Breaking News
Home / राशिफल / 21 फेब्रुवारी राशी भविष्य: आज आहे महाशिवरात्रीचा दिवस, या 6 राशींना मिळणार भगवान शंकराचे आशीर्वाद

21 फेब्रुवारी राशी भविष्य: आज आहे महाशिवरात्रीचा दिवस, या 6 राशींना मिळणार भगवान शंकराचे आशीर्वाद

Rashi Bhavishya, February 21: आम्ही आपल्याला शुक्रवार 21 फेब्रुवारी चे राशी भविष्य (Rashi Bhavishya) सांगत आहोत. राशी भविष्य चे आपल्या जीवना मध्ये महत्व आहे. राशी भविष्य समजल्याने आपल्याला भविष्यात होणाऱ्या घटनांचा अंदाज येतो. राशी भविष्याचे निर्मण ग्रह गोचर आणि नक्षत्र यांच्या चालीच्या आधारावर केले जाते. दररोज आपल्या भविष्यावर परिणाम करत असते. या राशी भविष्या मध्ये आपण नोकरी, व्यवसाय, शिक्षण आणि वैवाहिक जीवन तसेच प्रेम संबंध या बद्दल माहिती जाणून घेऊ शकता. तुम्हाला देखील आजचा दिवस कसा राहील हे जाणून घ्यायचे असेल तर वाचा .

मेष राशी:

तुमचे आरोग्य आणि ऊर्जा बचतीची सवय तुम्हाला दीर्घ काळ प्रवासाच्या योजनेसाठी फायदेशीर ठरेल. अतिशय व्यस्त असूनही तुम्ही आरोग्य चांगले राखल्यामुळे थकवा येणार नाही. हुशारीने गुंतवणूक करा. आपल्या कुटुंबियांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत हे लक्षात ठेऊन आपल्या रागावर नियंत्रण ठेवा. प्रणयराधना करण्याची भावना जोडिदाराकडून आज अनुभवता येईल. आजचा दिवस अनकूल आहे. कामाच्या ठिकाणी त्याचा जास्तीत जास्त फायदा करून घ्या. तुम्ही स्वतःला वेळ देणे जाणतात आणि आज तुम्हाला बराच रिकामा वेळ मिळण्याची शक्यता आहे. रिकाम्या वेळात आज तुम्ही काही खेळ खेळू शकतात किंवा जिममध्ये जाऊ शकतात. आजचा दिवस तुमच्या वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस असले.

वृषभ राशी:

कार्यालयातून लवकर बाहेर पडण्याचा प्रयत्न करा आणि तुमच्या मौजमजा, विरंगुळ्यासाठी वेळ खर्च करा. दिवसाच्या उत्तरार्धात आर्थिक स्थिती सुधारेल. सुखद आणि अनोखी संध्याकाळ साजरी करण्यासाठी तुमच्या घरी नातेवाईकांची गर्दी होईल. प्रिय व्यक्तीचा सहवास नसल्यामुळे तुम्हाला रिकामपण वाटेल. व्यावसायिक भागीदार चांगला आधार देतील, आणि तुम्ही दोघे मिळून प्रलंबित कामे पूर्ण कराल. आज तुम्ही ऑफिस मधून परत येऊन आपले आवडते काम करू शकतात. यामुळे मनाला शांती मिळेल. आज तुमच्या जोडीदाराची प्रकृती खालावल्यामुळे तुम्ही तणावाखाली याल.

Rashi Bhavishya 21 feb 2020
राशी भविष्य 21 फेब्रुवारी 2020

मिथुन राशी:

संयम बाळगा, आपले निंरतर प्रयत्न आणि समजून घेण्यामुळे आपणास हमखास यशप्राप्ती होणार आहे. स्थावर जंगम मालमत्ता गुंतवणूक लाभदायी ठरेल. आजच्या दिवसाचे खूप काळजीपूर्वक नियोजन करा. आपण ज्यांची मदत घेऊ शकता अशा लोकांशी संवाद साधा. आपल्या प्रियसी/प्रियकराबरोबर असताना नाटकीपणाने वागून आपल्या मूळ स्वभावात वागणुकीत बदल करु नका. महत्त्वाचे प्रकल्प वेळेवर पूर्ण केल्यामुळे व्यावसायिकदृष्ट्या तुम्हाला भरघोस नफा मिळेल. आपण आपल्या मालकीच्या वस्तूंबाबत निष्काळजी असाल तर त्या गहाळ अथवा चोरी होऊ शकतात. तुमच्या मनातली गोष्ट समजून घेण्यासाठी तुमचा/तुमची जोडीदार पुरेसा वेळ देईल.

कर्क राशी:

उच्च कॅलरी असणारा आहार टाळा, ठरलेला व्यायाम आजिबात टाळू नका. अचानक पैसा आल्याने तुमची प्रलंबित बिले आणि ताबडतोब करावयाचे खर्च भागतील. घरातील आयुष्य शांततापूर्ण आणि मोहक असेल. प्रेम म्हणजे देवाजी पुजा करण्यासाखेच आहे; ते आध्यात्मिक आणि धार्मिकही आहे. तुम्हाला आज हे कळेल. थोड्या काळासाठीच्या प्रशिक्षण वर्गात आपले नाव नोंदवा, नवे तंत्रज्ञान शिकणे आणि आपले कौशल्य वाढविण्यास त्याचा फायदा होईल. पैसा, प्रेम, कुटुंब यापासून दूर होऊन आज तुम्ही आनंदाच्या शोधात कुठल्या आध्यत्मिक गुरु सोबत भेटायला जाऊ शकतात. अनेक विषयांवर एकमान्यता होणार नाही त्यामुळे आजचा दिवस खूप चांगला नाही. परिणामी तुमचे नातेसंबंध कमकुवत होतील.

सिंह राशी:

तुमची ऊर्जा पातळी खूप उच्च असेल. तुम्ही जीवनात पैश्याची किंमत समजत नाही परंतु, आज तुम्हाला पैश्याची किंमत समजू शकते कारण, आज तुम्हाला पैश्याची अत्यंत आवश्यकता असेल परंतु तुमच्याकडे पर्याप्त धन नसेल. कुणीतरी तुम्हाला त्रास देण्यास कारणीभूत ठरेल – तुमच्या विरोधात काही शक्ती कार्यरत झाल्या आहेत – संघर्षाची स्थिती निर्माण होईल अशी कृती करण्याचे तुम्ही टाळा – तुमची बाजू वरचढ ठरवायची असेल तर तुम्हाला अतिशय सुयोग्यरित्या मार्ग अवलंबावा लागेल. प्रेमाचा आनंद घेता येईल. तुम्हाला व्यक्त होण्यासाठीचा चांगला काळ आहे. क्रिएटीव्ह स्वरूपाच्या प्रकल्पावर काम करा. आज कुठल्या सहकर्मी सोबत तुम्ही संद्याकाळच्या वेळी वेळ घालवू शकतात तथापि, शेवटी तुम्हाला शेवटी वाटेल की, तुम्ही त्यांच्यासोबत वेळ खराब केला. आज तुम्ही तुमच्या जोडीदाराने केलेल्या प्रेमाच्या वर्षावामुळे आयुष्यातील सगळे कष्ट विसरून जाल.

कन्या राशी:

कार्यालयातून लवकर बाहेर पडण्याचा प्रयत्न करा आणि ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात त्याच करा. महत्त्वाच्या आर्थिक करारांच्या वेळी आकस्मिक विचार करून निर्णय घेऊ नका. तुमच्यापैकी काही जण दागदागिने खरेदी कराल किंवा गृहोपयोगी वस्तुची खरेदी संभवते. अतिमधुर सुंदर आवाजाच्या व्यक्तीशी भेट होण्याची खूप दाट शक्यता आहे. तुमचे ग्रहतारे आज तुम्हाला अतिरिक्त ताकद प्राप्त करून देतील – म्हणून महत्त्वाचे निर्णय आणि प्रदीर्घ काळ फायदा देणारे निर्णय आजच घ्या. रिकाम्या वेळेचा योग्य वापर करणे तुम्हाला शिकावे लागेल अथवा जीवनात तुम्ही बऱ्याच लोकांच्या मागे राहाल. हा तुमच्या वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस असणार आहे. आज तुम्हाला प्रेमाच्या परमानंदाची अनुभूती येईल.

तुल राशी:

सामाजिक आयुष्यापेक्षा आरोग्याला प्राथमिकता द्यावी लागेल. मागच्या दिवसात तुम्ही जितके धन आजचा काळ उत्तम बनवण्यासाठी गुंतवणूक केली होती त्याचा फायदा आज तुम्हाला मिळू शकतो. आपल्या पत्नीच्या सफलतेचे कौतुक करा, तिच्या यशाने आनंदी व्हा आणि उज्ज्वल भविष्याची कामना करा. कृतज्ञतेने आणि मनापासून तिच्या कामाचे कौतुक करा. आज दिवसभर तुमचे प्रेम बहरत जाणार आहे. तुमच्या कामाला आज दाद मिळेल. मन रिझविण्यासाठी, मनोरंजनासाठी चांगला दिवस. तुमचे वैवाहिक आयुष्य एका सुंदर टप्प्यावर येऊन पोहोचेल.

वृश्चिक राशी:

ध्यानधारणा आराम मिळवून देईल. लोकांना नेमके काय हवेय हे समजावून घ्या आणि तुमच्याकडून काय हवे आहे तेही समजून घ्या – परंतु आज खर्च करताना उधळपट्टी करू नका. तुमच्या दुराग्रही वागण्यामुळे घरातील लोक दुखावतील आणि त्याचबरोबर तुमचे जवळचे मित्रही दुखावले जातील. प्रियजनांसमवेत छोट्या सुट्टीची मजा लुटायला निघालेल्यांसाठी ही सुट्टी संस्मरणीय ठरेल. कामाच्या ठिकाणी सर्वकाही तुम्हाला अनुकूल असेल. ही अशी वेळ आहे की, जेव्हा तुम्ही स्वतःला वेळ देण्याचा प्रयत्न कराल परंतु, तुम्हाला स्वतःसाठी वेळ मिळणार नाही. आज तुम्ही तुमच्या जोडीदाराने केलेल्या प्रेमाच्या वर्षावामुळे आयुष्यातील सगळे कष्ट विसरून जाल.

धनु राशी:

नैराश्याच्या जाणीवेला तुमच्यावर हावी होऊन देऊ नका. जे लोक लघु उद्योग करतात त्यांना आजच्या दिवशी आपल्या कुठल्या ही जवळच्या लोकांचा सल्ला मिळू शकतो. ज्यामुळे आर्थिक लाभ ही मिळण्याची शक्यता आहे. तुमचा मोकळा वेळ मुलांच्या सहवासात घालवा – मग त्यासाठी तुम्हाला नेहमीपेक्षा वेगळी क्लृप्ती करावी लागली तरी चालेल. थोड्या फार अडचणींच्या व्यतिरिक्त ही आज तुमचे प्रेम जीवन चांगले राहील आणि तुम्ही आपल्या जोडीदाराला खुश ठेवण्यात यशस्वी व्हाल. तुमचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शांतपणे काम करा आणि तुम्ही त्यात यशस्वी होईपर्यंत तुमच्या हेतूबद्दल कुणाला काही सांगू नका. आजच्या दिवशी अनुकूल ग्रहांनी तुम्हाला खुश करण्याची अनेक कारणे आहेत. तुमच्या जोडीदारासमवेत रोमान्स करण्यासाठी आज दिवस खूप चांगला आहे.

मकर राशी:

आपल्या अनुमान न लावता येणा-या स्वभावाचा परिणाम आपल्या वैवाहिक आयुष्याला हानीकारक ठरणार नाही याची दक्षता घ्या. शक्यतो हे टाळण्याचा प्रयत्न करा, अन्यथा नंतर तुम्हाला पश्चाताप करावा लागू शकतो. अचानक पैसा आल्याने तुमची प्रलंबित बिले आणि ताबडतोब करावयाचे खर्च भागतील. आज तुमच्या कृतीमुळे तुमच्यासोबत राहात असलेली व्यक्ती प्रचंड त्रासून जाईल. प्रिय व्यक्ती सोबत वेळ खर्च करून एकमेकांना समजून घेण्याची गरज आहे. तुमच्या वर्चस्वशाली दृष्टिकोनामुळे सहकाºयांकडून टीका होईल. तुम्ही मागील काळात बरेच काम अपूर्ण सोडलेले आहे त्याची भरपाई आज तुम्हाला करावी लागू शकते. आज तुमचा रिकामा वेळ ही ऑफिसचे काम पूर्ण करण्यात जाईल. तुम्ही विवाहित झाल्याने नशीबवान ठरला आहात, असे तुम्हाला वाटेल.

कुंभ राशी:

तुमच्यात आज उत्तम स्पुर्ती पहिली जाईल. तुमचे स्वास्थ्य आज पूर्णतः तुमची साथ देतील. तुम्ही जर अधिक धनप्राप्तीची अपेक्षा करत असाल तर सुरक्षित अशाच आर्थिक योजनांमध्ये पैसे गुंतवा. घरातील कामं पुरी करण्यासाठी मुलं तुम्हाला मदत करतील. भूतकाळातील आनंदी क्षणांध्ये तुम्ही गुंतून जाल. तुमच्याकडे खूप काही मिळविण्याची क्षमता आहे – म्हणून मिळणा-या सर्व संधींचे सोने करा. मन रिझविण्यासाठी, मनोरंजनासाठी चांगला दिवस. आजचा दिवस अनकूल आहे. कामाच्या ठिकाणी त्याचा जास्तीत जास्त फायदा करून घ्या.

मीन राशी:

आज तुम्हाला अनेक तणावांचा सामना करावा लागण्यीच शक्यता आहे आणि मतभेद झाल्यामुळे तुम्ही त्रासून जाल, अस्वस्थ व्हाल. अधिकचा पैसा स्थावर जंगम मालमत्तेत गुंतवा. आपल्या जुन्या मित्राच्या भेटीमुळे आजची सायंकाळ बहरून जाईल. सोनेरी दिवसांच्या बालपणीच्या रम्य आठवणीत रंगून जाल. एकाच जागी उभं राहूनही प्रेम तुम्हाला एका वेगळ्या जगात घेऊन जाईल. आज तुम्ही धुंद प्रेमसफरीवर जाणार आहात. करिअरविषयक संधी अधिक विस्तारण्यासाठी तुमची व्यावसायिक ताकद वापरा. तुम्ही असलेल्या क्षेत्रात तुम्हाला अमर्यादित फायदा मिळण्याची शक्यता आहे. वरचढ ठरण्यासाठी कौशल्य विकसित करण्यात स्वत:ला गुंतवून घ्या. परिसंवाद आणि प्रदर्शनांना भेट दिल्याने तुमच्या ज्ञानात भर पडले तसेच तुमचा नवीन लोकांशी संपर्क होईल. जेव्हा तुमचा/तुमची जोडीदार विस्मयकारक असते/असतो तेव्हा आयुष्य मोहक असते, तुम्ही आज हाच अनुभव घेणार आहात.

नोट : आपल्या कुंडली आणि राशीच्या ग्रहांच्या आधारावर आपल्या जीवना मध्ये घडणाऱ्या घटना rashi bhavishya 20 February 2020 पेक्षा वेगळ्या होऊ शकतात. संपूर्ण माहितीसाठी आपण कोणत्याही तज्ञ ज्योतिषाचा सल्ला घेऊ शकता.

आपण बारा राशींचे rashi bhavishya 20 February 2020 वाचले. आपल्याला rashi bhavishya 20 February 2020 चे हे राशी भविष्य कसे वाटले? कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया आवश्य द्याव्यात आणि आजचे राशिभविष्य मित्रांसोबत शेयर करावे.

About V Amit