रामदास आठवले यांचे वक्तव्य ‘राहुल गांधी नीट पक्ष सांभाळू शकत नसतील तर, देश काय चालवणार?’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणाऱ्या लोकांविरुध्द्व केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी तोफ डागली आहे. मोदींच्या टीकाकारांचा समाचार घेताना त्यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या वर टीका केली आहे आणि त्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

रामदास आठवले म्हणतात कि मोदीजींनी मागील पाच वर्ष चांगले काम केलेले असून देखील काहीलोक त्यांची प्रतिमा मालिन करण्याचा डाव केला. पण जनतेने ठरवलं आहे कि मोदी शिवाय दुसरा पर्याय नाही असे म्हणताना आठवलेंनी राहुल गांधी यांच्यावर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले जर राहुल गांधी त्यांचा पक्ष व्यवस्थित सांभाळू शकत नसतील तर ते देश कसा चालवतील? यामुळेच त्यांचा अमेठी मधून पराभव झाला.

यापूर्वी शनिवारी रामदास आठवले म्हणाले होते कि, महाराष्ट्रामध्ये भाजपा, शिवसेना आणि इतर पक्षांची महायुती 21 ऑकटोबर रोजी होणार असलेल्या विधानसभेच्या निवडणुकी मध्ये 240 ते 250 जागा जिंकेल. आठवले म्हणाले होते कि भाजपा आणि शिवसेनेने लहान मुद्द्यांना सोडून आपल्या ताकदीच्या आधारावर जागांचे वाटप केले पाहिजे आणि निवडणूक लढली पाहिजे.