Breaking News

16 मे 2020 राशीभविष्य: शनीची उलटी चाल, या 3 राशींची करणार वाईट स्थिती, आरोग्याबद्दल राहा सावध…

Rashi Bhavishya, May 16: आम्ही आपल्याला शनिवार 16 मे चे राशी भविष्य (Rashi Bhavishya) सांगत आहोत. राशी भविष्य चे आपल्या जीवना मध्ये महत्व आहे. राशी भविष्य समजल्याने आपल्याला भविष्यात होणाऱ्या घटनांचा अंदाज येतो. राशी भविष्याचे निर्मण ग्रह गोचर आणि नक्षत्र यांच्या चालीच्या आधारावर केले जाते. दररोज आपल्या भविष्यावर परिणाम करत असते. या राशी भविष्या मध्ये आपण नोकरी, व्यवसाय, शिक्षण आणि वैवाहिक जीवन तसेच प्रेम संबंध या बद्दल माहिती जाणून घेऊ शकता. तुम्हाला देखील आजचा दिवस कसा राहील हे जाणून घ्यायचे असेल तर वाचा.

Rashi-Bhavishya-May-16-2020

मेष राशी भविष्य:

पुन्हा ऊर्जा मिळविण्यासाठी संपूर्ण विश्रांती घ्या. व्यापारात नफा आज बऱ्याच व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणू शकतो. भरपूर आनंदाचा दिवस, जेव्हा तुमचा जोडीदार तुम्हाला खुश करण्याचा प्रयत्न करेल. खाजगी घडामोडी संपूर्ण नियंत्रणाखाली राहतील. परिसंवाद आणि प्रदर्शनांना भेट दिल्याने तुमच्या ज्ञानात भर पडले तसेच तुमचा नवीन लोकांशी संपर्क होईल. तुमच्या जोडीदारासमवेत रोमान्स करण्यासाठी आज दिवस खूप चांगला आहे. थंड पाणी पिणे आज तुमच्या आरोग्याला खराब करू शकते.

वृषभ राशी भविष्य:

तुमच्या इच्छा प्रत्यक्षात येण्यासाठी तुमचे विचार आणि ऊर्जा वापरा, केवळ कल्पनाविश्वात रमण्यात काहीही अर्थ नाही. तुम्ही केवळ विचार करता, प्रयत्न करत नाही हा तुमचा खरा प्रश्न आहे. घराच्या दृष्टीने केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल. कुटुंबातील सदस्यांसमवेत काही निवांत क्षण घालवा. तुमचे प्रेम एक वेगळी उंची गाठेल. तुमच्या प्रेमाच्या हसण्याने आजचा दिवस सुरू होईल आणि एकमेकांच्या स्वप्नांनी शेवट होईल.

या राशीतील व्यक्ती रिकाम्या वेळेत आज कुठल्या ही समस्यांचे समाधान करण्याचा प्रयत्न करू शकतात. तुमचा/तुमची जोडीदार आज खूप छान मूडमध्ये आहे. आजचा दिवस तुमच्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस व्हावा यासाठी फक्त तुम्ही त्याला/तिला थोडीशी मदत करण्याची गरज आहे. अकर्मण्यता पराजयाचे मूळ आहे. ध्यान व योगाभ्यास करून तुम्ही या मुळाला दूर करू शकतात.

मिथुन राशी भविष्य:

आजच्या दिवशी आराम करणे अत्यंत गरजेचे आहे. गेले काही दिवस अनेक प्रकारे मानसिक तणावात असल्यामुळे, थोडी मौज मजा, करमणूक केल्याने तुम्हाला चांगला आराम लाभेल. जीवनसाथीच्या आरोग्य संबंधित समस्यांमुळे तुमचे धन खर्च होऊ शकते परंतु, तुम्हाला या विषयी चिंता करण्याची आवश्यकता नाही कारण, धन यासाठीच साठवले जाते की, ते कठीण वेळेत आपल्या कामी येईल. मुलांमुळे आजचा दिवस खूप कठीण होण्याची शक्यता आहे. त्यांच्याशी वात्सल्याने वागा आणि त्यांच्यावरील अनावश्यक ताण दूर करुन त्यांचा इंटरेस्ट कायम ठेवा.

प्रेमानेच प्रेम वाढते हे कायम लक्षात ठेवा. प्रणयराधना तुमच्या हृदयावर राज्य करील. ज्या नात्याला तुम्ही महत्व देतात त्यांना वेळ देणे ही तुम्हाला शिकावे लागेल अथवा नाते तुटू शकतात. आज, तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत आयुष्यातली एक उत्तम संध्याकाळ व्यतीत कराल. आरोग्याच्या दृष्टीने पळणे/ धावणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल कारण, हे फ्री आणि उत्तम एक्सरसाईझ आहे.

कर्क राशी भविष्य:

चांगले इंटरेस्टिंग वाचन करून तुमच्या मनाला, विचारांना खाद्य पुरवा. दुस-यांच्या शब्दावर विसंबून तुम्ही गुंतवणूक केलीत तर आज आर्थिक तोटा होण्याची शक्यता आहे. आपल्या कुटुंबियांबद्दल कायम आपुलकीने वागा, त्यांच्यासोबत प्रेमाचे आनंदाचे चार क्षण व्यतीत करा. तुमची प्रिय व्यक्ती वचन मागणार आहे. आज तुमच्याजवळील उत्तम संकल्पना आणि तुम्ही केलेल्या कृती यामुळे तुमच्या अपेक्षेच्या बाहेर तुम्हाला फायदा होईल. एका मिठीचे आरोग्यावर होमाणे चांगले परिणाम तुम्हाला माहीतच असतील. तुमच्या जोडीदार आज तुम्हाला या परिणामांची अनुभूती अनेकदा देणार आहे. लहान व्यावसायिक आज आपल्या कर्मचाऱ्यांना आनंदी करण्यासाठी त्यांना पार्टी देऊ शकतात.

सिंह राशी भविष्य:

नैराश्याच्या जाणीवेला तुमच्यावर हावी होऊन देऊ नका. आज तुम्ही धन संबंधाने जोडलेल्या समस्यांच्या कारणाने चिंतीत राहू शकतात यासाठी तुम्हाला आपल्या कुठल्या विश्वासपात्रचा सल्ला घेतला पाहिजे. राग हा केवळे काही काळापुरता केलेला वेडेपणा असतो, पण त्यामुळे तुम्ही संकटात सापडू शकता, याची जाणीव ठेवा. आपल्या प्रियजनांबरोबर वेळ जाता जाणार नाही.

वेळेचा सदुपयोग करण्यासाठी आज तुम्ही पार्क मध्ये फिरायला जाण्याचा प्लॅन बनवू शकतात परंतु, तिथे कुणी अज्ञात व्यक्ती सोबत वाद होण्याची शक्यता आहे ज्यामुळे तुमचा मूड खराब होईल. तुमच्या कुटुंबीयांसमवेत तुमचे वाद होतील, पण िदवसाच्या शेवटी तुमचा/तुमची जोडीदार तुम्हाला प्रेमाने कुरवाळेल. आनंद तुमच्यामध्ये लपलेला आहे आज फक्त तुम्हाला आपल्या मध्ये डोकावण्याची आवश्यकता आहे.

कन्या राशी भविष्य:

चांगल्या प्रकृतीमुळे तुम्ही क्रीडा स्पर्धेत सहभाग घेऊ शकाल. आर्थिक रूपात आज तुम्ही बरेच मजबूत असाल ग्रह नक्षत्रांच्या चालीने आज तुमच्यासाठी धन कमावण्यासाठी बरीच संधी मिळेल. भरपूर आनंदाचा दिवस, जेव्हा तुमचा जोडीदार तुम्हाला खुश करण्याचा प्रयत्न करेल. क्षुल्लक कडवट गोष्टींना प्रेमामध्ये माफ करा. तुमचे घरातील व्यक्ती आज बऱ्याच समस्या शेअर करतील परंतु, तुम्ही आपल्या धून मध्ये मस्त राहाल आणि रिकाम्या वेळात काही असे कराल जे तुम्हाला आवडते.

तुमचा जोडीदार यापूर्वी इतका छान कधीच नव्हता. आज तुमच्या जवळ पर्याप्त वेळ असण्याची शक्यता आहे परंतु, या किमती क्षणांना स्वप्नात ठेऊ नका. काही उत्तम गोष्टी करणे येणाऱ्या सप्ताहासाठी उत्तम सिद्ध होईल.

तुल राशी भविष्य:

कोणत्याही प्रकारे तुमची ताकद कमी पडतेय असे नाही तर तुमची इच्छाशक्ती कमी पडतेय. तुमची ख-या क्षमता काय आहेत ते ओळखा. जमीन किंवा कुठल्या प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करणे आज तुमच्यासाठी घातक होऊ शकते जितके शक्य असेल तितके या गोष्टींमध्ये गुंतवणूक करण्यापासून सावध राहा. तुमच्यापैकी काही जण दागदागिने खरेदी कराल किंवा गृहोपयोगी वस्तुची खरेदी संभवते.

कोणीतरी मागणी घालण्याची शक्यता आपल्या पत्रिकेत दिसून येते. व्यक्तिमत्व सुधारण्यावर केलेल्या प्रयत्नांचे समाधानकारक फळ मिळेल. तुमचा/ तुमची जोडीदार तुम्हाला जाणवून देईल की पृथ्वीवरच खरा स्वर्ग आहे. जर तुम्ही आपल्या दिवसाचा व्यवस्थित सदुपयोग केला तर, तुम्ही रिकाम्या वेळेचा चांगला सदुपयोग करून बरीच कामे करू शकतात.

वृश्चिक राशी भविष्य:

व्यायामाच्या आधारे आपण आपले वजन नियंत्रणात ठेवू शकता. विचार न करता कुणाला ही आपला पैसा देऊ नका तुम्हाला येणाऱ्या काळात मोठी समस्या येऊ शकते. तुम्ही एखाद्या सोहळ्याला गेलात तर नवीन मित्रमंडळी, नवीन व्यक्तींच्या ओळखी होतील आणि तुमचा मित्रपरिवार विस्तारेल. आपल्या प्रिय व्यक्तीचे अस्थिर अनियंत्रित वागणे रोमॅण्टीक दिवसाचे वाटोळे करू शकतो. रात्रीच्या वेळी आज तुम्ही घरातील लोकांपासून दूर राहून घरातील गच्चीवर किंवा कुठल्या पार्क मध्ये फिरणे पसंत कराल. आज तुमच्या जोडीदाराची प्रकृती खालावल्यामुळे तुम्ही तणावाखाली याल. व्यवसायात नफा या राशीतील व्यावसायिकांसाठी आज उत्तम स्वप्न खरे होण्यासारखे असेल.

धनु राशी भविष्य:

तुम्ही संपूर्ण आराम करायला हवा अन्यथा थकव्यामुळे तुमच्या निराशावादी दृष्टिकोन कार्यरत होऊ शकतो. काही अटकळी आणि अनपेक्षित लाभांमुळे आर्थिक परिस्थिती सुधारू शकेल. तुम्ही जर अधिक उदारपणे वागत असाल तर तुमच्या जवळच्या व्यक्ती तुमचा गैरफायदा घेण्याची शक्यता आहे. प्रियजनांसोबत मेणबत्तीच्या प्रकाशात अन्नसेवनाचा आनंद लुटा.

या राशीतील मुले खेळण्यात दिवस घालवू शकतात अश्यात माता-पिताला त्यांच्यावर लक्ष दिले पाहिजे कारण, दुखापत होण्याची शक्यता आहे. तुमच्या आजुबाजूची माणसं असं काहीतरी करतील, ज्यामुळे तुमचा/तुमची जोडीदार पुन्हा एकदा तुमच्या प्रेमात पडेल. पैश्याला इतके महत्व देऊ नका की, तुमचे नाते खराब होईल. ही गोष्ट लक्षात ठेवा की, धन मिळू शकते परंतु नाते कधीच नाही.

मकर राशी भविष्य:

कदाचित आपणास अडचणींचा सामना करावा लागू शकतो, त्यामुळे आपले संतुलन ढळू देऊ नका. अन्यथा तुम्ही गंभीर संकटात अडकाल. विशेषत: आपल्या रागावर नियंत्रण मिळवा, कारण तो एक प्रकारचा वेडेपणाच आहे. मोठया योजना आणि चांगल्या संकल्पना असलेली व्यक्ती तुमचे लक्ष वेधून घेईल – त्या व्यक्तिची विश्वासनीयता तपासून पाहा आणि नंतरच त्या योजनेत गुंतवणूक करा. शेजा-याशी झालेल्या भांडणामुळे तुमचा मूड खराब होईल. परंतु, तुमच्या रागावर नियंत्रण मिळवा कारण त्यामुळे आगीत तेल ओतले जाईल.

तुम्ही भांडणात सहकार्य केले नाही तर तुमच्याशी भांडायला कुणी येणार नाही. संबंध चांगले, सौहार्दपूर्ण ठेवण्यासाठी प्रयत्न करा. प्रेमात निराशा पदरी येण्याची शक्यता आहे, पण आपण हार मानू नका, प्रेमीजन कदापि खुशामतीला भुलत नाहीत. आज तुम्ही स्वत:ची परीक्षा पाहाल – तुमच्यापैकी काही जण बुद्धिबळ खेळतील – कोडी सोडवतील आणि अन्य काहीजण कथा-कविता लेखन करतील किंवा भविष्यातील काही योजनांचे बेत आखतील. आज तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी घडणार नाहीत, पण तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत चांगला वेळ घालवाल. आपल्या मनात आज आपल्या कुणी खास व्यक्तीला घेऊन नाराजी राहील.

कुंभ राशी भविष्य:

विश्रांती, विरंगुळ्यासाठी तुमच्या प्रिय मित्रमंडळींसमवेत वेळ घालवा. करमणूक आणि कॉस्मेटिक सुधारणांवर प्रमाणाच्या बाहेर खर्च करू नका. तुमच्या जवळच्या माणसांबरोबर कोणताही वादविवाद छेडू नका. जर वादग्रस्त मुद्दे असतील तर ते परस्परसंमतीने सोडवता येतात. आज तुम्ही आपल्या जीवनातील चिंतेला आपल्या संगी सोबत व्यक्त करण्याची इच्छा ठेवाल परंतु, ते आपल्या चिंतेच्या बाबतीत माहिती करून तुम्हाला अधिक जास्त चिंतीत करू शकतात.

तुम्ही स्वतःला वेळ देणे जाणतात आणि आज तुम्हाला बराच रिकामा वेळ मिळण्याची शक्यता आहे. रिकाम्या वेळात आज तुम्ही काही खेळ खेळू शकतात किंवा जिममध्ये जाऊ शकतात. जर तुमच्या आयुष्याला नियंत्रित करण्यासाठी तुम्ही इतरांना तुमच्या जोडीदारापेक्षा अधिक संधी देत असाल तर तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून विपरित प्रतिक्रिया मिळेल. प्रवासात आज कुणी अनोळखी व्यक्ती तुम्हाला नाराज करू शकतो.

मीन राशी भविष्य:

भरपूर प्रवासामुळे तुम्ही उन्मादी बनाल. आकर्षक वाटणा-या योजनेत गुंतवणूक करण्यापूर्वी वरवर विचार न करता त्याच्या मूळाशी जा. गुंतवणूक करण्यापूर्वी आणि कोणताही शब्द देण्यापूर्वी तज्ञांशी बोलून घ्या. स्वत:ची प्रशंसा करण्यात वेळ घालवू नका, त्यापेक्षा पुन्हा प्रयत्न करा आणि आयुष्याचे मर्म समजून घ्या. आज तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीकडे तुमच्या भावना व्यक्त करण्यात अपयशी ठराल.

तुमच्या द्वारे आज रिकाम्या वेळेत असे काम केले जातील ज्या बाबतीत तुम्ही नेहमी विचार करत होता परंतु, त्या कामांना करण्यात समर्थ होऊ शकत नाही. तुमच्या भूतकाळातील एखादे गुपित समजल्यामुळे तुमचा/तुमची जोडीदार काहीशी दुखावली जाण्याची शक्यता आहे. आज आपल्या विचारांना प्रखर बनवण्यासाठी तुम्ही आज कुठल्या महान व्यक्तीचे जीवन वाचू शकतात.

नोट: आपल्या कुंडली आणि राशीच्या ग्रहांच्या आधारावर आपल्या जीवना मध्ये घडणाऱ्या घटना rashi bhavishya 16 May 2020 पेक्षा वेगळ्या होऊ शकतात. संपूर्ण माहितीसाठी आपण कोणत्याही तज्ञ ज्योतिषाचा सल्ला घेऊ शकता.

आपण बारा राशींचे rashi bhavishya 16 May 2020 वाचले. आपल्याला rashi bhavishya 16 May 2020 चे हे राशी भविष्य कसे वाटले? कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया आवश्य द्याव्यात आणि आजचे राशिभविष्य मित्रांसोबत शेयर करावे.

About V Amit

My name is V Amit, I am a blogger, I am the founder of MarathiGold.com. I hope you like the articles written by me.