Uncategorized

भारतीय टीम मधील हे सुपरस्टार शाळेत सुपरफ्लॉप

भारतीय टीमचा कर्णधार फलंदाजीत तिन्ही प्रकारात अव्वल आहे. त्याने एका मागून एक अनेक विक्रम मोडून काढले आहेत. क्रिकेटच्या प्रॅक्टिसला त्याने वयाच्या अकराव्या वर्षीच सुरूवात केली. त्याने जेमतेम 12 वी पर्यंतच आपले शिक्षण घेतलं आहे.

भारतीय टीमचा माजी कर्णधार आणि विकेटकिपर महेंद्रसिंग धोनी त्याच्या कारकिर्दीतील चौथा वर्ल्ड कप खेळाला आहे. त्याच्या नेतृत्वाने भारताला 2011 वर्ल्ड कप जिंकून दिला. क्रिकेटमध्ये उत्तम फिनिशर म्हणून त्याला ओळखले जाते. पण महेंद्रसिंह धोनी या खेळाडूला त्याचं 12 वी नंतरचं शिक्षण मात्र पूर्ण करता आलं नाही.

वर्ल्डकपमध्ये उपकर्णधारपदाची जबाबदारी असलेला रोहित शर्मासुद्धा 12 वी पर्यंतच शिकला आहे. 12 वी नंतर त्याने शिक्षणा ऐवजी क्रिकेट वर आपले लक्ष केंद्रित केले.

भारताचा सलामीवीर शिखर धवन याने इंटरपर्यंत शिक्षण घेतले आहे. त्याचे मन अभ्यासात रमत नसे आणि क्रिकेटमधून त्याला वेळही देता येत नसे. त्यामुळे इंटर पर्यंत शिक्षण झाल्यावर त्याने शिक्षणाला रामराम ठोकला.

भारतीय टीम मध्ये दोन पदवीधर खेळाडू आहेत त्यापैकी एक केएल राहुल. हा खेळाडू शाळेत अभ्यासामध्ये देखील हुशार होता. केएल राहुलने वाणिज्य शाखेतून पदवी मिळवली आहे.

हार्दिक पांड्या बद्दल तर जवळपास सगळ्यांनाच माहिती असेल कि याने आपले शिक्षण नववी मध्ये नापास झाल्या नंतर सोडून दिले आणि पूर्ण वेळ क्रिकेटकडे लक्ष दिले. क्रिकेट मध्ये हिरो असला तरी अभ्यासामध्ये मात्र हार्दिक झीरो होता.

भारताच्या गोलंदाजी मधील प्रमुख अस्त्र असलेला भुवनेश्वर कुमार लहानपणा पासून क्रिकेटचा चाहता होता. त्यामुळे त्याला अभ्यास हा नकोसा वाटत असे. भुवनेश्वरने उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यावर कॉलेज मध्ये एडमिशन घेतलेच नाही.

केदार जाधव हा उच्चशिक्षित कुटुंबातील आहे त्याच्या तीन बहिणी इंजिनिअरिंग, एमबीए आणि पीएचडी झालेल्या आहेत. पण केदार जाधव याने नववीमध्येच शाळेला रामराम केला.

जसप्रीत बुमराहची आई शिक्षिका होती आणि याला क्रिकेटचे एवढे वेड होते की त्यास शाळेत जाण्याची इच्छा देखील होत नसे. पण तरीही आईने तगादा लावल्यामुळे हायस्कुल पर्यंत शिक्षण घेतले पण त्यानंतर त्याचे क्रिकेट कौशल्य पाहून कुटुंबीयांनी त्याला क्रिकेट खेळण्यास प्रोत्साहन दिलं.

भारताच्या गोलंदाजी मधील खास अस्त्र असलेला मोहम्मद शमी मूळचा उत्तर प्रदेशचा आहे. उत्तर प्रदेश अंडर 19 मध्ये निवड झाल्याने तो कोलकाताला गेला. त्याचे शिक्षण किती झाले आहे याची स्पष्ट माहिती मिळू शकली नाही परंतु त्याने दहावी पर्यंत शिक्षण घेतल्याचे समजते.

भारतीय संघामध्ये अष्टपैलू म्हणून निवड झालेला खेळाडू विजय शंकर मूळचा तामिळनाडू मधील आहे. भारतीय संघातील दोन पदवीधर खेळाडू मधील केएल राहुलनंतर विजय शंकर हा दुसरा खेळाडू आहे.

Related Articles

Back to top button