Uncategorized

Hyderabadi Dum Biryani Recipe in Marathi – हैद्राबादी दम बिर्याणी रेसेपी

Hyderabadi Dum Biryani Recipe in Marathi : हैद्राबादी दम बिर्याणी रेसेपी संपूर्ण जगामध्ये सुप्रसिद्ध आहे. ज्यालोकांना नॉनव्हेज खाण्याची आवड आहे खास त्यांच्यासाठी येथे खास Hyderabadi Cheken dum biryani recipe घेऊन आलो आहोत.

तर शिकूया कशी बनवतात चिकन बिर्याणी हैद्राबादी स्टाईल मध्ये.

मेरीनेशनसाठी :

८ ते १० हिरव्या मिरच्या उभ्या कापलेल्या.

दीड चमचा अद्रक लसून पेस्ट.

१ चमचा लाल तिखट (मिरची पावडर)

१/४ चमचा हळद पावडर

३/४ चमचा गरम मसाला

१/२ कप कोथिंबीर

३/४ कप पुदिना पाने

२ चमचे लिंबू रस

मीठ चवी अनुसार.

हैद्राबादी चिकन बिर्याणी साठी साहित्य

१ मोठा कांदा

१ कप कोथींबीर

१ चमचा केसर

१/२ कप उकळलेले दुध

१ किलो चिकन

मीठ चवी अनुसार

लवंग, दालचिनी, इलायची आणि काळे मिरी.

२ चमचे घी आणि ५ चमचे तेल

२ कप बासमती तांदूळ (उकडल्या नंतर घी, लवंग, दालचिनी, तेज पत्ता, पुदिना आणि मीठ घालून फ्राय केलेले)

कृती

चिकन ४ ते ५ तास मसाला लावून मेरीनेट करा आणि बाजूला ठेवा. एका भांड्या मध्ये १ चमचा तेल गरम करून त्यामध्ये कापलेले कांदे भाजून घ्या.

एका भांड्यात दुधामध्ये केसर भिजवा. एका कुकर मध्ये तेल घालून मेरीनेट केलेले चिकन फ्राय करा. यानंतर त्याच कुकर मध्ये एक लेयर तांदूळ आणि घी टाका यानंतर भाजलेले कांदे, कापलेली कोथंबीर आणि केसरवाले दुध घालून झाकण लावा आणि २५ ते ३० मिनिट शिजू द्या.

जास्त चांगल्या चवीसाठी बिर्याणी मातीच्या भांड्यात शिजवा आणि त्याचे झाकण गच्च लावण्यासाठी कणकेचा लेप लावून झाकण झाका.

Related Articles

Back to top button