foodhealth

कितीही शारीरिक अशक्तपणा असुद्या ही वस्तू 40 दिवस दररोज खाण्यामुळे शरीर होईल सदृढ शक्तिशाली

आजारपणामुळे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे शरीरात अशक्तपणा आला असेल कमजोरी आली असेल तर त्यावर हा उपाय एकदम रामबाण आहे. अंजीर खाण्यामुळे मन प्रसन्न राहते. हा स्वभावाला प्रेमळ बनवतो. यकृतासाठी फायदेशीर आहे, कमजोरी दूर करतो तसेच खोकला बरा करतो. वैज्ञानिक मतानुसार अंजीरच्या रासायनिक गुणांचे विश्लेषण केले असता याच्या सुकलेल्या फळा मध्ये कार्बोहाइड्रेट (शर्करा) 63%, प्रोटीन 5.5%, सेल्यूलोज 7.3%, चिकनाई एक%, खनिज लवण 3%, अम्ल 1.2%, राख 2.3% आणि जल 20.8% मिळाले. याच सोबत प्रति 100 ग्राम अंजीर मध्ये जवळपास 1 ग्रामचा चवथा भाग लोह, विटामिन ‘ए’ 270 आई.यू. थोड्या प्रमाणात चूना, पोटैशियम, सोडियम, गंधक, फास्फोरिक एसिड आणि गोंद मिळाले.

अंजीरमुळे होणारे फायदे

दुर्बलता (कमजोरी) दूर होते

पिकलेल्या अंजीरला सम प्रमाणात सौंफ सोबत चावून खावे. याचे सेवन 40 दिवस नियमित केल्यामुळे शारीरिक दुर्बलता दूर होते.

अंजीर दुधा मध्ये उकळवून उकळलेले अंजीर खाऊन तेच दुध पिण्यामुळे शक्ती मध्ये वाढ होते. तसेच रक्त वाढ देखील होते.

रक्त वाढ करतो

10 मनुके (खिसमिस) आणि 5 अंजीर 200 मिलीलीटर दुध एकत्र उकळवून खावे आणि दुध प्यावे. यामुळे रक्तविकार दूर होतात आणि रक्तवाढ होते.

आमांश आणि अतिसार

अंजीरचा काढा 3 वेळा प्यावा

ताकत वाढवण्यासाठी

सुकवलेले अंजीर आणि सोललेले बादाम गरम पाण्यात उकळवा. हे सुकवून यामध्ये साखर, इलायची पावडर, केसर, चारोळी, पिस्ता आणि बादाम सम प्रमाणात एकत्र करून 8 दिवस गाईच्या तुपा मध्ये भिजत ठेवा. नंतर दररोज 20 ग्राम सेवन करावे. लहान मुलांचा अशक्तपणा दूर करण्यासाठी अत्यंत उपयोगी आहे.

जीभ सुजणे

सुकलेल्या अंजीरचा काढा बनवून त्याचा लेप केल्याने गळा आणि जिभेची सूज कमी होते.

क्षयरोग किंवा टीबी मध्ये

या आजारामध्ये अंजीर खाल्ले पाहिजे. अंजीर शरीरा मध्ये रक्तवाढ करते. 2-4 तुम्ही खाऊ शकता.

या गोष्टी लक्षात ठेवा

अंजीर गरम प्रवृत्तीचे आहे.

अंजीरचे जास्त सेवन करणे यकृत आणि आमाशय यासाठी हानिकारक ठरू शकते.

अंजीरचा हानिकारक प्रभाव नष्ट करण्यासाठी बादाम वापरले जाते.

अत्यंत महत्वाची सूचना : फेसबुकच्या नवीन नियमानुसार आमचे पेज आता तुमच्या न्यूज फीडवर अतिक्षय कमी दिसणार आहे त्यामुळे आमच्या नवीन पोस्ट तुमच्या पर्यंत पोहोचणे शक्य होणार नाही यासाठी जर तुम्हाला आमचे लेख आवडत असतील तर कृपया आमचे एंड्राइड एप्प आजच डाउनलोड करा त्याची लिंक खाली दिली आहे.

Marathi Gold Android Application Download Link

लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका

वाचा : नेल पेंट लावण्या शिवाय या कामासाठी ही पडते उपयोगी, नक्की पहा या कामाच्या गोष्टी


Show More

Related Articles

Back to top button