फक्त 2 वस्तू वापरून सोन्याचे दागिने घरच्या घरी स्वच्छ करून नव्या सारखे चमकदार करण्यासाठी ही पद्धत वापरा

भारतीय लोकांना सोन्याच्या दागिन्यांची आवड जास्तच असते आणि विशेषतः महिलांसाठी तर हा अगदी आवडीचा विषय आहे. महिलांना दागिने परिधान करण्यास पुरुषांच्या तुलनेत थोडे जास्त आवडते आणि त्यांच्यासाठी वेगवेगळ्या दागिन्यांचे प्रकार देखील बाजारामध्ये जास्त उपलब्ध असतात.

महिलांचे सौंदर्य दागिने परिधान केल्यानंतर थोडे जास्त खुलते. त्यामुळे महिलांना नेहमी आपले दागिने नव्या सारखे चमकदार असावेत असे वाटते. त्यासाठी नेहमी त्यांना बाजारात जाऊन पॉलिश करून घेणे कटकटीचे, त्रासदायक आणि खार्चिक देखील ठरते त्यामुळे या समस्येवर उपाय म्हणून आपण घरच्या घरी देखील सोन्याचे दागिने नव्या सारखे चमकावण्यासाठी काय करता येईल ते पाहू.

सोन्याचे दागिने नेहमीच्या वापरामुळे आणि वातावरणाचा परिणाम होऊन त्याची पॉलिश आणि चमकदारपणा गमावतात. तसेच नेहमी वापरून त्यामध्ये धूळ माती देखील जमा होते.

विशेषतः अंगठी मध्ये आणि तिच्या आतून धूळ माती जमा होते आणि त्यामुळे अंगठी नेहमी वापरू नये का असा प्रश्न मना मध्ये येतो पण हौशेला मोल नसते आणि आपण नेहमी अंगठी आणि इतर काही दागिने दररोज वापरतो. चला पाहू यांना चमकदार करण्यासाठी आपण घरच्या घरी कोणती पद्धत वापरू शकतो.

या पद्धतीने आपले सोन्याचे दागिने स्वच्छ करण्यासाठी फक्त दोन वस्तूंची आवश्यकता आहे. त्यापैकी पहिली वस्तू म्हणजे एक ग्लास पाणी किंवा तुमचे सोन्याचे दागिने जास्त असतील तर त्या प्रमाणात थोडे जास्त पाणी घेऊ शकता. पाणी आपल्याला एका भांड्यात घ्यायचे आहे आणि ते उकळण्यासाठी गैस वर ठेवा.

पाणी कोमट म्हणजेच हलकेसे गरम झाल्या नंतर त्यामध्ये एक मोठा चमचा डिटर्जंट पावडर टाकावी. यासाठी आपण घरा मध्ये उपलब्ध असलेली कोणतीही डिटर्जंट पावडर वापरू शकता.

एक मोठा चमचा डिटर्जंट पावडर गरम पाण्यामध्ये टाकल्या नंतर त्यामध्ये एक लहान चमचा हळद पावडर टाकावी. डिटर्जंट युक्त पाण्यात हळद पावडर टाकल्यानंतर पाण्याचा रंग बदली होईल त्यामुळे आपण घाबरून जाऊ नये.

गरम पाण्यामध्ये डिटर्जंट पावडर आणि हळद टाकल्यानंतर त्यास चमचा वापरून व्यवस्थित ढवळा. त्यानंतर पाणी उकळल्या नंतर या पाण्यात सोन्याचे दागिने टाका. पाणी उकळते असल्याने काळजीपूर्वक दागिने पाण्यात टाकावी. यासाठी आपण चमचा देखील वापरू शकता. दागिने उकळत्या पाण्यात टाकल्या नंतर एक ते दोन मिनिटे पाणी उकळू द्या आणि त्या दरम्यान आपले दागिने चमचाच्या मदतीने हलवत राहावे ज्यामुळे आपले दागिने सगळ्या बाजूने चांगले स्वच्छ होतील.

एक मिनिट झाल्या नंतर दागिने पाण्या मधून बाहेर काढावीत आणि गैस बंद करावा. आता एक सॉफ्ट ब्रिसल्स असलेला टूथब्रशच्या मदतीने दागिने आपण ज्या पाण्यात गरम केले तेच पाणी वापरून घासावेत. ज्यामुळे बारीक नक्षीकामा मध्ये असलेली धूळ माती निघून जाईल.

ब्रशच्या मदतीने दागिने घासून झाल्या नंतर आपण दागिने स्वच्छ नॉर्मल पाण्याने धुवून घ्यावीत. आपल्या लक्षात येईल कि दागिने नव्या सारखे चमकदार आणि पॉलिश केल्या सारखे दिसतील.

ही पद्धत वापरून आपण घरच्या घरी दागिने चमकदार करू शकता. वरील फोटो मध्ये आपण पाहू शकता कि कसे दागिने नव्या सारखे चमचम करत आहेत. अगदी बारीक नक्षीकाम देखील चमकदार झाले आहे.

आपल्याला सणासुदीच्या काळात सोन्याचे दागिने नव्यासारखे चमकदार करण्यासाठी या पद्धतीचा उपयोग होईल या उद्देशाने आम्ही ही माहिती तुमच्या पर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला आहे असेच तुम्ही देखील ही माहिती इतर लोकांना पोस्ट शेयर करून कळवू  शकता.