Breaking News

28 मे 2020 राशीभविष्य: आजचा दिवस या 5 राशींसाठी शुभ राहील बिजनेस वाढवण्याच्या मिळतील संधी

Rashi Bhavishya, May 28: आम्ही आपल्याला गुरुवार 28 मे चे राशी भविष्य (Rashi Bhavishya) सांगत आहोत. राशी भविष्य चे आपल्या जीवना मध्ये महत्व आहे. राशी भविष्य समजल्याने आपल्याला भविष्यात होणाऱ्या घटनांचा अंदाज येतो. राशी भविष्याचे निर्मण ग्रह गोचर आणि नक्षत्र यांच्या चालीच्या आधारावर केले जाते. दररोज आपल्या भविष्यावर परिणाम करत असते. या राशी भविष्या मध्ये आपण नोकरी, व्यवसाय, शिक्षण आणि वैवाहिक जीवन तसेच प्रेम संबंध या बद्दल माहिती जाणून घेऊ शकता. तुम्हाला देखील आजचा दिवस कसा राहील हे जाणून घ्यायचे असेल तर वाचा.

Rashi-Bhavishya-May-28-2020

मेष राशी भविष्य:

प्रत्येकाला मदत करण्याच्या इच्छेमुळे तुम्ही आज थकून जाल, दमून जाल. ही गोष्ट लक्षात घ्या की, दुःखाच्या प्रसंगात तुमचे संचित धनच तुमच्या कामी येईल म्हणून, आजच्या दिवशी धन संचय करण्याचा विचार बनवा. तुम्हाला आज काही समस्या उद्भवतील – पण वास्तववादी राहा आणि मदत करणाºया लोकांकडून चमत्कार घडेल अशी अपेक्षा बाळगू नका. तुमचा प्रेमी आज तुमच्या गोष्टीला ऐकण्यापेक्षा जास्त आपल्या गोष्टी सांगणे पसंत करेल ज्यामुळे तुम्ही थोडे खिन्न होऊ शकतात. तुम्हाला व्यक्त होण्यासाठीचा चांगला काळ आहे. क्रिएटीव्ह स्वरूपाच्या प्रकल्पावर काम करा.

या राशीतील लोकांना आज स्वतःला समजण्याची आवश्यकता आहे. जर तुम्हाला वाटते की, तुम्ही जगातील गर्दीत कुठे हरवलेले आहे तर, आपल्यासाठी वेळ काढा आणि आपल्या व्यक्तित्वाचे आकलन करा. तुमच्या मनातली गोष्ट समजून घेण्यासाठी तुमचा/तुमची जोडीदार पुरेसा वेळ देईल.

वृषभ राशी भविष्य:

संयम बाळगा, आपले निंरतर प्रयत्न आणि समजून घेण्यामुळे आपणास हमखास यशप्राप्ती होणार आहे. तुमच्या द्वारे धन वाचवण्याचे प्रयत्न आज अयशस्वी होऊ शकतात तथापि, तुम्हाला यापासून घाबरण्याची आवश्यकता नाही स्थिती लवकरच सुधारेल. भरपूर आनंदाचा दिवस, जेव्हा तुमचा जोडीदार तुम्हाला खुश करण्याचा प्रयत्न करेल. तुम्हाला काळजी घेणारा आणि समजूतदार मित्र भेटेल.

कधी तुम्ही चॉकलेट, आलं आणि गुलाबाचा एकत्र सुवास घेतला आहे? तुमच्या प्रेमाची चव आज तशीच काहीशी असणार आहे. जीवनात चालणाऱ्या धावपळीमुळे आज तुम्हाला स्वतःसाठी पर्याप्त वेळ मिळेल आणि तुम्ही आपल्या आवडत्या कामाला करण्यात यशस्वी व्हाल. तुमचा/तुमची जोडीदार आज तुमच्यासाठी काहीतरी विशेष करेल.

मिथुन राशी भविष्य:

भीती, चिंता तुमच्या सुखी समाधानी, आनंदी जगण्याला मारक ठरू शकते. आपल्या विचारांमधून आणि कल्पनांमधूनच चिंतेचा जन्म झाला आहे हे तुम्हाला लक्षात ठेवावे लागेल. या चिंतेमुळेच तुमचा उत्स्फूर्तपणा मारला जातो, जगण्याचा आनंद हिरावून घेतला जातो आणि तुमच्या कार्यक्षमता अपंग होते. म्हणून चिंतेचा निर्माण होण्यापूर्वीच तिला मुळातून खुडून टाका. आज अनुभवी आणि नावीन्यपूर्ण कल्पना असलेल्या लोकांच्या सल्ल्यानुसार पैसे गुंतवा. आज यशाचे हेच समीकरण उपयोगी ठरेल. घरगुती प्रश्न आणि प्रलंबित घरगुती कामं पूर्ण करण्यासाठी लाभदायक दिवस.

तुमच्यापुढे लग्नाचा प्रस्ताव आल्याने तुमचे ओझे कमी झाल्यासारखे वाटेल, तुम्ही भारावून जाल. महत्त्वाची कामं कोणाच्याही सहकार्याशिवाय हाताळू शकाल असे जर तुम्हाला वाटत असेल तर ती तुमची सर्वात मोठी चूक असेल. आपल्या जवळच्या लोकांसोबत तुम्हाला वेळ घालवण्याची इच्छा होईल परंतु, तुम्ही असे करण्यात सक्षम होऊ शकणार नाही. वैवाहिक आयुष्याच्या अवघड टप्प्यानंतर आज तुम्हाला सुखाची जाणीव होणार आहे.

कर्क राशी भविष्य:

क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी होऊन तुम्ही शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहाल. ज्या लोकांनी लोन घेतले होते त्यांना त्या कर्जाच्या राशीला चुकवण्यात समस्यांचा सामना करावा लागू शकतो. जुन्या ओळखी आणि संबंधाना उजाळा देण्यासाठी चांगला दिवस. स्वप्नील चिंता सोडून द्या आणि आपल्या रोमॅण्टीक जोडीदाराच्या सहवासाचा आनंद घ्या. तुमच्या कामात तुमच्या विचारांशी-आवडीनिवडींशी मिळत्याजुळत्या व्यक्तींची मदत घ्या.

त्यांनी वेळीच केलेली मदत तुम्हाला फायदेशीर ठरू शकेल. मेडिकल ट्रन्सक्रिप्शनमध्ये काम करणाºयांसाठी दिवस चांगला आहे. दिवसाच्या शेवटी आज तुम्हाला आपल्या घरातील लोकांना वेळ देण्याची इच्छा असेल परंतु, या वेळात घरातील कुणी जवळच्या व्यक्तीसोबत तुमचा वाद होऊ शकतो आणि तुमचा मूड खराब होऊ शकतो. तुमचे असणे हे त्याच्या/ितच्यासाठी किती मौल्यवान आहे, हे तुमचा/तुची जोडीदार आज तुमच्यासमोर शब्दांत व्यक्त करेल.

सिंह राशी भविष्य:

तुमची शारिरीक क्षमता कायम राखण्यासाठी तुम्ही क्रीडा प्रकारांसाठी वेळ खर्च करण्याची शक्यता आहे. जर तुम्ही आपल्या घरातील व्यक्तीकडून काही उधार घेतले असेल तर, आज त्यांना ते परत करा अथवा तुमच्या विरुद्ध ते कोर्टात कार्यवाही करू शकतात. पाहुण्यांशी असभ्य वर्तन करू नका. आपल्या वर्तनामुळे आपल्या कुटुंबियांना मान खाली घालावी लागेलच पण आपल्या नातेसंबंधात बिघाड होऊ शकतो. सायंकाळी तुम्ही जर तुमच्या मित्र/मैत्रिणीबरोबर बाहेर गेलात तर, क्षणिक रोमान्स मिळण्याची शक्यता आहे. भागीदारी संदर्भात कोणताही शब्द देण्यापूर्वी आपल्या अंर्तमनाचा आवाज ऐका. उतावीळपणे कोणताही निर्णय घेऊ नका, अन्यथा त्यामुळे आयुष्यात नंतर पश्चाताप करावा लागेल. तुमचा /तुमची जोडीदार आज तुमच्या टीनएजमधील काही आठवणींना उजाळा देईल, त्यापैकी काही आठवणी खट्याळसुद्धा असू शकतील.

कन्या राशी भविष्य:

स्वत:ला चुस्त तंदुरुस्त ठेवण्यासाठी उच्च कॅलरी आहार टाळा. दिवसाची सुरवात जरी चांगली असली तरी, संद्याकाळच्या वेळी कुठल्या कारणास्तव तुमचे धन खर्च होऊ शकते ज्यामुळे तुम्ही चिंतीत व्हाल. तुमचा मोकळा वेळ मुलांच्या सहवासात घालवा – मग त्यासाठी तुम्हाला नेहमीपेक्षा वेगळी क्लृप्ती करावी लागली तरी चालेल. तुमच्या प्रिय व्यक्तीकेड दुर्लक्ष केल्याने घरात काही तणावाचे क्षण अनुभवास येतील.

तुमच्या वर्चस्वशाली दृष्टिकोनामुळे सहकाºयांकडून टीका होईल. आजच्या दिवशी अनुकूल ग्रहांनी तुम्हाला खुश करण्याची अनेक कारणे आहेत. आज तुम्हाला तुमच्या जाडीदाराची ‘फार चांगली नसलेली’ बाजू पाहायला मिळेल.

तुल राशी भविष्य:

इतरांबरोबर आनंद वाटून घेण्याने आपले आरोग्य बहरून जाईल. आज तुम्हाला आपल्या संतानमुळे आर्थिक लाभ होण्याची शक्यता दिसत आहे यामुळे तुम्हाला बराच आनंद होईल. कुटुंबातील सदस्यांना आपल्या जीवनात विशेष स्थान असेल. प्रदीर्घ काळापासून सुरू असलेल्या भांडण आजच सोडवा. उद्या कदाचित खूप उशीर झालेला असेल. आजच्या दिवशी अटेंड केलेल्या व्याख्यानांमुळे आणि परिसंवादामुळे तुम्हाला प्रगतीसाठी नव्या संकल्पना सुचतील.

आज तुमची व्यस्त दिनचर्या असून ही स्वतःसाठी वेळ काढण्यात समर्थ असाल आणि या रिकाम्या वेळेत आपल्या कुटुंबातील व्यक्तींसोबत चर्चा आणि गप्पा करू शकतात. एखादी अनोळखी व्यक्ती तुमच्यात आणि तुमच्या जोडीदारामध्ये वाद निर्माण करू शकेल.

वृश्चिक राशी भविष्य:

आरोग्याच्या भल्यासाठी उगा त्रागा करु नका. वेळ आणि धन याची कदर तुम्ही केली पाहिजे अथवा येणारी वेळ समस्यांनी भरलेली राहू शकते. आपल्या प्रिय व्यक्तीशी भेटवस्तूंची देवघेव करण्यास अतिशय शुभ दिवस आहे. आजच्या दिवशी मैत्री तुटण्याची शक्यता असल्यामुळे सावध रहा.

महागड्या प्रकल्पावर सही करताना तुमचा सुज्ञपणा वापरा. आपल्या गरजेच्या कामाला पूर्ण करून आज तुम्ही आपल्यासाठी वेळ नक्कीच काढाल परंतु, यावेळचा उपयोग तुम्ही आपल्या हिशोबाने करू शकणार नाही. तुमच्या प्रकृतीबाबत तुमचा/तुमची जोडीदार कदाचित असंवेदनशीलपणे वागेल.

धनु राशी भविष्य:

आजच्या दिवशी तुम्ही आराम करु शकाल. शरीराला तेलाने मसाज करुन तुमचे स्नायू मोकळे करा. आज तुमच्या ऑफिसचा कुणी सहकर्मी तुमची किमती वस्तू चोरू शकतो म्हणून, आज तुम्हाला आपले सामान व्यवस्थित आणि लक्षपूर्वक ठेवण्याची आवश्यकता आहे. नातेवाईक तुमच्यासाठी अनपेक्षित भेटवस्तू आणतील पण तुमच्याकडूनही काही मदतीची अपेक्षा ठेवतील. प्रेमातील असीम आनंद अनुभवण्यासाठी कोणाचा तरी शोध घ्या.

कामाच्या ठिकाणी गतिमान आणि प्रगतीशील बदल करण्यास सहकाºयांचा पाठींबा लाभेल. अर्थात तुम्हाला वेगवान पावले उचलून सर्वांचा आधारस्तंभ होण्याची गरज आहे. आपल्या बरोबरच्या सहकाºयांना प्रोत्साहित करुन कठोर परिश्रम करायला भाग पाडावे लागेल, अर्थात त्यातूनच सकारात्मक फळ मिळणार आहे. एकदम निष्कर्ष काढाला आणि अनावश्यक कृती केल्यास दिवस तापदायक ठरू शकेल. तुमच्या वैवाहिक आयुष्यात सगळीकडे आनंदीआनंद आहे.

मकर राशी भविष्य:

जीवनसाथीच्या आरोग्याकडे योग्य लक्ष देणे आणि देखभाल करण्याची गरज असेल. आर्थिक प्रश्नांमुळे रचनात्मक विचार करण्याची आपली ताकद नष्ट होईल. आपल्या जोडीदाराबरोबर घरगुती प्रलंबित कामे संपविण्यासाठी योग्य ती व्यवस्था करा. तुमच्या जोडीदाराचे मागचे पाच सोशल मीडिया स्टेटस तपासा. तुम्हाला आश्चर्याचा सुखद धक्का बसेल.

तोलामोलाच्या व्यक्तींशी व्यवहार करताना, आपण आज आत्मसात केलेले, अधिकाधिक ज्ञान तुमच्या व्यक्तीमत्त्वाला वेगळीच धार देईल. तुम्ही रिकाम्या वेळचा योग्य उपयोग करण्यासाठी तुम्ही आपल्या जुन्या मित्रांशी भेटण्याचा प्लॅन बनवू शकतात. सातत्याने भांडणे झाल्याने तुम्हाला नातेसंबंध तोडून टाकावेत असे वाटेल. परंतु, इतक्या सहज नातेसंबंध तोडू नका.

कुंभ राशी भविष्य:

तुमचा मत्सरी स्वभाव तुम्हाला खिन्न करील आणि नैराश्याने तुम्ही ग्रासाल. परंतु, ही स्वत: ओढवून घेतलेली जखम आहे. म्हणून कुणाजवळ त्याबाबत बोलण्याची गरज नाही. मत्सरावर मात करण्यास शिकण्यासाठी इतरांची सुख-दु:खे वाटून घ्या, त्यात सहभागी व्हा. धनाने जोडलेल्या काही गोष्टींतून मार्ग निघू शकतो आणि तुम्हाला धन लाभ होऊ शकतो. परदेशस्थ नातेवाईकांकडून मिळालेल्या भेटवस्तूमुळे तुम्हाला आनंद मिळेल. आज तुम्ही आपल्या कुठल्या ही वचनाला पूर्ण करू शकणार नाही ज्यामुळे तुमचा प्रेमी तुमच्याशी नाराज होईल. तुम्हाला तुमची कल्पकता, कलात्मकता हरवून गेल्याचे जाणवेल आणि तुम्हाला निर्णय घेणे खूप कमालीचे जड जाईल. उतावीळपणे कोणताही निर्णय घेऊ नका, अन्यथा त्यामुळे आयुष्यात नंतर पश्चाताप करावा लागेल. तुमचं तुमच्या जोडीदाराशी एखाद्या जुन्या कारणावरून भांडण होईल, उदा. तो/ती तुमचा वाढदिवस विसरणे इत्यादी. पण दिवसाच्या शेवटी सगळं काही व्यवस्थित होईल.

मीन राशी भविष्य:

तुम्हाला शांत ठेवणा-या उपक्रमांमध्ये स्वत:ला गुंतवा. दीर्घकालीन दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून गुंतवणूक करणे गरजेचे आहे. कुटुंबातील सदस्यांच्या आनंदी स्वभावामुळे घरातील वातावरण उत्फूल्ल होईल. तुम्हाला उत्कृष्ट वागणुकीची गरज आहे – कारण तुमचे प्रियकर/प्रेयसी त्यामुळे अस्वस्थ होणार नाहीत. महत्त्वाच्या व्यक्तींशी चर्चा करताना सजग असा एखादी महत्त्वाची टीप मिळून जाईल. आज जीवनसाथी सोबत वेळ घालवण्यासाठी तुमच्या जवळ पर्याप्त वेळ असेल. तुमच्या प्रेमाला पाहून आज तुमचा प्रेमी आनंदित होईल. तुमच्या वैवाहिक आयुष्यात तुमचे नातेवाईक बिब्बा घालतील.

नोट: आपल्या कुंडली आणि राशीच्या ग्रहांच्या आधारावर आपल्या जीवना मध्ये घडणाऱ्या घटना rashi bhavishya 28 May 2020 पेक्षा वेगळ्या होऊ शकतात. संपूर्ण माहितीसाठी आपण कोणत्याही तज्ञ ज्योतिषाचा सल्ला घेऊ शकता.

आपण बारा राशींचे rashi bhavishya 28 May 2020 वाचले. आपल्याला rashi bhavishya 28 May 2020 चे हे राशी भविष्य कसे वाटले? कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया आवश्य द्याव्यात आणि आजचे राशिभविष्य मित्रांसोबत शेयर करावे.

About V Amit

My name is V Amit, I am a blogger, I am the founder of MarathiGold.com. I hope you like the articles written by me.