entertenment

या देशां मध्ये भारताचा 1 रु आहे 350 रु एवढा, या 14 देशांच्या मध्ये करा कितीही धमाल पैसे संपणार नाहीत तुमचे

भारतीय चलन म्हणजेच रुपया बद्दल आपल्याला नेहमी तक्रार असते की आंतरराष्ट्रीय स्तरावर याची किंमत अतिक्षय कमी आहे. ज्यामुळे आपण आपल्या विदेशात फिरायला जाने आणि तेथे मौज मस्ती करणे आणि राहणे महाग वाटते त्यामुळे आपण त्याबद्दल कधी विचार करत नाही. पण जर रुपयाच्या इतिहासावर नजर टाकली तर 1947 मध्ये जेथे 1 रुपयाची किंमत 1 डॉलर एवढी म्हणजेच डॉलर आणि रुपया समान होते. तोच डॉलर आता 65 रुपयाला 1 डॉलर एवढा महाग झाला आहे. पण अजूनही असे काही देश आहेत जेथे रुपया तुमच्या अपेक्षा पूर्ण करतो. जर तुम्हाला पण विदेशात फिरायला जाण्याची इच्छा आहे तर आज आम्ही तुम्हाला असे काही सुंदर देश सुचवत आहोत जेथे भारतीय रुपया तुम्हाला श्रीमंत असल्याचा अनुभव देईल.

इंडोनेशिया

येथे भारतीय एक रुपया 207.78 इंडोनेशियन रुपये आहेत. या देशात स्वच्छ निळे पाणी आणि उष्णकटिबंधीय जलवायू बघण्यास मिळते. इंडोनेशिया त्या देशांच्या पैकी एक आहे जेथे भारतीय चलनाची वैल्यू जास्त आहे. याच सोबत इंडोनेशिया मध्ये जाण्यासाठी भारतीयांना मोफत विजा दिला जातो. याचा अर्थ असा की तुम्ही कमी खर्चा मध्ये हा सुंदर देश फिरून येऊ शकता.

वियतनाम

येथे भारतीय एक रुपया 355.04 वियतनामी डोंग आहेत. वियतनाम या देशाला आपल्या बौध्द पगोडा, सुंदर व्हिएतनामी व्यंजन आणि नद्या यासाठी ओळखले जाते. जेथे तुम्ही कायाकिंग जाऊ शकता. वियतनाम भारतीय लोकांच्यासाठी फिरण्यासाठी सर्वोत्तम जागा आहे कारण येथील संस्कृती पूर्णपणे वेगळी आहे. हे फार दूर देखील नाही आहे आणि जास्त महागडे देखील नाही आहे. युध्दाचे संग्रहालय आणि फ्रेंच वास्तुकला याचे आकर्षण केंद्र आहे.

कंबोडिया

येथे भारतीय एक रुपया 63.23 कंबोडियन रियाल आहे. कंबोडिया तेथील विशाल दगडांच्या पासून बनलेल्या अंगकोर वाट मंदिरासाठी प्रसिध्द आहे. भारतीय नागरिक येथे कमी खर्चात फिरू शकतात. येथे रॉयल पैलेस, राष्ट्रीय संग्रहालय आणि पुरातात्विक खंडहर आकर्षणाचे केंद्र आहे. कंबोडिया पश्चिमी देशांच्या पर्यटकांच्या मध्ये प्रसिध्द आहे आणि आता हळूहळू हा देश भारतीय लोकांच्या मध्ये देखील प्रसिध्द होत आहे.

श्रीलंका

येथे भारतीय एक रुपया 2.38 श्रीलंकन रुपया आहे. येथे समुद्र किनारे, डोंगरदऱ्या, हिरवळ आणि ऐतिहासिक स्मारके मुख्य आकर्षण आहे. भारतीयांमध्ये उन्हाळ्याच्या सुट्ट्या घालवण्यासाठी श्रीलंका हे आवडते ठिकाण आहे. हा देश भारताच्या अगदी जवळ आहे आणि स्वस्त हवाई प्रवास उपलब्ध असल्यामुळे येथे जाने सोप्पे आणि स्वस्त आहे.

नेपाळ

येथे भारतीय एक रुपया 1.60 नेपाळी रुपया आहे. येथे तुम्हाला सर्व आश्चर्यजनक गोष्टी पाहण्यास मिळतील. नेपाळ मध्ये माउंट एव्हरेस्ट आणि सात इतर उंच पर्वत आहेत. जे पर्यटकांच्या आकर्षणाचे मुख्य केंद्र आहे. भारतीयाच्यासाठी नेपाळला जाण्याचा एक फायदा हा पण आहे की येथे जाण्यासाठी भारतीयांना विजा घेण्याची गरज नाही.

आइसलैंड

येथे भारतीय एक रुपया 1.65 आइसलेंडीक क्रोना आहे. द्वीपावर वसलेला हा देश जगातील सर्वात सुंदर जागांच्या पैकी एक आहे. उन्हाळ्या पासून वाचण्यासाठी तुम्ही आपल्या पर्यटनाच्या लिस्ट मध्ये या देशाला शामिल केले पाहिजे. आइसलैंड आपल्या निळ्या खाडी, झरे, ग्लेशियर आणि काळ्या रेतीच्या समुद्र किनाऱ्यासाठी प्रसिध्द आहे.

हंगरी

येथे भारतीय एक रुपया 3.99 हंगेरीयाई फ़ॉरिंट आहे. हंगरीची वास्तुकला आणि संस्कृती अतिक्षय लोकप्रिय आहे. जी रोमन, तुर्की आणि अन्य संस्कृतीकडून प्रभावित आहे. येथे असलेल्या महालात आणि पार्कात जावे. हंगरीची राजधानी बुद्धापेस्ट जगातील सर्वात रोमांटिक शहरा पैकी एक आहे.

जापान

येथे भारतीय एक रुपया 1.70 जपानी येन आहे. जापानच्या सुशी आणि चेरीचे फुल याचे आकर्षण आहे. तुम्हाला हे धक्का बसला असेल की जापान देखील या लिस्टमध्ये आहे जेथे भारतीय रुपयाची किंमत ही तेथील चलना पेक्षा जास्त आहे. जापान एक असा देश आहे ज्याची संस्कृती अतिक्षय जुनी आहे, तरीही सर्वात जास्त टेक्नोलॉजीच्या बाबतीत प्रगत आहे. येथे धार्मिक स्थळे आणि राष्ट्रीय उद्याने पाहण्यास जावे.

पेराग्वे

येथे भारतीय एक रुपया 88.48 पैरागुएआन गुआरानी आहे. पेराग्वे पण एक दरगाह विहीन देश आहे. पेराग्वे दक्षिण अमेरिका मध्ये स्थित आहे आणि हा देश त्या पर्यटकांची पहिली पसंत नाही आहे जे ब्राजील किंवा अर्जेंटीना सारख्या शेजारी देशात जाऊ इच्छितात. परंतु पेराग्वे मध्ये नैसर्गिक आणि भौतिकवाद यांचे मिश्रण पाहण्यास मिळते.

मंगोलिया

येथे भारतीय एक रुपया 31.84 मंगोलियाई तुगरिक आहे. मंगोलिया आपल्या फिरस्ती जीवनशैलीसाठी ओळखले जाते. मंगोलिया एक विशाल मोकळी जागा आहे जेथे तुम्ही निसर्गाची मजा घेऊ शकता. ‘निळ्या आकाशाची भूमी’ मंगोलिया शहराला विशेष स्थान देते. दैनंदिन जीवना पासून दूर जाऊ इच्छित असाल तर ही जागा तुम्हाला नक्की आवडेल. येथे तुम्ही एकांताचा आनंद घेऊ शकता.

कोस्टा-रिका

येथे भारतीय एक रुपया 9.03 कोस्टा रिकन कोलोन आहे. हा देश मध्य अमेरिका स्थित आहे जो आपल्या समुद्र किनाऱ्यांच्यासाठी प्रसिध्द आहे. ज्वालामुखी, जंगले आणि वन्यजीव हे येथील आकर्षण आहे. कोस्टा रिकाचे उष्णकटिबंधीय जलवायू पर्यटकांना विशेष आवडते.

पाकिस्तान

येथे भारतीय एक रुपया 1.65 पाकिस्तानी रुपये. तसे पाहता पाकिस्तान हा पूर्वी भारताचाच एक भाग होता, पण तरीही अत्यंत कमी लोक आहेत जे येथे जाऊ इच्छितात. परंतु पाकिस्तान मध्ये अश्या अनेक जागा आहेत ज्या बघण्या लायक आहेत आणि कमी पैसे खर्च करण्याचा स्वस्त विकल्प पण आहे. पाकिस्तानचा स्वात जिल्हा, कराची आणि लाहोर मध्ये काही दर्शनीय स्थळ आहेत.

चिली

येथे भारतीय एक रुपया 9.64 चिली पेसो आहे. चिली मध्ये जंगल आणि ट्रेकचा आनंद घेण्याचा एक सुखद अनुभव येतो. चिली येथील पर्वत रांगा दर्शनीय आहेत. याच सोबत येथे अनेक सक्रीय ज्वालामुखी शिखर आहेत. लेक जिल्हा चिली मधील प्रसिध्द जागांच्या पैकी एक आहे. चिली मध्ये शेती, नदी, डोंगरदऱ्या अत्यंत आकर्षक आहेत.

दक्षिण कोरिया

येथे भारतीय एक रुपया 17.65 दक्षिण कोरियाई वोन आहेत. उत्तर कोरिया एक असे स्थान आहे जेथे कोणताही पर्यटक जाऊ इच्छित नाही. पण दक्षिण कोरिया मध्ये असे नाही. मनाला आनंद देणारे दृष्य आणि परिदृश्य दक्षिण कोरिया मध्ये पर्यटकांना आनंद देतात. येथे गाव, बौध्द मंदिर, हिरवळ आणि चेरी ची झाडे प्रसिध्द आहेत. याच सोबत येथे उष्णकटिबंधीय द्वीप आणि हाई-टेक शहर पाहण्यास मिळतात.

आमचे सर्व मनोरंजक आणि ज्ञानवर्धक आर्टिकल प्रसिद्ध होताच वाचण्यासाठी आमचे Android App खालील लिंक वरून त्वरित डाऊनलोड करा.

Marathi Gold Live

लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका

वाचा : वेश्यावृत्तीसाठी प्रसिध्द आहे हे शहर, होतो 4000 करोड चा कारोबार


Show More

Related Articles

Back to top button