celebritiesPeople

पाण्यातील जहाजावर लादून आणले होते भारताचे पहिले विमान, असे सुरु झाले उड्डाण

15 ऑक्टोबर ही तारीख भारतीय एविएशन इंडस्ट्रीसाठी महत्वाची आहे कारण याच दिवशी भारताच्या पहिल्या कमर्शियल फ्लाईटची सुरुवात झाली होती. आता हे तर सर्वांना माहीत आहेच की भारतातील एविएशन इंडस्ट्रीची सुरुवात भारतातील सर्वात मोठे औद्योगिक घराणे टाटा यांनी केली होती. भारताचे हे पहिले विमान चक्क पाण्यातील जहाजावर लादून आणण्यात आले होते.

एवढेच नाही तर खुद्द JRD टाटा यांनी पहिली फ्लाईट स्वता चालवली होती. पहिले उड्डाण कराची (आता पाकिस्तान मध्ये आहे) ते बॉम्बे (आता मुंबई) असे होते. पहिल्या फ्लाईट मध्ये केवळ दोन प्रवासी होते आणि ही एक मेल सर्विस होती.

JRD यांचे बालपण पेरीस मध्ये गेले होते आणि तेथे त्यांनी पायलेटचे प्रशिक्षण घेतले होते. त्यामुळे त्यांनी मुंबई मध्ये देशातील पहिल्या फ्लाइंग क्लब मध्ये आनंदाने ज्वाइनिन्ग केले आणि 1929 मध्ये भारताचे पहिले ट्रेंड पायलट चे सर्टिफिकेट मिळवले.

JRD यांना भारतात कमर्शियल सर्विस सुरु करण्याची कल्पना Nevill Vintcent यांना भेटल्यावर आली. नेविलकडे अनुभव होता तर JRD कडे भांडवल त्यामुळे सुरु झाली टाटा एयरलाइन्स. त्यावेळी कराची ते मद्रास आणि त्रिवेन्द्रम सारख्या लांबच्या शहरात डाक सेवा पोहचण्यासाठी फार दिवस लागायचे. त्यामुळे नेविल ने आपल्या अनुभवा नुसार मेल सर्विस सुरु करण्यावर भर दिला. त्यांना माहीत होते की मेल सर्विसमुळे टाटा एयरलाईन्स ला फायदा देईल. अश्या प्रकारे सुरु झाली भारतातील एविएशन इंडस्ट्री.

टाटा एयरलाईन्सचे पहिले उड्डाण 15 सप्टेंबर 1932 मध्ये होणार होते पण मुंबईतील रनवे चिखलामुळे खराब झाला होता त्यामुळे रनवे सुकण्यासाठी एक महिना गेला आणि 15 ऑक्टोबर 1932 या दिवशी टाटा एयरलाईन्सचे पहिले उड्डाण झाले होते.

टाटा एयरलाईन्सने आपल्या पहिल्या वर्षात 60 हजार नफा मिळवला होता. तर 155 प्रवासी आणि 10 टन मेल ची वाहतूक केली होती. 1937 पर्यंत कंपनीने 6.5 लाख नफा कमवला होता. पण भारत स्वातंत्र झाल्यावर सरकारने टाटा एयरलाइन्सचे अधिग्रहण केले आणि आता आपण यास एयर इंडिया नावाने ओळखतो.


Show More

Related Articles

Back to top button