Breaking News

नकळत देखील अश्या सात चुका करू नयेत, अन्यथा घरात होणार नाही माता लक्ष्मी चा वास

देवी लक्ष्मीला संपत्तीची देवी मानले जाते. त्यांना प्रसन्न करण्यासाठी बरेच उपाय केले जातात. ज्यांना देवी लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो त्यांच्या आयुष्यात आनंद आणि समृद्धीची कमतरता कधीच नसते. देवी लक्ष्मी ज्या घरात तिचा सन्मान केला जातो त्याच घरात राहते. अशा परिस्थितीत, आपण नकळत देखील या चुका नाही केल्या पाहिजेत.

हिंदू धर्मात पहाटे आणि संध्याकाळी देवी-देवतांची पूजा आणि आरती करण्याची परंपरा आहे. ज्या घरात सकाळ आणि संध्याकाळ पूजा होत नाही तेथे देवी लक्ष्मी कधीही निवास करत नाहीत.

सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी झोपलेल्या माणसाला कधीही आनंद किंवा समृद्धी मिळत नाही असे शास्त्रात सांगितले आहे. अशा घरात पैशांची कमतरता नेहमीच असते. असे केल्याने देवीला नाराज होते.

जेथे मोठ्या वडीलधाऱ्या लोकांचा, गुरुजनांचा आणि साधु महात्मांचा अनादर होतो तेथे देवी लक्ष्मी निवास करत नाही. तर जेथे या लोकांना योग्य मानसन्मान दिला जातो तेथे माता लक्ष्मी आनंदाने निवास करते.

ज्या घरात जेवणाची बनवताना आणि वाढताना योग्य स्वच्छतेची काळजी घेतली जात नाही देवी लक्ष्मी तेथे राहत नाहीत. माता लक्ष्मीला स्वच्छता जास्त आवडते.

ज्या घरात कुटुंबातील सदस्यांमध्ये नेहमी भांडण होत असतात त्या घराला माता लक्ष्मी आपले निवासस्थान बनवित नाही.

ज्या घरात महिलांचा अपमान होतो अशा घरात माता लक्ष्मी जास्त काळ राहत नाही. आपणास माहीत असेलच भारतीय संस्कृती मध्ये महिलेला लक्ष्मीचे रूप मानले जाते त्यामुळे ज्या घरात महिलांना मान नसतो तेथे माता लक्ष्मी निवास करत नाही.

माता लक्ष्मीला स्वच्छता आणि नीटनेटकेपणा अत्यंत प्रिय आहे. माता लक्ष्मी अश्या लोकांच्या घरी कधीच जात नाही, जी घाणेरड्या कपड्यांमध्ये आणि आंघोळ केल्या शिवाय राहतात.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

About V Amit

My name is V Amit, I am a blogger, I am the founder of MarathiGold.com. I hope you like the articles written by me.