Connect with us

मुसलमानांच्या हातात कोणत्या दोन गोष्टी असाव्यात असे मोदींना वाटते पहा

Celebrities

मुसलमानांच्या हातात कोणत्या दोन गोष्टी असाव्यात असे मोदींना वाटते पहा

‘दहशतवादाशी मुकाबला करण्यास भारत सक्षम आहे,’ असं सांगतानाच ‘मुसलमानांच्या एका हातात कुराण आणि दुसऱ्या हातात कॉम्प्युटर असावं असं आम्हाला वाटतंय,’ असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्पष्ट केलं.

दिल्लीत ‘इस्लामिक स्कॉलर कॉन्फरन्स’ला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे विधान केलं. या परिषदेला जॉर्डनचे राजे अब्दुल्ला दुसरे यांच्यासह अनेक देशांचे इस्लामिक विद्वान उपस्थित होते.

जगभरातील धर्म भारताच्या मातीत रुजले आणि वाढले याचा आम्हाला अभिमान असल्याचंही मोदी म्हणाले. दहशतवादाची लढाई कोण्या एका पंथाविरोधात नाही, असं सांगतानाच इथे रमजानही साजरा होतो आणि होळी सुद्धा, असं मोदी यांनी सांगितलं.

जगभरातील धर्म भारताच्या मातीत रुजले आणि वाढले त्याचा आम्हाला अभिमान आहे. बुद्ध असो वा महात्मा गांधी त्यांनी दिलेला शांतीचा संदेश इथूनच जगाच्या कानाकोपऱ्यात गेला आहे.

जॉर्डनच्या पवित्र भूमीतूनच पैगंबर आणि संतांचा आवाज जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला.

सर्वांना सोबत घेऊनच विकास साधला जावा ही भारताची भूमिका आहे आणि तसा प्रयत्न आम्ही करत आहोत.

आपला वारसा आणि विविध धर्मांचे संदेश याच्या बळावरच आपण दहशतवादाचा सामना करू शकतो.

मानवतेवर हल्ला केल्याने धर्माचंच नुकसान होतं, हे हल्लेखोरांना कळत नाही.

लोकशाही म्हणजे केवळ एक व्यवस्था नाही, तर समता, विविधता आणि सामंजस्याचं ते मूळ आहे.

आमच्या सामाजिक विविधतेचा आम्हाला अभिमान आहे.

भारत म्हणजे ‘वसुधैव कुटुम्बकम’चं अप्रतिम उदाहरण आहे.

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top