Breaking News

25 मे 2020 राशी भविष्य: सोमवारी भोलेनाथ या 7 राशीच्या जातकांचा करणार उद्धार, मनोकामना करणार पूर्ण

Rashi Bhavishya, May 25: आम्ही आपल्याला सोमवार 25 मे चे राशी भविष्य (Rashi Bhavishya) सांगत आहोत. राशी भविष्य चे आपल्या जीवना मध्ये महत्व आहे. राशी भविष्य समजल्याने आपल्याला भविष्यात होणाऱ्या घटनांचा अंदाज येतो. राशी भविष्याचे निर्मण ग्रह गोचर आणि नक्षत्र यांच्या चालीच्या आधारावर केले जाते. दररोज आपल्या भविष्यावर परिणाम करत असते. या राशी भविष्या मध्ये आपण नोकरी, व्यवसाय, शिक्षण आणि वैवाहिक जीवन तसेच प्रेम संबंध या बद्दल माहिती जाणून घेऊ शकता. तुम्हाला देखील आजचा दिवस कसा राहील हे जाणून घ्यायचे असेल तर वाचा.

Rashi-Bhavishya-May-24-2020

मेष राशी भविष्य:

तुमचे विनयशील वागण्याबद्दल कौतुक होईल. अनेक लोक तुमच्यावर स्तुतिसुमने उधळतील. धनाचे आगमन आज तुम्हाला बऱ्याच आर्थिक परिस्थितीतून दूर करू शकते. घराच्या सुशोभीकरणाऐवजी मुलांच्या गरजांकडेदेखील लक्ष देणे महत्त्वाचे आहे. शिस्तबद्ध पण मुलं नसलेलं घर निर्जीव ठरते. मुलं घराचं औदार्य आणि आनंद देणारी असतात. काहीजणांसाठी विवाहाचे योग आहेत तर अन्य लोकांना प्रियाराधन करण्यामुळे उत्साह वाटेल.

आपल्या वरिष्ठांना गृहित धरू नका. अनोळखी व्यक्तींसोबत गप्पा करणे ठीक आहे परंतु, त्याची विश्वसनीयता जाणल्याशिवाय तुम्हाला आपल्या जीवनाच्या गोष्टी त्यांना सांगून आपला वेळ वाया घालवाल. आजच्या दिवसाची संध्याकाळ ही तुमच्या जोडीदारासमवते व्यतित केलेली सर्वोत्तम संध्याकाळ असेल

वृषभ राशी भविष्य:

मान अथवा पाठीच्या निरंतर वेदनांचा तुम्हा त्रास होण्याची शक्यता आहे. विशेषत: सर्वसामान्य अशक्तपणाबरोबर जर हा त्रास होत असेल तर दुर्लक्ष करू नका. आजच्या दिवशी विश्रांती अत्यंत गरजेची आहे. तुमची कलात्मक बुद्धिमत्ता नीट वापरली तर खूप फायदेशीर ठरेल. प्रेमातून साहचर्य आणि बॉण्डिंग तयार होईल. दोघांमधील निखळ स्पष्ट समजूतदारपणामुळेच तुम्ही तुमच्या पत्नीस भावनिक आधार देऊ शकाल.

तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्ही जे काही कष्ट घेत होतात, त्यांचे आज चीज होणार आहे. आज घरात कुठल्या पार्टीमुळे तुमचा महत्वाचा वेळ बर्बाद होऊ शकतो. आजचा दिवस तुमच्यासाठी वसंतासारखा बहारदार, रोमान्सने भरलेले असेल ज्यात फक्त तुम्ही आणि तुमचा जोडीदार असे दोघेच असाल.

मिथुन राशी भविष्य:

आज तुमची प्रकृती चांगली राहील. त्यामुळे तुम्हाला यश मिळेल. परंतु, तुमचे सामथ्र्य संपुष्टात येईल असे काही करण्याचे कटाक्षाने टाळा. व्यापारात आज चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. आजच्या दिवशी तुम्ही आपल्या व्यवसायाला नवीन उच्चता देऊ शकतात. आजच्या दिवसाचे खूप काळजीपूर्वक नियोजन करा. आपण ज्यांची मदत घेऊ शकता अशा लोकांशी संवाद साधा.

तुमचे अश्रू पुसण्यासाठी एक खास मित्र/मैत्रीण पुढाकार घेण्याची शक्यता आहे. नवीन प्रकल्प आणि योजना राबविण्यासाठी उत्कृष्ट दिवस. वरच्या पदावरील व्यक्तींपुढे ढोपर घासावे लागेल. तुमचा/तुमची जोडीदार आज तुमची प्रशंसा करेल आणि पुन्हा एकदा तुमच्या प्रेमात पडेल.

कर्क राशी भविष्य:

आपल्या आधारावर अनेक गोष्टी अवलंबून असतील आणि आपल्या मनाची स्पष्टता निर्णय घेण्यासाठी महत्त्वाची असेल. तुमच्या माता पक्षाने आज तुम्हाला धन लाभ होण्याची पूर्ण शक्यता आहे. तुमचे मामा किंवा आजोबा तुमची आर्थिक मदत करण्याची शक्यता आहे. दूरवर राहणारे नातेवाईक आज तुमच्याशी संपर्क साधतील. जे लोक तुमच्या प्रेमी पासून दूर राहतात त्यांना आज आपल्या प्रेमीची आठवण त्रास देऊ शकते.

रात्रीच्या वेळी प्रेमी सोबत तासन तास फोनवर बोलू शकतात. तुमच्या जोडीदाराची एक विस्यमकारक बाजू तुम्हाला आज पाहायला मिळेल. प्रवासासाठी आजचा दिवस फार काही चांगला नाही. तुमच्या कामाला आज दाद मिळेल.

सिंह राशी भविष्य:

बोलण्यापूर्वी दोनवेळा विचार करा. तुमच्या बोलण्यामुळे अनवधानाने कुणाच्या तरी भावना दुखावल्या जातील. दीर्घकालीन दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून गुंतवणूक करणे गरजेचे आहे. मुलांना त्यांचा गृहपाठ पूर्ण करण्यासाठी मदत करा. त्यासाठी वेळ काढा. तुमचे डोळे इतके पाणीदार व तेजस्वी आहेत की तुमच्या प्रिय व्यक्तीची अख्खी रात्र त्यात उजळून जाईल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला प्रत्येकाचे प्रेम आणि सहकार्य लाभेल.

आज तुम्ही वेळ पाहून आपल्यासाठी वेळ काढू शकतात परंतु, ऑफिसच्या कुठल्या कामाच्या कारणास्तव अचानक तुम्ही असे करण्यात अयशस्वी ठराल. क्षुल्लक वाद विसरू जेव्हा तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याजवळ येईल आणि तुम्हाला मिठी मारेल तेव्हा आयुष्य खूपच सुंदर होणार आहे.

कन्या राशी भविष्य:

आयुष्यातील उच्च दर्जाची महानता अनुभवण्यासाठी तुमचे आयुष्य उदात्त बनवा. चिंता करणे विसरून जाणे हे त्यादृष्टीने टाकलेले पहिले पाऊल असेल. जर तुमची धन संबंधित काही गोष्ट कोर्ट-कचेरीत आटलेली असेल तर आज त्यात तुम्हाला विजय मिळू शकतो आणि तुम्हाला धन लाभ ही होऊ शकतो. जीवनसाथीचे आरोग्यामुळे तुम्हाला काळजी वाटेल. प्रेमाचा आनंद घेता येईल.

आज कार्य क्षेत्रात तुमच्या कुणी जुन्या कामाचे कौतुक होऊ शकते. तुमच्या कामाला पाहून आज तुमचे कौतुक आणि प्रगती होण्याची शक्यता आहे. व्यावसायिक आज अनुभवी लोकांसोबत व्यवसायाला पुढे वाढवण्याचा सल्ला घेऊ शकतात. खरेदी मोहीम आणि अन्य कामकाज यातच तुमचा दिवसभरातील भरपूर वेळ खर्च होईल. आज तुम्ही आणि तुमचा जोडीदार खूप रोमँटिक गप्पा माराल.

तुल राशी भविष्य:

तुमचे विनयशील वागण्याबद्दल कौतुक होईल. अनेक लोक तुमच्यावर स्तुतिसुमने उधळतील. आजच्या दिवशी घरातील इलेक्ट्रोनिक वस्तू खराब होण्याच्या कारणाने धन खर्च होऊ शकते. स्वत:च्या खाजगी गोष्टी मार्गी लावण्यासाठी उदारमतवादी दृष्टीकोन ठेवा. मात्र आपल्या बोलण्याने आपली काळजी करणारे कोणी दुखावणार नाही याची दक्षता घ्या. आपल्या प्रेमिकेशी अश्लील चाळे करू नका.

आजच्या दिवशी अटेंड केलेल्या व्याख्यानांमुळे आणि परिसंवादामुळे तुम्हाला प्रगतीसाठी नव्या संकल्पना सुचतील. रिकाम्या वेळात काही पुस्तक वाचू शकतात तथापि, तुमच्या कुटुंबातील इतर सदस्य तुमची एकाग्रता भंग करू शकतात. तुमचा/तुमची तिच्या मित्रमैत्रिणींसमवेत जास्त काळ घालवेल, ज्यामुळे तुम्ही कदाचित अस्वस्थ व्हाल.

वृश्चिक राशी भविष्य:

चांगल्या सुदृढ आरोग्यासाठी लांबवर चालत जा. आजच्या दिवशी आपल्या खर्चावर नियंत्रण मिळवा, चैनीसाठी पैशांची उधळपट्टी होणार नाही याची काळजी घ्या. कुटुंबियांसमवेत शांत आणि स्थिर दिवसाचा आनंद घ्या. इतर लोक त्यांचे प्रश्न घेऊन तुमच्याकडे आले तर त्याकडे दुर्लक्ष करा, त्यांना तुमच्या मानसिक स्थितीला धक्का लावू देऊ नका. डोळे कधीच खोटं बोलत नाहीत आणि तुमच्या जोडीदाराचे डोळे आज तुम्हाला काहीतरी विशेष सांगणार आहेत.

आज केलेली गुंतवणूक लाभदायक असेल, पण आपल्या भागीदाराकडून काहीसा विरोध होण्याची शक्यता आहे. हा दिवस उत्तम दिवसांपैकी एक असतो. आजच्या दिवशी तुम्ही चांगले प्लॅन भविष्यासाठी बनवू शकतात परंतु, संद्याकाळच्या वेळी कुणी दूरच्या नातेवाइक घरात येण्याने तुमचा सर्व प्लॅन बिघडू शकतो. अनेक विषयांवर एकमान्यता होणार नाही त्यामुळे आजचा दिवस खूप चांगला नाही. परिणामी तुमचे नातेसंबंध कमकुवत होतील.

धनु राशी भविष्य:

तुमच्या प्रकृतीची काळजी घ्या. काही जणांसाठी प्रवास केल्याने थकून जाल आणि तणाव वाढला तरी आर्थिकदृष्ट्या फायद्यात राहाल. तुम्ही भागीदारांच्या/जोडीदारांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष केले तर तो/ती असहनशील बनतील. आजचा दिवस प्रेमाच्या रंगात बुडालेला राहील परंतु, रात्रीच्या वेळी कुठल्या जुन्या गोष्टीला घेऊन तुम्ही भांडण करू शकतात.

कामाच्या ठिकाणचे आणि घरातील ताणतणाव तुम्हाल शीघ्रकोपी बनवतील. रिकाम्या वेळेत तुम्ही आज काही खेळ खेळू शकतात परंतु, यावेळेत काही प्रकारची दुर्घटना होण्याची शक्यता आहे म्हणून सावधान राहा. खूप काळानंतर तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत भरपूर वेळ घालवू शकाल.

मकर राशी भविष्य:

अतिखाणे टाळा, तंदुरुस्त राहण्यासाठी हेल्थ क्लबला नियमित जा. अनोळखी कुणी व्यक्ती तुमच्या घरी येऊ शकतो त्यामुळे तुम्हाला सामान खरेदी करावे लागू शकते जे तुम्ही पुढील महिन्यात खरेदी करणार होते. पाहुण्यांचा सहवास आनंददायी असणारा दिवस. आपल्या नातेवाईकांसाठी काहीतरी खास योजना आखा, ते नक्कीच तुमचे कौतुक करतील. प्रणयराधना तुमच्या हृदयावर राज्य करील. तुमच्याकडे उच्च ऊर्जाक्षमता आहे ती तुम्ही व्यावसायिक यशशिखरे गाठण्यासाठी वापरायला हवी. या राशीतील लोकांना आज मद्यपान आणि सिगारेट पासून दूर राहण्याची आवश्यकता आहे कारण, यामुळे तुमचा महत्वाचा वेळ खराब होऊ शकतो. तुम्ही तुमच्या आयुष्यातला एक उत्तम दिवस तुमच्या जोडीदारासमवेत व्यतित कराल.

कुंभ राशी भविष्य:

निव्वळ मजा, आनंद तुम्ही लुटू शकाल – कारण आयुष्य संपूर्ण मजेत घालवणे हाच तुमचा विचार असतो. काही महत्त्वाच्या योजना मार्गी लागल्यामुळे आपणास नव्याने अर्थसहाय्य उपलब्ध होईल. नातवंडे ही आपल्यासाठी अपरिमित आनंदाचा स्रोत असतील. रोमान्ससाठी चांगला दिवस. कामकाजाच्या ठिकाणी होणा-या बदलांमुळे तुम्हाला फायदा होईल. लोकांसोबत बोलण्यात आज तुम्ही आपले बहुमूल्य वेळ वाया घालू शकतात. तुम्हाला असे करण्यापासून बचाव केला पाहिजे. तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला एकमेकांच्या बाहुपाशात गुरफटून जाण्यासाठी आज भरपूर वेळ मिळणार आहे.

मीन राशी भविष्य:

तुम्ही संपूर्ण आराम करायला हवा अन्यथा थकव्यामुळे तुमच्या निराशावादी दृष्टिकोन कार्यरत होऊ शकतो. चढउतारांमुळे फायदा होईल. घरातील कामं पुरी करण्यासाठी मुलं तुम्हाला मदत करतील. प्रणयराधन करण्याच्या आठवणींनी तुमचा दिवस व्यापून राहील. कार्य क्षेत्रात तुमचा प्रतिद्वंदी आज तुमच्या विरुद्ध कट रचू शकतो म्हणून, आज तुम्हाला डोळे आणि कान उघडून काम करण्याची आवश्यकता आहे. आज आपल्या प्रेमी सोबत वेळ घालवू शकाल आणि त्यांच्या समोर आपल्या गोष्टींना व्यक्त करू शकाल. तुमचा/तुमची जोडीदार आज तुमच्यासाठी काहीतरी विशेष करेल.

नोट: आपल्या कुंडली आणि राशीच्या ग्रहांच्या आधारावर आपल्या जीवना मध्ये घडणाऱ्या घटना rashi bhavishya 25 May 2020 पेक्षा वेगळ्या होऊ शकतात. संपूर्ण माहितीसाठी आपण कोणत्याही तज्ञ ज्योतिषाचा सल्ला घेऊ शकता.

आपण बारा राशींचे rashi bhavishya 25 May 2020 वाचले. आपल्याला rashi bhavishya 25 May 2020 चे हे राशी भविष्य कसे वाटले? कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया आवश्य द्याव्यात आणि आजचे राशिभविष्य मित्रांसोबत शेयर करावे.

About V Amit

My name is V Amit, I am a blogger, I am the founder of MarathiGold.com. I hope you like the articles written by me.