celebrities

पहा कोणता भारतीय खेळाडू म्हणतो इमरान खान माझा कर्णधार असता तर आणखी चांगला खेळाडू झालो असतो

पाकिस्तनाच्या निवडणुकीमध्ये पाकिस्तान तहरीके इंसाफ (पीटीआय) पक्षाचे नेते इमरान खान पंतप्रधान बनण्याच्या उंबरठ्यावर आहेत. पण इमरान खान यांची ओळख ही नेहमीच क्रिकेट कर्णधार म्हणून राहिली. मैदानामध्ये अशक्य असलेली गोष्ट इमरान खान यांनी शक्य करून दाखवली. पाकिस्तानला विश्वचषक जिंकवून द्यायचं स्वप्न इमरान खाननी पूर्ण केलं. अजूनपर्यंत पाकिस्ताननं एकदाच विश्वचषक जिंकला आहे तोही इमरान खान यंच्याच नेतृत्वात.

इमरान खान माझा कर्णधार असता तर मी आणखी चांगला खेळाडू असतो असं भारताचा माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर म्हणाले. संजय मांजरेकर यांनी त्यांचं आत्मचरित्र इमफरफेक्टमध्ये इमरान खानविषयी हे भाष्य केलं आहे. इमरान खान पाकिस्तानचा कर्णधार, प्रशिक्षक, निवड समिती सगळं होता. इमरान खान प्रतिभा ओळखणारा आणि जिद्दी होता, अशी प्रतिक्रिया मणिंदर सिंग यांनी दिली आहे.

इमरान खान शिखरावर होते तेव्हा ते आणि कपील देव, रिचर्ड हॅडली आणि इयन बॉथम यांच्यामध्ये सर्वश्रेष्ठ ऑल राऊंडर कोण याची स्पर्धा सुरु होती. इमरान खान यांनी पाकिस्तानला दिग्गज क्रिकेटपटूही मिळवून दिले. वसीम अक्रम रिव्हर्स स्विंगचा सुलतान म्हणून ओळखला जातो. पण वसीमला ही कला इमरान खाननंच शिकवली. पाकिस्तानच्या घरगुती मॅचमध्ये एका मुलाला खेळताना इमरान यांनी टीव्हीवर बघितलं. या मुलाबद्दल माहिती करुन घ्यायला इमराननी पीसीबीला सांगितलं. हा मुलगा वकार युनुस होता.

Source


Show More

Related Articles

Back to top button