astrology

भगवान शंकराच्या प्रत्येक प्रतिमेचे आहे वेगवेगळे महत्व, पहा कोणती प्रतिमा पूजन केल्याने मिळते कोणते फळ

भोलेबाबा शिव शंकर तर प्रत्येक भक्ताचे ऐकतात आणि त्यांची इच्छा थोड्या प्रयत्नानेच पूर्ण करतात. पण जसे कि शास्त्रामध्ये प्रत्येक देवतेची विशेष पूजा पद्धत सांगितली आहे. श्रीलिंग महापुराणात भगवान शंकराच्या विविध प्रतिमेच्या पूजनाचे महत्व सांगितले आहे. पूजन केल्यामुळे मिळणाऱ्या वेगवेगळ्या परिणामांचा उल्लेख केला आहे.

सर्वसाधारण पणे भगवान शंकराची पूजा शिवलिंग स्वरूपामध्ये केली जाते पण मूर्ती पूजनाचे पण आपले एक वेगळे महत्व आहे. श्रीलिंग महापुराणा मध्ये भगवान शंकराच्या वेगवेगळ्या रूपातील मुर्त्या आणि प्रतिमांच्या पूजनाच्या मिळणाऱ्या लाभा बद्दल सांगितले आहे.

शंकराच्या अर्धनारीश्वर रूपातील मूर्तीची किंवा प्रतिमेची पूजा केल्यामुळे सुखी वैवाहिक जीवन प्राप्त होते.

तर ज्या मूर्ती मध्ये भगवान शंकर एक पाय, चार हात आणि तीन डोळ्यांच्या सोबतच हातामध्ये त्रिशूळ घेतले आहे, सोबतच त्यांच्या उत्तर दिशेला भगवान विष्णू आणि दक्षिण दिशेला ब्रह्मा जी ची मुर्ती असेल, अश्या प्रतिमेचे पूजा-अर्चना केल्यामुळे आरोग्यास लाभ मिळतो आणि सर्व आजारा पासून मुक्त राहता.

तर भगवान शिव, माता पार्वती आणि कार्तिकेय सोबत असलेली प्रतिमा पूजन केल्याने मनुष्याची हर मनोकामना पूर्ण होते आणि त्यास सर्व प्रकारचे भौतिक सुख प्राप्त होतात.

तसेच भगवान शंकराच्या अग्नीस्वरूप वाल्या प्रतिमा ज्यामध्ये त्यांचे तीन पाय, सात हात आणि दोन डोके असतील अशी मूर्ती पूजा केल्याने मनुष्याला अन्न आणि धनाची प्राप्ती होते.

भगवान शंकर माता पार्वती सोबत बैलाच्या पाठीवर बसलेली मूर्ती पूजनामुळे संतान प्राप्तीची इच्छा पूर्ण होते.

तर ज्ञान देण्याच्या स्थिती मध्ये बसलेले शंकर मूर्ती पूजनामुळे विद्या आणि ज्ञान प्राप्ती होते.

तर कैलाश पर्वतावर माता पार्वती, नंदी आणि सर्व गण भोवती असलेली शिव शंकराची प्रतिमा पूजन केल्यामुळे मनुष्याला समाजा मध्ये मान सन्मान मिळतो.

तसेच माता पार्वती सोबत नृत्य मुद्रेत, हजारो भुजावाली भगवान शंकराची छवी पूजा केल्यामुळे व्यक्तीला जीवनाचे सर्व सुख प्राप्त होतात.

चार हात आणि तीन नेत्राच्या सोबत गळ्यात साप आणि हातामध्ये कपाल धारण केलेली शंकराची सफेद मूर्ती पूजा केल्याने धन संपत्ती प्राप्त होते.

काळा रंग किंवा लाल रंगाच्या शिव मूर्ती ज्यामध्ये तीन नेत्र असलेले शिवजी, चंद्र गळ्यात आभूषणा सारखे धारण केलेले असेल आणि हातामध्ये गदा-कपाल घेतलेले असेल अश्या मूर्तीच्या पूजना मुळे सर्व दुखाचे नाश होते आणि थांबलेली कामे पूर्ण होतात.

तर ज्या मूर्ती मध्ये भगवान शंकर दैत्य निकुंभच्या पाठीवर बसून आपला उजवा पाय त्याच्या पाठीवर ठेवून आहेत आणि त्यांच्या डाव्या बाजूला माता पार्वती असेल, अशी प्रतिमा विधिवत पूजा केल्यामुळे शत्रू वर विजय मिळतो.

शरीरावर भस्म लावलेले, ध्यान स्थितीत बसलेले शिव शंकर प्रतिमा पूजा केल्यामुळे मनुष्याच्या सर्व दोष आणि पापांचा नाश होतो.


Show More

Related Articles

Back to top button