जर आपल्या घरामध्ये या 3 कारणामुळे होतात भांडणे, तर आजच बदला…

घरामध्ये तीन गोष्टी सुख घेऊन येतात. पहिली गोष्ट घराचा रंग, दुसरा घरातील तरंग (लहरी) आणि तिसरी गोष्ट घरात राहणारे लोक. जर यापैकी दोन गोष्टी देखील चांगल्या असतील तर घरामध्ये सुख शांती नेहमी टिकून राहते. कधीही घरामध्ये कोणताही वादविवाद, भांडणे, आजार आणि कलह होत नाही.

जर हे तीनही गोष्टी व्यवस्थित नसतील तर घरामध्ये वादविवाद होणे आणि सुखशांती नसणे या समस्या होऊ शकतात. काही वेळा लोक अश्या काही वस्तू आपल्या घरामध्ये घेऊन येतात ज्यामुळे नंतर त्यांच्या घरामध्ये वाद आणि भांडणे होतात. एवढंच नाही तर आपल्या घरामध्ये काही खास लोक येत असतील तरी देखील वाद होतो.

कसा व्यवस्थित करावा घराचा रंग?

हलके आणि सुंदर रंग घराला केला पाहिजे. हलका पिवळा, गुलाबी किंवा हिरवा रंग आपल्या लिविंग एरिया मध्ये केला पाहिजे. तर नारंगी रंग स्वयंपाक घरासाठी चांगला असतो. गुलाबी, पर्पल किंवा हिरव्या रंगाच्या हलक्या शेड्स आपल्या बेडरूम मध्ये लावल्या पाहिजेत. नेहमी छताचा रंग हा पांढराच ठेवला पाहिजे. आपल्या घराच्या भिंतीवर निळा आणि निळ्या रंगाच्या शेड्स कमीत कमी वापराव्यात.

कसे व्यवस्थित ठेवाव्यात घरातील तरंग?

घरातील तरंग म्हणजेच सकारात्मक लहरी (पॉजिटीव्ह एनर्जी) घरातील सामान आणि तेथे राहणाऱ्या लोकांमुळे बनते. अनुपयोगी वस्तू घरामध्ये मुळीच ठेवू नयेत. आपल्या घरामध्ये प्रकाश आणि हवा खेळती राहील याची काळजी घ्यावी. शिळे अन्न, अनुपयोगी चप्पल-बूट घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी निर्माण करतात. घरामध्ये सकाळ-संध्याकाळ पूजा-अर्चना केल्याने, सुगंध आणि मंत्र जप यामुळे तरंग चांगला राहतो. अमावास्येला घराची पूर्ण स्वच्छता अवश्य केली पाहिजे. घरामध्ये सामूहिक पूजा आठवड्यातुन एकदा अवश्य केली पाहिजे.

कोणत्या गोष्टीची काळजी घरातील लोकांनी घेतली पाहिजे?

लोकांचा स्वभाव आणि वागणूक महत्वाचा असतो. घरातील तरंग आणि भाग्य दोन्ही घरातील लोकांमुळे बनते. घरातील लोकांची वागणूक एकमेकांच्या सोबत चांगली असली पाहिजे. आळस आणि अपशब्द यांना घरामध्ये मुळीच स्थान देऊ नयेत. घरामध्ये वस्तू व्यवस्थित ठेवाव्यात.