज्यांच्या कृती वाईट आहेत अशा लोकांच्या जीवनात नेहमीच दारिद्र्य असते.

जर तुम्हाला माता लक्ष्मीला प्रसन्न करायचे असेल तर वरील गोष्टी लक्षात ठेवा. सोबतच माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी खालील उपाय करू शकता.

  • आई लक्ष्मीला कमळाची फुले खूप आवडतात. म्हणून त्यांची पूजा करताना त्यांना कमळाची फुले अर्पण करा.
  • भगवान विष्णू आणि आई लक्ष्मी पिंपळाच्या झाडावर राहतात. म्हणून तुम्ही या झाडाचीही पूजा केली पाहिजे.
  • गोरगरीब लोकांना अन्नदान करा.
  • शुक्रवारी उपवास करा आणि लक्ष्मी मातेची कथा देखील वाचा.

लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी त्यांची पूजा अर्चना करण्या सोबत घरातील वातावरण शांत असणे, कोणताही वादविवाद न करणे, घरा मध्ये स्वच्छता आणि सुंदरता असणे, स्त्रियांचा सन्मान करणे, लहान मोठ्यांचा योग्य तो आदर करणे आवश्यक आहे अश्या घरात राहणाऱ्या लोकांवर माता लक्ष्मी आपली कृपा करते.

About Marathi Gold Team