देव दीपावली 2025 या दिवशी भगवान शिव आणि विष्णूची कृपा मिळवण्यासाठी करा…
soyabean rate today: धनतेरस 2025 ला दोन राशींचं नशीब बदलणार आहे. सूर्यग्रह…
विजयादशमी आजचे राशीभविष्य 2 ऑक्टोबर 2025: 2025 च्या शुभमुहूर्तावर ग्रहस्थिती बदलणार आहे.…

मिथुन ही राशीचक्रातील तिसरी रास असून, ही वायू तत्वाची, चल (चंचल) व द्विराशी आहे. याचे चिन्ह म्हणजे जोडपं – पुरुष आणि स्त्री – जे संवाद, बुद्धिमत्ता व सर्जनशीलतेचे प्रतीक आहे. या राशीत मृगशिरा नक्षत्राचे शेवटचे दोन चरण, आर्द्रा व पुनर्वसू नक्षत्राचे पहिले तीन चरण येतात. बुध हा या राशीचा स्वामी ग्रह आहे, जो वाणी, व्यापार, लेखन आणि बुद्धीचे प्रतिनिधित्व करतो.
मिथुन राशीचे लोक उत्साही, बुध्दीमान, सर्जनशील आणि सामाजिक स्वभावाचे असतात. ते सहज संवाद साधतात आणि त्यांना नवीन गोष्टी जाणून घेण्याची ओढ असते. परिस्थितीनुसार स्वतःला बदलण्यात ते पटाईत असतात. कधी कधी चंचलतेमुळे निर्णय घेण्यात अजाणपणाही दिसतो.
बुध हा या राशीचा स्वामी ग्रह आहे. बुध मुळे या राशीच्या लोकांमध्ये वाणीचा प्रभाव, बौद्धिक क्षमता, गणित, लेखनकौशल्य, व्यवसायिक चातुर्य आणि संवादकला विशेष दिसून येते. ते व्यवहारात चतुर आणि उत्साही असतात.
या राशीचे चिन्ह म्हणजे जुळे – एक पुरुष आणि एक स्त्री. हे चिन्ह द्वैताचे, समतोलाचे आणि संवादाच्या क्षमतेचे प्रतीक आहे. त्यामुळे मिथुन राशीचे लोक बहुतेक वेळा अनेक विचारांत गुंतलेले, पण संवादक्षम आणि सहमती राखणारे असतात.
बुद्धीमत्ता, सामाजिकता, सर्जनशीलता, वक्तृत्वकौशल्य आणि कल्पकता हे या राशीचे प्रमुख गुणधर्म आहेत. हे लोक गप्पिष्ट असतात, नविन ओळखी करण्यात पटाईत आणि बहुआयामी व्यक्तिमत्त्व असतात. ते बहुधा बहुपर्यायी करिअर निवडतात.
या राशीतील व्यक्ती कधी कधी चंचल, अस्थिर, निर्णय घेण्यात विलंब करणारे आणि काहीसे वरवरचे असतात. खूप विचार करूनही त्यातून कृती करत नाहीत. एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे त्यांना कठीण जाते.
संचार, पत्रकारिता, लेखन, विक्री, जाहिरात, मार्केटिंग, शिक्षण, ट्रॅव्हल, आयटी आणि मीडिया क्षेत्रात मिथुन राशीचे लोक यशस्वी होतात. त्यांची संवादकौशल्ये आणि बहुआयामी दृष्टिकोन त्यांच्या करिअरला दिशा देतो.
फुफ्फुसे, खांदे, हात आणि मज्जासंस्था यांच्याशी संबंधित त्रास होण्याची शक्यता अधिक असते. मानसिक थकवा, तणाव, अस्थिर झोप यांसारखे लक्षणेही दिसू शकतात. स्थिर जीवनशैली आणि मानसिक शांततेसाठी ध्यान किंवा योग फायदेशीर ठरतो.
मिथुन राशीचे लोक मनमिळावू, प्रेमळ आणि मजेदार स्वभावाचे असतात. ते आपल्या जोडीदाराशी संवाद ठेवतात आणि नात्याला जिवंत ठेवण्यासाठी नवनवीन कल्पना आणतात. मात्र, त्यांच्या चंचलतेमुळे जोडीदाराने त्यांना समजून घेणे आवश्यक असते.