बॉलिवूडच्या या अभिनेत्रीला आहे झोपेत चालण्याचा आजार, सकाळी पायावर असते जखम आणि सूज

0
21

बॉलिवूड मधील प्रसिद्ध अभिनेत्री इलियाना डिक्रूज ने जवळपास हे मान्य केले आहे कि ती रात्री झोपे मध्ये चालते. ती पुढे म्हणते कि जर मी रात्री झोपेत चालत नाही तर सकाळी तिच्या पायांना सूज आणि जखम कशी पाहण्यास मिळते. इलियाना ने शनिवारी आपल्या या काळजी बद्दल आपल्या फैन्स ना सांगण्यासाठी ट्विटर वर लिहिलं, ‘मी आता हे पूर्णतः मान्य केले आहे कि मी झोपेत चालते.. कदाचित असेच आहे कारण सकाळी उठल्यावर जेव्हा रहस्यमय पद्धतीने माझे पाय सुजलेले आणि जखम झालेले दिसतात त्यामुळे यास समजण्याची कोणतीही वेगळी पद्धत दिसत नाही.’

इलियानाच्या या ट्विट नंतर फैन्स चिंतीत झाले आहेत. लोकांनी तिला आपल्या रूम मध्ये एक व्हिडीओ कैमेरा लावण्यास सुचवलं आहे. तर काही लोक यास हॉंटेड किंवा भुताटकी बोलत आहे. एक युजर ने लिहिले आहे कि ‘जेव्हा जाग येते तेव्हा तू स्वतःला बेड पाहतेस का अन्य ठिकाणी. जर स्वताला इतर जागी पाहत असशील तर हे स्लीप विकिंग आहे नाहीतर तू भुताची शिकार असू शकतेस.’

इलियानाच्या करिअर बद्दल बोलायचं झालं तर इलियानाने तमिळ आणि तेलुगू सिनेमा मध्ये भरपूर काम केलं आहे. तेलुगू फिल्म ‘देवदासु’ मध्ये तिला ‘बेस्ट फिमेल डेब्यू-साऊथ’ चा फिल्मफेयर पुरस्कार देखील दिला होता. तर बॉलिवूड मध्ये ‘रुस्तम’, ‘बर्फी’, ‘बादशाहो’ आणि ‘रेड’ यासारखे मोजके पण चांगले सिनेमे केले आहेत. सध्या ती मल्टीस्टारर फिल्म ‘पागलपंती’च्या शूटिंग मध्ये व्यस्त आहे. या फिल्म मध्ये इलियाना सोबत अनिल कपूर, जॉन अब्राहम, उर्वशी रौतेला आणि अर्शद वारसी प्रमुख भूमिकेत दिसतील.