health

रोग प्रतिकार शक्ती वाढवण्याचे उपाय

रोग प्रतिकार शक्ती वाढवण्याचे उपाय : Immunity म्हणजेच शरीराची रोग प्रतिकारक शक्ती. बहुतेक लोक सतत आजारी पडत असतात विशेषतः ऋतू बदला नंतर आणि इन्फेक्शनच्या विळख्यात येणे हे याचे प्रमुख कारण असते. या आजारपणास कारण बॉडी इम्युनिटी चांगली नसणे हे असते. जर Immune system मजबूत नसेल तर शरीराची रोगांच्या सोबत लढण्याची शक्ती कमी होते ज्यामुळे आपण लवकर आजारी पडतो. वयस्क लोकांच्या तुलनेत लहान मुलांची रोग प्रतिकारक शक्ती कमी असते. काही लोक इम्यून सिस्टम मजबूत करण्यासाठी औषधे (मेडिसिन)घेतात पण विना औषधाच्या घरगुती उपायाने आणि आयुर्वेदिक उपायाने देखील याचा इलाज केला जाऊ शकतो. आज आपण या आर्टिकल मध्ये रोग प्रतिकार शक्ती वाढवण्याचे उपाय पाहू यासाठी कोणते फूड खावेत, natural ayurvedic home remedies (gharguti upay) for body immunity increase tips in Marathi.

immune defense

रोग प्रतिकार शक्ती कमी असण्याचे कारण

वजन जास्त किंवा कमी असणे.

मद्य आणि धुम्रपान यांचे सेवन जास्त करणे.

शरीराला आवश्यकतेनुसार पोषण न मिळणे.

वेदनाशामक औषधांचा अतिरिक्त वापर.

जास्त टेन्शन घेणे आणि खाण्यापिण्याकडे लक्ष न देणे.

झोप पूर्ण न करणे आणि शरीराला आराम न देणे.

रोग प्रतिकार शक्ती वाढवण्याचे उपाय आणि घरगुती पद्धती

Immunity Vadhavnyache Gharguti Upay aani Padhati in Marathi

आजकाल हवे मध्ये अनेक प्रकारचे हानिकारक बैक्तीरीया आणि वायरस असतात जे श्वासाच्या सोबत शरीरात प्रवेश करतात. त्यामुळे आपली इम्यून सिस्टम आपल्याला यापासून वाचवते. जेव्हा इम्युनिटी कमजोर होते तेव्हा हवे मध्ये असलेले वायरस आपल्या शरीरात वाढतात. ज्यामुळे सर्दी-खोकला आणि ताप या समस्या होतात.

इम्युनिटी पावर वाढवण्यासाठी ब्लैक टी आणि ग्रीन टी दोन्ही उपयोगी आहेत. दररोज यांचे 1-2 कप पिने इम्युनिटी पावरसाठी चांगले असते. लक्षात ठेवा याच्या अतिरिक्त सेवनामुळे नुकसान देखील होऊ शकते.

शरीरास इन्फेक्शन पासून वाचवण्यासाठी विटामिन सी अत्यंत फायदेशीर असते. लिंबू आणि आवळा विटामिन सीचे भांडार आहे. त्यामुळे यांचे नियमित सेवन करा.

शरीर निरोगी आणि रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी योग आणि व्यायाम यांची मदत मिळते आणि सोबतच बॉडी डीटॉक्स करण्यासाठी यांची मदत होते.

शरीराची रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी कच्चा लसून औषधाचे काम करते. लसून मध्ये विटामिन ए, सल्फर आणि जिंक असते जे Immunity increase करण्यास फायदेशीर असते.

वजन कमी असणे किंवा जास्त असणे हे देखील इम्युनिटी कमजोर असण्याचे एक कारण आहे. यासाठी आपल्या Weight ला नियंत्रणात ठेवा.

रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आयुर्वेदिक उपाय म्हणजे शतावरी, अश्वगंधा, शिलाजित, तुळस आणि हळद इत्यादी वापरणे.

विटामिन डी मुळे शरीराला आजारा सोबत लढण्याची शक्ती मिळते आणि सोबतचे हे हृद्याचे रोग दूर करणे आणि हाडे मजबूत करण्यासाठी फायदेशीर असते.

नवजात बालकांसाठी आईचे दुध हे रोग प्रतिरोधक शक्ती वाढवण्यासाठी रामबाण आहे. जे बालकास एलर्जी, ताप, जुलाब आणि इन्फेक्शन यापासून वाचवते.

बादाम मध्ये विटामिन ए जास्त असते. दररोज 8 – 10 बादाम खाण्याने रोग प्रतिकारक शक्ती वाढते.

इम्युनिटी वाढवण्यासाठी काय खावे – Immunity Boosting Tips in Marathi

दही सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. याच सोबत पचन शक्ती व्यवस्थित करण्यासाठी देखील उपयोगी ठरते.

फळांमध्ये आंबट फळे, अननस आणि संत्री यामध्ये विटामिन सी असतात जे शरीरातील चांगले कोलेस्ट्रोल वाढवते आणि ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यास मदत करते.

इम्युनिटी वाढवण्यासाठी हिरव्या पालेभाज्या सर्वोत्तम मानल्या जातात. पालक मध्ये फोलिक एसिड असते जे शरीरात नवीन सेल्स बनवण्यासाठी आणि जुने सेल्स चांगले करण्यासाठी उपयोगी आहे. पालक मध्ये फाइबर, आयरन एंटीऑक्सीडेंट आणि विटामिन सी पण असते जे शरीर निरोगी ठेवण्यास मदत करते.

रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मशरूम खाणे देखील फायदेशीर ठरते.

इम्युनिटी पॉवर वाढवण्यासाठी dry fruits उपयोगी ठरतात कारण यामध्ये इम्युनिटी सिस्टम मजबूत करणारे पोषक तत्व असतात. यामध्ये फाइबर, जिंक, मिनरल्स आणि आयरन असते.

ब्रोकली मध्ये विटामिन सी आणि ए असते ज्यामुळे इम्युनिटी पावर वाढते. सोबतच बॉडीला प्रोटीन आणि कैल्शियम मिळते.

लहान मुलांची रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी उपाय

आहारात हिरव्या पालेभाज्या खाण्यास द्याव्यात.

झोप पूर्ण न होणे रोग प्रतिकारक शक्ती कमी होण्याचे एक कारण आहे. मुलांची इम्यून सिस्टम मजबूत राहावी यासाठी त्यांना 10-12 तास झोप आवश्यक आहे.

लहान मुलांना कोणतेही औषध देण्या अगोदर डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्यावा आणि वेदनाशामक औषधांचा वापर देखील कमी करावा.

बिडी आणि सिगरेट यांच्या धुरा पासून मुलांना दूर ठेवावे. यामुळे देखील रोग प्रतिकारक शक्तीचा विकास होत नाही.

तुम्हाला रोग प्रतिकार शक्ती वाढवण्याचे उपाय कसे वाटले. तुमच्या कडे देखील Immunity kashi vadhavavi याचे उपाय असतील तर आमच्या सोबत शेयर करावेत. रोग प्रतिरोधक शक्ती वाढवण्याचे उपाय आपल्या मित्र आणि परिवारा सोबत शेयर करण्यास विसरू नका.


Show More

Related Articles

Back to top button