entertenment

पाकिस्तानची क्रिकेट मधून हकालपट्टी करण्यासाठी भारताने प्रयत्न सुरु केले

पुलवामा मध्ये झालेल्या हल्ल्या नंतर पाकिस्तानला क्रिकेट विश्वातून हकालपट्टी करून बाहेर काढण्यासाठी भारताने प्रयत्न सुरु केले आहेत. त्यासंदर्भात आयसीसीच्या अधिकृत मेल करण्याचे आदेश कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांना बीसीसीआयचे मुख्य अधिकारी विनोद राय यांनी दिले आहेत. भारताची मागणी पाकिस्तानला विश्वचषकातून हद्दपार करण्याची असणार आहे.

27 फेब्रुवारी ते 2 मार्च या काळात आयसीसीची बैठक त्यांच्या दुबई येथील मुख्यालयात होणार आहे. या बैठकीमध्ये भारत पाकिस्तानच्या हकालपट्टीची आपलाही मागणी मांडणार आहे. पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय कोंडी करण्याची भारताची भूमिका राहणार आहे. प्रत्येक क्षेत्रात पाकिस्तानला एकटे करून त्यांची गळचेपी करण्याचा चंग भारताने बांधला आहे. त्यापैकीच भारताचे हे एक पाऊल आहे. पाकिस्तान मध्ये देखील क्रिकेट प्रचंड लोकप्रिय खेळ आहे. त्यामुळे थेट वल्ड कप मधूनच पाकिस्तानची हकालपट्टी करण्याची मागणी केली जात आहे.

भारताच्या यामागणी मागील कारण पाकिस्तानातील दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने जम्मू-काश्मीर मधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या जो हल्ला केला होता आणि त्यामध्ये भारताचे 40 जवान शहीद झाले होते हे आहे. या दहशतवादी हल्ल्या नंतर अनेक भारतीय क्रिकेट खेळाडूंनी पाकिस्तानवर टीका केली होती. त्यामध्ये प्रमुख सौरव गांगुली, गौतम गंभीर, हरभजन सिंह, चेतन चौहान आणि मोहम्मद अजहरुद्दीन हे आहेत. यांनी पाकिस्तान सोबत क्रिकेट खेळणे बंद करण्याची मागणी केली आहे.

फक्त क्रिकेटच नाही तर सगळ्याच खेळांमधून पाकिस्तान सोबतचे आपले संबंध तोडून टाकण्याची मागणी सौरव गांगुलीने बुधवारी केली होती. गांगुलीचे म्हणणे होती कि पाकिस्तान सोबत न खेळल्यामुळे भारताचं कोणतेही नुकसान होणार नाही.

वाचा : जाणून घ्या सेना आणि CRPF मध्ये काय फरक आहे? आणि सरकार का CRPF जवानांना पेंशन देत नाही

मित्रानो, आशा आहे तुम्हाला आमचे हे आर्टिकल आवडले असेल, आवडले असेल तर लाइक आणि शेयर करणे विसरू नका.

Tags
Show More

Related Articles

Back to top button
Close