Viral
10 मिनिटामध्ये AC ची होईल सफाई, सारखे द्यावे लागणार नाही सर्विसचे पैसे
चेन्नई मध्ये 3 ऑक्टोबर रोजी एयर कंडीशनर खराब झाल्यामुळे 3 लोक जागीच मरण पावले हे आता पर्यंत कदाचित तुम्हाला समजले असेलच. एसी खराब होऊन लोक मरण्याचे कारण पोलिसांनी सांगितले कि रात्री वीज गेल्यानंतर लोकांनी इन्व्हर्टरवर एसी सुरु केला होता आणि नंतर जेव्हा वीज पुन्हा आली तेव्हा त्यांनी इन्व्हर्टर बंद केला नाही अश्यातच एसी खराब असल्याने त्यामधून विषारी गैस बाहेर आले आणि रूमचे दरवाजे-खिडक्या बंद असल्याने तीन लोक गुदमरून मरण पावले.
या केस मध्ये AC खराब झाल्यामुळे दुर्घटना झाली. एक्स्पर्ट नुसार AC चा मैंटेनेंस किंवा सर्विस वेळेवर केली पाहिजे. AC मधून गैस निघणे किंवा दुसरा डीफेक्ट येणे यामागील कारण वेळेवर सर्विस न करणे असू शकते. परंतु बहुतेक लोक यावर लक्ष देत नाहीत आणि यामुळे अनेक वेळा दुर्घटना होतात.
याबद्दल एक्स्पर्ट म्हणतात एसी चा टाईमली मेंटेनेंस आवश्यक आहे. पण जर यामध्ये वेळ लागत असेल तर तुम्ही घरी याचे एयर फिल्टर आणि बैक्तीरीया फिल्टर स्वच्छ नक्कीच करू शकता. खरतर हे दोन्ही पार्टस AC चा महत्वाचा भाग आहेत आणि यामध्ये हळूहळू धूळ जमा होते. ज्यामुळे एयर फ्लो बंद होतो.
घरात 10 मिनिट वेळ देऊन करा सफाई
विंडो आणि स्पिल्ट AC मध्ये एयर आणि बैक्तीरीया फिल्टर असतात. यांची स्वच्छता अगदी सहज केली जाऊ शकते.
स्पिल्ट एसी मध्ये वरच्या बाजूला कवर असतो ज्यामध्ये लॉक असतो, त्यास उघडून एयर फिल्टर बाहेर काढला जातो.
अगदी तसेच विंडो एसी मध्ये समोरच्या बाजूला ग्रिल ला बाजूला करून आतील एयर फिल्टर काढता येतो.
एयर फिल्टरच्या मागे बैक्तीरीया फिल्टर असतो. यास देखील सहज बाहेर काढता येते.
या दोन्ही फिल्टर वरील धूळ ब्रश वापरून साफ करा. यानंतर यांना पाण्याने धुवावे आणि स्वच्छ करावे.
धुतल्यामुळे धूळ निघून जाते आणि फिल्टरचे सगळे होल क्लीन होऊन उघडतात.
फक्त 10 मिनिट देऊन तुम्ही हे साफ करू शकता. फिल्टर व्यवस्थित असल्यास एसी मध्ये दुसरी खराबी येण्याची शक्यता कमी होते.
