money

7 Toothpaste Hacks for Daily Use in Marathi

7 Toothpaste Hacks for Daily Use in Marathi : प्रत्येक महिलेसाठी आपले घर हे मंदिरा समान असते आणि त्यास clean आणि चमकदार करण्यासाठी ती अहोरात्र मेहनत घेते. परंतु काही वेळा काही दाग त्रास देतात. कधी ते भिंतीवर असतात तर कधी आवडत्या ड्रेसवर लिपस्टिकचे दाग, तर कधी कधी चहा, कॉफी आणि सॉसचे दाग. हे दाग नेहमी त्रासदायक ठरतात.

घर स्वच्छ आणि चमकदार दिसण्यासाठी भरपूर मेहनत घ्यावी लागते. परंतु आज आम्ही तुम्हाला अश्या काही टिप्स सांगत आहोत ज्यांच्या मदतीने तुमचा हा प्रोब्लेम काही प्रमाणात दूर होईल.

हे सर्व दाग दूर करण्यासाठी टूथपेस्ट वापरा. होय, जी आपल्या सर्वांच्या घरामध्ये असतेच. तुमच्या दातांना चमकदार करण्या सोबतच ही छोटीशी ट्यूब अनेक काम करू शकते. खरतर तुम्ही हिला घरातील प्रत्येक कानाकोपरा मध्ये वापरु शकता.

टूथपेस्ट मध्ये बेकिंग सोडा योग्य प्रमाणात असते. जे कोणत्याही वस्तूला कोणताही अपाय किंवा नुकसान न करता त्यावरील धूळ माती स्वच्छ करू शकते. महागड्या वस्तूंच्या वापरा दरम्यान सावधगिरी बाळगण्याची गरज असते पण त्यासाठी देखील तुम्ही टूथपेस्ट वापरू शकता.

आज आम्ही तुम्हाला या आर्टिकल मध्ये सांगत आहोत कि दररोज दिवसाची सुरुवात तुम्ही ज्या टूथपेस्टने करता ती तुम्हाला तुमच्या घराच्या सफाई अभियाना मध्ये किती मदत करू शकते.

How to remove lipstick and ink stain from white clothes

आपल्या पांढऱ्या कपड्यांवरून लिपस्टिक आणि शाईचे दाग कसे घालवावे

अनेक वेळा लिपस्टिक आणि शाईच्या दागामुळे आपले पांढरे कपडे खराब होतात. ज्यामुळे आपण आपले आवडते कपडे कायमचे घालणे बंद करतो. परंतु त्यापूर्वी एकदा टूथपेस्टचा वापर करून पहा. चांगल्या प्रमाणात पांढरी टूथपेस्ट लिपस्टिक किंवा शाईच्या दागावर लावा. आता यास धुवून घ्या आणि तो पर्यंत असे करा जो पर्यंत दाग पूर्णतः निघून जात नाही.

For mosquito bite relief

मच्छर आणि किडे चावल्यावर आराम मिळण्यासाठी

मच्छर आणि किडे चावल्यावर खाज सुटते आणि जळजळ होते यापासून सुटका मिळवण्यासाठी त्याजागी टूथपेस्ट लावा. यामुळे तुम्हाला केवळ आरामच नाही मिळणार तर त्याभागाचा लालपणा कमी करण्यास मदत करेल.

Use as mobile screen scratch remover

फोनच्या स्क्रीनवर पडलेले स्क्रैचसचे दाग दूर करण्यासाठी

मोबाईल फोनच्या स्क्रीनवर कळत नकळत स्क्रैचेस पडतात. ज्यामुळे स्क्रीन खराब दिसते यावर उपाय म्हणून तुम्ही स्क्रीनवर टूथपेस्ट लावा आणि रगडून स्वच्छ करा. त्यानंतर एखाद्या मऊ कपड्याने स्क्रीन स्वच्छ करा. या उपायाने स्क्रीन पहिल्या इतकी खराब दिसणार नाही.

Hand smell remover

हातांना येणारा वास दूर करण्यासाठी

अनेक वेळा किचन मध्ये काम करताना हातांना कांदा किंवा लसणाचा वास येतो आणि हा वास हातावर तसाच राहतो. अश्यात जर

हैंडवॉश वापरून देखील वास जात नसेल तर टूथपेस्ट वापरून पहा. थोडीशी टूथपेस्ट घ्या आणि हाताला येणाऱ्या कोणत्याही वासाला दूर करा.

For hair styling equipment cleaning

आपले हेयर स्टाइलिंग उपकरणे स्वच्छ करण्यासाठी

जर तुम्ही आपले केस स्टाईल करण्यासाठी उपकरणाचा वापर करत असाल तर टूथपेस्ट तुम्हाला भरपूर मदत करू शकते. तुमच्या लक्षात आले असेल कि दररोज स्ट्रेटनर आणि कर्लिंग टूल वापरल्यामुळे ते चिकट होतात. जर त्यांना जास्त जोर लावून स्वच्छ केले तर ते खराब होऊ शकतात. म्हणून आपल्या उपकरणाला स्वच्छ करण्यासाठी त्यावर थोडी टूथपेस्ट लावा आणि थोड्यावेळाने ओल्या कपड्याने साफ करा. यामुळे उपकरणे स्वच्छ होतील आणि त्यावर चमक देखील येईल.

For wall crayons cleaning

भिंतीवरील क्रेयॉन्सचे दाग दूर करण्यासाठी

मुलांना ड्राइंग करण्यासाठी कितीही पेपर दिले तरी ते भिंतीवर आपली कला दाखवतातच. त्यांनी पाडलेले हे दाग दूर करण्यासाठी भिंतीवर थोडी टूथपेस्ट लावा आणि ब्रशने रगडून कपड्याने पुसून घ्या.

Use as milk smell remover

आपल्या बाळाच्या दुधाची बाटली ठेवा नवीन प्रमाणे

दुधाची बाटली कितीही धुतली तरी त्यामधून दुधाचा वास जात नाही. यासाठी लिक्विड सोप वाया घालवण्या पेक्षा टूथपेस्ट वापरा. बाटली वर थोडी टूथपेस्ट लावा आणि ब्रशच्या मदतीने आतून बाहेरून धुवून घ्या.


Show More

Related Articles

Back to top button