Uncategorized

शिष्य अर्ध्यारात्री गुरूच्या घरी गेला आणि म्हणाला मला हि धनाने भरलेली पिशवी दान करायची आहे यावर गुरु ने काय उत्तर दिले

एका प्रसिद्ध लोककथेच्या अनुसार अर्ध्यारात्री एका गुरूच्या घराचा दरवाजा कोणीतरी वाजवला. दरवाजा उघडला तर पाहिले कि त्यांचा एक शिष्य बाहेर उभा आहे आणि त्याच्या हातामध्ये धनाने भरलेली एक पिशवी आहे. शिष्याने गुरूला प्रणाम केला आणि म्हणाला गुरुदेव हे धन मला आता दान करायचे आहे.

गुरु म्हणाले दान तर तू सकाळी देखील करू शकतोस, एवढ्या रात्री येण्याची काय आवश्यकता होती. शिष्याने उत्तर दिले कि गुरुजी तुम्हीच समजवता कि जेव्हाही चांगले काम करण्याचा विचार मनात येईल तर ते काम केले पाहिजे, नंतर मन बदलू देखील शकते. वाईट काम करण्याच्या अगोदर अनेक वेळा विचार केला पाहिजे. पण चांगले काम त्वरित केले पाहिजे. मी विचार केला कि जर मी आता नाही गेलो तर वाईट विचारामुळे सकाळ पर्यंत माझे मन बदलू शकते. त्यामुळे मी हे धन घेऊन आत्ताच आलो आहे.

शिष्याचे बोलणे ऐकल्या नंतर गुरूंनी शिष्याला मिठी मारली. ते म्हणाले कि जर व्यक्तीने हि गोष्ट आपल्या जीवनामध्ये अवलंबले तर तो व्यक्ती कधीही वाईट काम करू शकत नाही आणि त्याला कधी हि जीवनामध्ये अपयशाचा सामना करावा लागणार नाही.

कथेची शिकवण : या लहानश्या कथेतून शिकण्यास मिळते कि आपल्या मनामध्ये अनेक विचार नेहमी सुरूच असतात. त्यामुळे कधीही आपण काही चांगले काम करण्याचा विचार करतो तेव्हा ते त्वरित केले पाहिजे. अन्यथा वाईट विचारांमुळे आपले मन बदलू शकते. तर कोणतेही वाईट करण्याच्या अगोदर अनेक वेळा विचार केला पाहिजे यामुळे आपण अधर्म करण्यापासून वाचू शकतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button