Breaking News

13 मे 2020 राशीभविष्य: गणपती बाप्पाची कृपा या 4 राशी होणार सुखदायी राहील दिवस, मिळेल खुशखबरी…

Rashi Bhavishya, May 13: आम्ही आपल्याला बुधवार 13 मे चे राशी भविष्य (Rashi Bhavishya) सांगत आहोत. राशी भविष्य चे आपल्या जीवना मध्ये महत्व आहे. राशी भविष्य समजल्याने आपल्याला भविष्यात होणाऱ्या घटनांचा अंदाज येतो. राशी भविष्याचे निर्मण ग्रह गोचर आणि नक्षत्र यांच्या चालीच्या आधारावर केले जाते. दररोज आपल्या भविष्यावर परिणाम करत असते. या राशी भविष्या मध्ये आपण नोकरी, व्यवसाय, शिक्षण आणि वैवाहिक जीवन तसेच प्रेम संबंध या बद्दल माहिती जाणून घेऊ शकता. तुम्हाला देखील आजचा दिवस कसा राहील हे जाणून घ्यायचे असेल तर वाचा.

Rashi-Bhavishya-May-13-2020

मेष राशी भविष्य:

तुम्हाला एखाद्या धार्मिक स्थळी जाण्याची इच्छा होईल. त्यासाठी तुम्ही धार्मिक स्थळी जाऊन ज्ञानी-योगी-दैवी व्यक्तीला भेटून त्यांच्यादजवळून ज्ञान मिळवाल, आशीर्वाद मिळवाल. कुणाचा सल्ला न घेता आज तुम्ही पैसा कुठे ही इन्व्हेस्ट करू नका. कुटुंब-मुले आणि मित्रमंडळी यांच्यासमवेत वेळ घालवल्याने तुमच्या मनाला पुन्हा एकदा उभारी मिळेल. प्रेम अमर्याद असते, असीम असते; हे तुम्ही या पूर्वी ऐकले असेल, पण आज तुम्ही त्याचा अनुभव घेणार आहात.

मान्यवर श्रेष्ठ व्यक्तींबरोबरच्या चर्चेमुळे चांगल्या नव्या कल्पना आणि योजना सुचतील. या राशीतील लोक खूप मनोरंजक असतात. हे कधी लोकांमध्ये राहून आनंदी राहतात तर, कधी एकटे राहून तथापि, एकटा वेळ घालवणे इतके शक्य नाही तरी ही आजच्या दिवशी काही वेळ तुम्ही आपल्यासाठी नक्की काढू शकाल. आजचा दिवस तुमच्या वैवाहिक आयुष्यातील सर्वात खासगी दिवस असेल.

वृषभ राशी भविष्य:

आपले मानसिक आणि शारीरिक आरोग्य संतुलित राखा, अध्यात्मिक आयुष्याचे हे पूर्वसूत्र आहे. ‘सर्व चांगल्या आणि वाईट गोष्टी मनातूनच जन्माला येतात त्यामुळे मन हे जीवनाचे प्रवेशद्वार आहे. आपले प्रश्न सोडविण्यासाठी ते मदत करेल आणि योग्य तो प्रकाशमार्ग दाखवेल. धनाची देवाण-घेवाण आज दिवसभर असेल आणि दिवस मावळण्याची वेळी तुम्ही बचत करण्यात यशस्वी असाल. आजच्या दिवशी मुलं आणि कुटुंबावर लक्ष केंद्रीत करा.

तुम्हाला आनंदी ठेवण्यासाठी तुमची प्रिय व्यक्ती काहीतरी करेल. आजच्या दिवशी सुरू केलेले संयुक्त प्रकल्प अंतिमत: फायदेशीर ठरतील, पण आपल्या भागीदाराकडून तुम्हाला प्रखर विरोध सहन करावा लागेल. तुमच्या व्यक्तिमत्त्वात सुधारणा घडविण्यासाठी योग्य ते बदल करा आणि योग्य जोडीदाराला आकर्षित करा. तुमचा /तुमची जोडीदार आज तुमच्या टीनएजमधील काही आठवणींना उजाळा देईल, त्यापैकी काही आठवणी खट्याळसुद्धा असू शकतील.

मिथुन राशी भविष्य:

मतभिन्नता आणि दडपण यामुळे तुम्ही चिडचिडे आणि बैचेन व्हाल. तुमच्या जवळ आज पैसा ही पर्याप्त असेल आणि या सोबतच मनात शांती असेल. घरच्या आघाडीवर अडचण संभवते त्यामुळे तुम्ही काय बोलता ते नीट विचार करून बोला. पवित्र आणि ख-या प्रेमाचा अनुभव येईल. एका कठीण काळानंतर, आजच्या दिवशी तुम्हाला आश्चर्याचा सुखद धक्का बसेल.

दिवसाच्या शेवटी आज तुम्हाला आपल्या घरातील लोकांना वेळ देण्याची इच्छा असेल परंतु, या वेळात घरातील कुणी जवळच्या व्यक्तीसोबत तुमचा वाद होऊ शकतो आणि तुमचा मूड खराब होऊ शकतो. तुमचे असणे हे त्याच्या/ितच्यासाठी किती मौल्यवान आहे, हे तुमचा/तुची जोडीदार आज तुमच्यासमोर शब्दांत व्यक्त करेल.

कर्क राशी भविष्य:

प्रेम, आशा, विश्वास, सद्भावना, आशावादी आणि निष्ठा अशा सकारात्मक भावना स्वीकारण्यासाठी तुमच्या मनाला उद्युक्त करा. एकदा का अशा भावनांनी तुमच्या मनाचा ताबा घेतला की, कोणत्याही परिस्थितीत तुमचे मन आपसूकपणे सकारात्मक विचार करेल. आज आर्थिक पक्ष चांगले राहील परंतु, यासोबतच तुम्हाला ही काळजी घ्यावी लागेल की, तुम्ही आपल्या धनाला व्यर्थ खर्च करू नका. नातेवाईकांना भेटून त्यांच्यासमवेत वेळ घालविल्याने तुमचा फायदा होऊ शकेल.

प्रिय व्यक्ती सोबत वेळ खर्च करून एकमेकांना समजून घेण्याची गरज आहे. तुम्ही काही दिवसांसाठी सुट्टीवर जात असाल तर काळजी करू नका. तुमच्या अनुपस्थितीत सारे काही सुरळित पार पडेल, पण जर काही विचित्र कारणाने अडचणी निर्माण झाल्याच तर तुम्ही आल्यावर अगदी आरामात त्यावर उपाय योजू शकाल. उद्येग व्यसायानिमित्त केलेला प्रवास दीर्घकाळापर्यंत फायदेशीर ठरू शकेल. तुम्ही तुमच्या जोडीदारावर आज भरपूर खर्च करणार आहात, पण हा काळ अत्यंत सुखद असणार आहे.

सिंह राशी भविष्य:

कुटुंबात वैद्यकीय खर्च निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आज तुम्हाला आपल्या संतानमुळे आर्थिक लाभ होण्याची शक्यता दिसत आहे यामुळे तुम्हाला बराच आनंद होईल. दिवसाच्या उत्तरार्धासाठी उल्हसित करणा-या आणि मनोरंजनाच्या कार्यक्रमाची व्यवस्था करा. आजच्या दिवशी आपल्या प्रेमिके/का ला दुखवू नका, अन्यथा नंतर पश्चाताप करावा लागेल. आज तुमच्या कष्टाचे चीज होईल. अध्यात्मिक गुरु अथवा वडीलधा-यांकडून मार्गदर्शन लाभेल. किराणा मालाच्या खरेदीवरून तुम्ही तुमच्या जोडीदारावर चिडाल.

कन्या राशी भविष्य:

असुरक्षितता अथवा आत्मविस्मृतीच्या भावनेमुळे चक्कर येईल. आर्थिक अडचणी टाळण्यासाठी सांभाळून खर्च करा. जुन्या ओळखी आणि संबंधाना उजाळा देण्यासाठी चांगला दिवस. तुमच्या तीव्र भावनांना आवर घाला, नाहीतर तुमचे प्रेम प्रकरण धोक्यात येऊ शकते. प्रेम हे नेहमीच चैतन्य देणारे असते आणि आज तुम्हाला याचा अनुभव मिळणार आहे. दिवस उत्तम आहे आजच्या दिवशी स्वतःसाठी वेळ काढा आणि आपल्या कमतरता आणि गुण याचे आत्म चिंतन करा. यामुळे तुमच्या व्यक्तित्वात सकारात्मक परिवर्तन येईल. जर तुमच्या आयुष्याला नियंत्रित करण्यासाठी तुम्ही इतरांना तुमच्या जोडीदारापेक्षा अधिक संधी देत असाल तर तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून विपरित प्रतिक्रिया मिळेल.

तुल राशी भविष्य:

तुमच्या निराशावादी दृष्टिकोनामुळे तुम्ही कोणतीही प्रगती करू शकणार नाही. चिंता करण्याच्या प्रवृत्तीमुळे तुमची विचारशक्ती मंदावली आहे हे ओळखण्याची हीच खरी वेळ आहे. उजळ बाजूकडे पाहा आणि त्यामुळे तुमच्या निर्णयात बदल कराल. आपल्या रागावर नियंत्रण ठेवा आणि ऑफिस मध्ये सर्वांसोबत चांगल्या प्रकारे व्यवहार करा जर तुम्ही असे केले नाही तर, तुमची नोकरी जाऊ शकते आणि तुमची आर्थिक स्थिती खराब होऊ शकते.

सतत हसतमुख अशा आपल्या स्वभावामुळे आणि आनंदी, उत्साही, प्रेमळ अशा मूड मुळे आपल्या सभोवतालच्या सर्वाना आनंद आणि सुख लाभेल. प्रणयराधन करण्याची शक्यता नाही आणि तुम्ही दिलेली महागडी, मौल्यवान भेटवस्तू याची जादू आज फारशी चालणार नाही.

आज तुम्ही छोटी छोटी पण महत्त्वाची प्रलंबित कामे हातावेगळी करू शकाल. रात्री ऑफिस मधून घरी येण्याच्या वेळी आज सावधानतेने वाहन चालवले पाहिजे अथवा दुर्घटना होऊ शकते आणि बऱ्याच दिवसांपर्यंत तुम्ही आजारी राहू शकतात. तुमचे वैवाहिक आयुष्य चुकीच्या पद्धतीने तुमचे शेजारी तुमचे कुटुंबिय आणि नातेवाईकांपर्यंत पोहोचवतील.

वृश्चिक राशी भविष्य:

अत्यंत व्यस्त दिवस असला तरी आरोग्य चांगले राहील. वेळ आणि धन याची कदर तुम्ही केली पाहिजे अथवा येणारी वेळ समस्यांनी भरलेली राहू शकते. आता गरजेच्या नसलेल्या वस्तुंवर पैसे खर्च करून तुम्ही जोडीदाराला अस्वस्थ कराल. रोमान्ससाठी चांगला दिवस. कामाच्या ठिकाणी जो तुमचा द्वेष करतो, त्याला एक साधे ‘हॅलो’ केलेत तर काहीतरी चांगले घडण्याची शक्यता आहे. निकटच्या सहकाºयांशी अनेक मतभेद झाल्याने दिवसभर तणावपूर्ण जाईल. रोमँटिक गाणी, सुगंधी मेणबत्त्या, रुचकर जेवण आणि थोडीशी मदिरा; तुमच्या जोडीदारासमवेत या सगळ्याचा आस्वाद घेणार आहात.

धनु राशी भविष्य:

मान अथवा पाठीच्या निरंतर वेदनांचा तुम्हा त्रास होण्याची शक्यता आहे. विशेषत: सर्वसामान्य अशक्तपणाबरोबर जर हा त्रास होत असेल तर दुर्लक्ष करू नका. आजच्या दिवशी विश्रांती अत्यंत गरजेची आहे. धनाने जोडलेल्या काही गोष्टींतून मार्ग निघू शकतो आणि तुम्हाला धन लाभ होऊ शकतो. ताणतणाव, दडपणाच्या काळावर मात करता येईल, मात्र आपल्या कुटुंबाचा पाठिंबा तुम्हाला मदत करेल.

तुमच्या जीवनातील विमनस्कतेमुळे तुमच्या जोडीदारावरील तणाव वाढेल. आपल्या कामाबाबत आणि दृष्टीकोनाबाबत प्रामाणिक राहा. आपले दृढ निश्चय आणि कामातील कौशल्याची दखल घेतली जाईल. कर्मकांडे/होमहवन/शुभकार्याचे सोहळे घरीच करा. तुमच्या दोघांमध्ये होणाऱ्या बाहेरच्यांच्या ढवळाढवळीमुळे तुमच्या नात्यावर दुष्परिणाम होईल.

मकर राशी भविष्य:

आपल्या आरोग्याबद्दल विशेषकरून रक्तदाबाच्या रुग्णांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. ज्यांची किंमत वाढतच जाणार आहे अशा वस्तूंच्या खरेदीसाठी आजचा दिवस शुभ आहे. ताणतणाव, दडपणाच्या काळावर मात करता येईल, मात्र आपल्या कुटुंबाचा पाठिंबा तुम्हाला मदत करेल. प्रिय व्यक्तीने दुस्वास केला तरी तुम्ही प्रेमाने वागा. या राशीतील व्यावसायिक आज कुणी जवळच्या लोकांच्या सल्ल्यामुळे समस्येत येऊ शकतात.

जॉब करणाऱ्या जातकांना आज कार्य-क्षेत्रात विचार करून चालण्याची आवश्यकता आहे. अनोळखी व्यक्तींसोबत गप्पा करणे ठीक आहे परंतु, त्याची विश्वसनीयता जाणल्याशिवाय तुम्हाला आपल्या जीवनाच्या गोष्टी त्यांना सांगून आपला वेळ वाया घालवाल. तुमच्या जोडीदाराने दिलेल्या मनस्तापाचा तुमच्या प्रकृतीवर परिणाम होईल.

कुंभ राशी भविष्य:

तुमच्या पत्नीसोबत कौटुंबिक अडचणींबाबत चर्चा करा. प्रेमळ दाम्पत्य म्हणून जगता यावे यासाठी पती-पत्नी दोघांनीही एकमेकांच्या संगतीत वेळ घालवून प्रेमळ नाते घट्ट करा. तुमची मुलेही घरातील शांतता, सौहार्द, आनंद याचा अनुभव घेऊ शकतील. त्यामुळे तुम्हा उभयतांमध्ये अधिक उत्स्फूर्तता आणि स्वातंत्र्य तुम्हाला दोघांना अनुभवता येईल. आपली सांपत्तिक स्थिती सुधारली असली, तरी खर्चाचे प्रमाण वाढतच असल्यामुळे तुमच्या योजना राबविण्यात अडचणी निर्माण करेल.

आपल्या मनावर खूपच दडपण असेल तर आपल्या नातेवाईकांशी अथवा जवळच्या मित्रांशी बोला, त्यामुळे आपल्यावरील ताण काहीसा हलका होईल. तुम्ही तुमच्या प्रिय पत्नीशी पूर्वी झालेल्या मतभेदांबद्दल तिला माफ कराल तर तुमचे जीवन सुकर होईल. प्रलंबित प्रस्तावांची अंमलबजावणी होईल. पर्यटन आणि प्रवास यामुळे तुम्हाला आनंद मिळेल आणि त्यातून खूप काही शिकायलाही मिळेल. तुमच्या वैवाहिक आयुष्यातील हा एक उत्तम दिवस असेल. तुम्ही तुमच्या जोडीदारावर किती प्रेम करता, हे व्यक्त करा.

मीन राशी भविष्य:

ध्यानधारणा आणि स्वत्वाची जाणीव होणे हे लाभदायक सिद्ध होईल. तुम्ही आज तुमचे पत्ते व्यवस्थित टाकलेत तर अतिरिक्त रोख रक्कम कमावू शकाल. तुमच्या ओळखीचे कुणतरी तुमची आर्थिक स्थिती पाहून विचित्र पद्धतीने प्रतिक्रिया देईल, त्यामुळे घरात तुम्हाला अवघडल्यासारखे वाटेल. प्रेमामधील तुमच्या असभ्य वर्तणुकीची माफी मागा. तुमच्या योजनांबद्दल सर्वत्र बडबड कराल तर त्यामुळे तुमचा प्रकल्प रखडेल, बारगळेल. दुसºयांना पटवून देण्याच्या क्षमतेमुळे तुम्हाला लाभ होईल. तुमच्या जोडादाराने दिलेल्या सरप्राइझमुळे तुमचा गेलेला मूड परत येईल.

नोट: आपल्या कुंडली आणि राशीच्या ग्रहांच्या आधारावर आपल्या जीवना मध्ये घडणाऱ्या घटना rashi bhavishya 13 May 2020 पेक्षा वेगळ्या होऊ शकतात. संपूर्ण माहितीसाठी आपण कोणत्याही तज्ञ ज्योतिषाचा सल्ला घेऊ शकता.

आपण बारा राशींचे rashi bhavishya 13 May 2020 वाचले. आपल्याला rashi bhavishya 13 May 2020 चे हे राशी भविष्य कसे वाटले? कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया आवश्य द्याव्यात आणि आजचे राशिभविष्य मित्रांसोबत शेयर करावे.

About V Amit

My name is V Amit, I am a blogger, I am the founder of MarathiGold.com. I hope you like the articles written by me.