inspiration

नेहमी सुखी राहायचे आहे तर हा आहे सर्वात सोप्पा उपाय

एक आश्रमात संत आणि त्यांचे शिष्य एकत्र राहत होते. एक दिवस शिष्याने गुरूला सांगितले की गुरुजी एक भक्त आश्रमाला गाय दान देऊन गेला आहे.

त्यावर गुरु म्हणाले, “आता रोज ताजे दुध पिण्यास मिळेल.”

संत आणि त्यांचे शिष्य रोज ताजे दुध सेवन करू लागले. काही दिवसाने शिष्याने गुरुजीला सांगितले की ज्या भक्ताने गाय दिली होती, तो आपली गाय परत घेऊन गेला.

त्यावर गुरु म्हणाले, “आता रोज-रोज गोबर उचलण्याचा त्रास नाही राहीला.”

या गोष्टीचे तात्पर्य एवढेच आहे की परिस्थिती अनुसार आपल्याला आपले विचार बदलले पाहिजेत. नेहमी सकारात्मक विचार केला पाहिजे. हाच सुखी राहण्याचा सर्वोत्तम आणि सोप्पा उपाय आहे.

लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका

वाचा : नोकरी गमवली, वडापाव विकून वर्षाला 4 करोड कमवले


Show More

Related Articles

Back to top button