गहू, तांदूळ, डाळ किंवा इतर कोणत्याही धान्यात कीड आणि आळी होऊ नये यासाठी घरगुती नैसर्गिक उपाय

0
144

बहुतेक घरामध्ये लोक आपल्या वर्ष किंवा सहा महिन्याचे गहू, तांदूळ किंवा इतर धान्य आणि डाळ साठवून ठेवतात. परंतु बहुतेक वेळा यामध्ये काही कारणामुळे किडे आणि आळ्या होतात. ज्यामुळे आपल्या धान्याचे नुकसान होते आणि पुन्हा त्यास साफ करण्यासाठी मेहनत लागते ती वेगळीच. आपल्या या त्रासापासून मुक्ती मिळवण्यासाठी आम्ही आपल्याला काही टिप्स सांगत आहोत ज्यामुळे आपण साठवलेल्या धान्याला किंवा डाळीला कीड आणि आळ्या यांचा प्रादुर्भाव होणार नाही.

येथे आम्ही तुम्हाला तीन ते चार प्रकारच्या पद्धती सांगितल्या आहे पण आपण यापैकी कोणतीही एक पद्धत वापरून आपल्या धान्याचे संरक्षण करू शकता आणि आपले होणारे नुकसान आणि मेहनत दोन्ही टाळू शकता. चला तर आपण धान्याचे कीड आणि आळ्या पासून संरक्षण करण्यासाठी काय करता येईल हे जाणून घेऊ.

पहिल्या पद्धती मध्ये आपण कडुलिंबाची पाने तोडून त्यांना सावली मध्ये चांगल्या प्रकारे सुकवून घ्या. त्यानंतर ही कडुलिंबाची 10 ते 15 पाने एका झिपलॉक प्लास्टिक पिशवी मध्ये भरावीत आणि प्लास्टिक पिशवीचे झिपलॉक बंद करावे. यानंतर टूथपीक किंवा सुईच्या मदतीने प्लास्टिक पिशवीला छिद्र पाडावीत ज्यामुळे प्लास्टिक पिशवीच्या आतील कडुलिंबाची पाने धान्यात मिक्स होणार नाहीत परंतु त्याचा सुगंध मात्र धान्यात दरवळेल ज्यामुळे आपल्या धान्याला कीड लागणार नाही. अश्या प्रत्येकी 2 किलो धान्यासाठी 1 पिशवी प्रमाणे कडुलिंबाच्या पिशव्या तयार करा. यानंतर एक हवाबंद डबा घेऊन त्याच्या तळाला थोडे धान्य त्यानंतर आपण तयार केलेली कडुलिंबाची एक पिशवी आणि पुन्हा त्यावर दोन ते तीन किलो धान्य असे थर तयार करा आणि हवाबंद डब्याचे झाकण लावून धान्य साठवणूक करा. आपल्या धान्याला कीड आणि आळ्या यांचा त्रास होणार नाही.

पुढील दुसऱ्या टिप्स मध्ये आपण लसूण वापरणार आहोत. यासाठी आपण लसूण न छिलता गड्डेच धान्यात ठेवणार आहोत. त्यासाठी आपण हवा बंद डब्यात थोडे धान्य भरावे त्यानंतर एक लसणाचा गड्डा त्यानंतर पुन्हा धान्य त्यावर पुन्हा लसूण असा एकावर एक थर लावून हवाबंद डब्याचे झाकण लावावे. या पद्धतीने देखील आपले धान्य सुरक्षित राहील.

तिसऱ्या पद्धती मध्ये सगळी कृती वरील लसणाच्या पद्धती प्रमाणेच राहील परंतु लसणाच्या ऐवजी आपल्याला प्रत्येक थराला 4 ते 5 लाल सुकलेल्या मिरच्या ठेवायच्या आहेत ही पद्धत देखील अत्यंत प्रभावी आहे यामुळे आपल्या गहू, तांदूळ किंवा डाळी मध्ये देखील किडे आणि आळी होणार नाहीत.

शेवटची चवथी पद्धत वापरण्यासाठी आपल्याला कडुलिंबाची सुकवलेली पाने आणि लसणाचे साल सम प्रमाणात घेऊन त्यांना मिक्सर मध्ये थोडेसे पाणी घालून बारीक करायचे आहे. यामध्ये आपण 10 ते 15 लवंग देखील बारीक करून घ्यावेत. हे तिन्ही मिश्रण एकत्र करून यांच्या मध्यम आकाराच्या गोळ्या बनवाव्यात आणि यांना दोन दिवस सूर्य प्रकाशात सुकवाव्यात. यानंतर तयार झालेल्या गोळ्या कोणत्याही पातळ कपड्यात प्रत्येकी एक बांधून धान्यात ठेवाव्यात ज्यामुळे गोळ्या मोडल्या किंवा त्यांचा चुरा झाला तरी आपल्या धान्यात मिक्स होणार नाही आणि आपले धान्य किडे आणि आळ्या पासून सुरक्षित देखील राहील.

वरील पैकी कोणत्याही एका पद्धतीचा वापर करून आपण आपल्या धान्यात होणारे किडे आणि आळ्या यांच्या त्रासा पासून मुक्ती मिळवू शकता. आपल्याकडे देखील यापेक्षा काही वेगळ्या आणि प्रभावी परंतु नैसर्गिक वस्तूंचा वापर असलेल्या टिप्स असतील तर तुम्ही त्या आमच्या सोबत शेयर करू शकता. आपल्याला आमची पोस्ट आवडली असेल आणि उपयोगी वाटली असेल तर पोस्ट लाईक करण्यास विसरू नका.