moneyPeople

आठवी पास व्यक्ती देखील सुरू करू शकतो घरात किंवा दुकानात पोस्ट ऑफिस , होईल बंपर कमाई

जर तुम्ही कमीत कमी आठवी पास असाल आणि रोजगाराच्या शोधात फिरत असाल तर पोस्ट ऑफिसच्या मदतीने आपला बिजनेस सुरु करू शकता. डाक विभागाने पोस्टल फ्रेंचाइजी स्कीम सुरु केली आहे, ज्यामुळे बंपर कमाई होऊ शकते.

50 हजाराची कमाई 

तुम्ही अश्या जागी पोस्ट ऑफिस सुरु करू शकता जेथे ही सुविधा नाही आहे. ही जागा गाव, वस्ती किंवा लहान मोठ्या शहारा मध्ये देखील असू शकते. या पोस्ट ऑफिस मधून लोक दार महिन्यास साधारणतः 50 हजार रुपये कमाई करू शकतात. तर पोस्ट ऑफिस सुरु करण्यासाठी फक्त 5 हजार रुपये जमानत म्हणून जमा करावे लागतात.

पोस्ट ऑफिसच्या या प्रोडक्ट्सची विक्री करू शकता 

पोस्ट ऑफिसची फ्रेंचाइजी घेणारा व्यक्ती ज्या प्रोडक्ट्सला विकू शकतो त्यामध्ये डाक आणि रेवेन्यू तिकीट, स्पीड पोस्टची बुकिंग, रजिस्ट्री, मनी ऑर्डर, पोस्टल लाइफ इंश्युरन्स, डिपार्टमेंटच्या मार्फत बिल, टैक्स इत्यादी शामिल असेल.

घरामध्ये देखील सुरु करू शकता बिजनेस 

इंडिया पोस्ट ने लोकांच्या सुविधेसाठी सांगितले आहे कि दुकान नसल्यास लोक आपल्या घरातून देखील अश्या प्रकारची फ्रेंचाइजी सुरु करू शकतात. यासाठी फ्रेंचाइजी घेणाऱ्या व्यक्तीच्या घरामध्ये एवढी जात असली पाहिजे जेथे ती व्यक्ती अश्या प्रकारची फ्रेंचाइजी सहज ऑपरेट करू शकेल आणि पब्लिक ला देखील कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही.

आपल्या सोयी प्रमाणे सेट करू शकता टाइम 

इंडिया पोस्ट ने सांगितले आहे कि फ्रेंचाइजी घेणाऱ्या व्यक्तीने पूर्ण दिवसात आपल्या वेळे अनुसार 24 तासात कधीही यास ऑपरेट करण्याची सवलत दिलेली आहे. यासाठी नॉर्मल पोस्ट ऑफिसच्या वेळेचे बंधन पाळण्याची गरज नाही.

हे लोक सुरु करू शकतात फ्रेंचाइजी 

इंडिया पोस्ट ने व्यक्तीं सोबतच पानवाला, किराणा दुकान, स्टेशनरी शॉप, छोटे दुकानदार, कॉर्नर शॉप शामिल आहेत. यासाठी व्यक्तीचे वय 18 वर्षा पेक्षा जास्त आणि किमान आठवी पास असावे. परंतु व्यक्तीला कॉम्प्युटरचे बेसिक नॉलेज असले पाहिजे.

ही आहे पूर्ण प्रोसेस 

फ्रेंचाइजी मिळवण्यासाठी सगळ्यात पहिले फॉर्म भरून सबमिट करावे लागेल.

सिलेक्शन झाल्यावर इंडिया पोस्ट सोबत एक एमओयू साइन करावे लागेल.

फ्रेंचाइजी घेण्यासाठी इंडिया पोस्ट मिनिमम क्वालिफिकेशन 8 वी पास असण्याची अट ठेवली आहे.

व्यक्तीचे कमीत कमी वय 18 वर्ष असले पाहिजे.

कसे चालते काम 

पोस्ट ऑफिस च्या फ्रेंचाइजी मध्ये कमाई कमीशन मधून होते. यासाठी पोस्ट ऑफिस कडून मिळणाऱ्या प्रोडक्ट्स आणि सर्विस दिल्या जातात. या सगळ्या सर्विस वर कमीशन दिले जाते.

रजिस्टर्ड आर्टिकल्सच्या बुकिंग वर 3 रुपये.

स्पीड पोस्ट आर्टिकल्सच्या बुकिंग वर 5 रुपये.

100 ते 200 रुपयांच्या मणी ऑर्डर बुकिंग वर 3.50 रुपये.

200 रुपया पेक्षा जास्त मनी ऑर्डर वर 5 रुपये.

दर महिन्याला रजिस्ट्री आणि स्पीड पोस्टच्या 1000 पेक्षा जास्त बुकिंग वर 20 टक्के अतिरिक्त कमीशन.

पोस्टेज स्टॅम्प, पोस्टल स्टेशनरी आणि मनी ऑर्डर फॉर्मच्या विक्री वर सेल अमाउंटच्या 5 टक्के.

रेव्हेन्यू स्टॅम्प, सेंट्रल रिक्रुटमेंट फी स्टॅम्प्स च्या विक्री सह रिटेल सर्वीसेज वर पोस्टल डिपार्टमेंटला झालेल्या कमाईच्या 40 टक्के.

अधिक माहितीसाठी तुम्ही डाक विभागाच्या

वेबसाइट https://www.indiapost.gov.in/VAS/Pages/Content/Franchise_Scheme.aspx

किंवा आपल्या जवळच्या मंडळ कार्यालय सोबत संपर्क करू शकता.

Tags
Show More

Related Articles

Back to top button