Breaking News

12 मार्च राशी भविष्य: आज माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने या 3 राशींना मिळणार मोठा फायदा…

Rashi Bhavishya, March 12: आम्ही आपल्याला गुरुवार 12 मार्च चे राशी भविष्य (Rashi Bhavishya) सांगत आहोत. राशी भविष्य चे आपल्या जीवना मध्ये महत्व आहे. राशी भविष्य समजल्याने आपल्याला भविष्यात होणाऱ्या घटनांचा अंदाज येतो. राशी भविष्याचे निर्मण ग्रह गोचर आणि नक्षत्र यांच्या चालीच्या आधारावर केले जाते. दररोज आपल्या भविष्यावर परिणाम करत असते. या राशी भविष्या मध्ये आपण नोकरी, व्यवसाय, शिक्षण आणि वैवाहिक जीवन तसेच प्रेम संबंध या बद्दल माहिती जाणून घेऊ शकता. तुम्हाला देखील आजचा दिवस कसा राहील हे जाणून घ्यायचे असेल तर वाचा.

Rashi-Bhavishya-March-12-2020

मेष राशी भविष्य:

तुमच्यात आज उत्तम स्पुर्ती पहिली जाईल. तुमचे स्वास्थ्य आज पूर्णतः तुमची साथ देतील. नव्या आर्थिक करारांना अंतिम स्वरुप मिळाल्यामुळे ताजा अर्थपुरवठा होईल. आपल्या जीवनसाथी बरोबर चित्रपट पाहणे अथवा रात्रीचे जेवण करणे तुम्हाल शांतता, आराम मिळवून देईल आणि तुमचा मूड एकदम बहारदार राहील. रोमान्ससाठी चांगला दिवस. नेहमीपेक्षा आज तुम्ही उच्च लक्ष्य गाठण्याचा प्रयत्न कराल – अपेक्षित निकाल मिळाला नाही तरी नाराज होऊ नका. आज अनेक असे विषय, प्रश्न उद्भवतील – ज्याकडे ताबडतोब लक्ष घालणे गरजेचे आहे. वादविवाद किंवा कार्यालयातील राजकारण, तुम्ही या सगळ्याला पुरून उराल.

वृषभ राशी भविष्य:

आरोग्यविषयक प्रश्नांमुळे कदाचित तुम्हाला अशांततेचा सामना करावा लागेल. ही गोष्ट लक्षात घ्या की, दुःखाच्या प्रसंगात तुमचे संचित धनच तुमच्या कामी येईल म्हणून, आजच्या दिवशी धन संचय करण्याचा विचार बनवा. गृहशांतीसाठी शुभ आणि पवित्र दिवस. नवीन प्रेमप्रकरण घडण्याची दाट शक्यता आहे, पण आपली खाजगी आणि गुप्त माहीती तुम्ही उघड करु नका. तुमच्याकडे उच्च ऊर्जाक्षमता आहे ती तुम्ही व्यावसायिक यशशिखरे गाठण्यासाठी वापरायला हवी. विद्यार्थ्यांच्या डोक्यात आज प्रेमाचा ताप चढू शकतो आणि यामुळे त्यांचा बराच वेळ खराब होऊ शकतो. तुमचे वैवाहिक आयुष्य साजरे करण्याच्या अनेक संधी आज तुम्हाला मिळतील.

मिथुन राशी भविष्य:

तुम्ही आहार व्यवस्थित घ्या विशेषत: अर्धशीशीच्या रुग्णांनी अन्नसेवन योग्य वेळी न केल्यास त्यांना विनाकारण भावनिक ताणाचा सामना करावा लागेल. प्रलंबित घटना,वादग्रस्त विषय संदेहास्पद होतील आणि खर्चामुळे तुमचे मन काळवंडून जाईल.. वयोवृद्ध नातेवाईक अवाजवी मागण्या करण्याची शक्यता आहे. प्रेमातील असीम आनंद अनुभवण्यासाठी कोणाचा तरी शोध घ्या. वेळेला पैशाइतपतच असणारे महत्त्व तुम्ही जाणत असाल तर तुमच्या क्षमतेची उच्चतम पातळी गाठण्यासाठी आवश्यक ती पावले उचला. एकांतात वेळ घालवणे उत्तम आहे परंतु, तुमच्या डोक्यात काही चालत असेल तर, लोकांपासून दूर राहून तुम्ही अधिक जास्त चिंतीत होऊ शकतात म्हणून तुम्हाला आमचा सल्ला आहे की, लोकांपासून दूर राहण्यापेक्षा तुम्ही कुणी अनुभवी व्यक्तीला आपली समस्या सांगा. आज तुम्हाला तुमच्या जोडीदाराची एक सुंदरशी बाजू पाहायला मिळेल.

कर्क राशी भविष्य:

प्रदीर्घ आजारावर मात करण्यासाठी हास्योपचाराचा उपयोग करा. कारण तो सर्व समस्यांवर उत्तम उपाय ठरतो. झटपट पैसा कमावण्याची तुम्हाला इच्छा होईल. तुमच्या ‘चलता है’ भूमिकेमुळे आणि विचित्र वागणुकीमुळे तुमच्यासोबत राहणारी व्यक्ती त्रासून जाईल, अस्वस्थ होईल. तुमच्या मनात कामाच्या ताणाचे विचार असले तरी तुमची प्रिय व्यक्ती रोमॅण्टिक आनंद देईल. आज केलेली गुंतवणूक लाभदायक असेल, पण आपल्या भागीदाराकडून काहीसा विरोध होण्याची शक्यता आहे. कुठल्या कारणास्तव आज तुमच्या ऑफिस मध्ये लवकर सुट्टी होऊ शकते याचा तुम्ही फायदा घ्याल आणि आपल्या कुटुंबातील लोकांसोबत कुठे फिरायला जाऊ शकतात. रोमँटिक गाणी, सुगंधी मेणबत्त्या, रुचकर जेवण आणि थोडीशी मदिरा; तुमच्या जोडीदारासमवेत या सगळ्याचा आस्वाद घेणार आहात.

सिंह राशी भविष्य:

तुमच्या अविचारी वागण्यामुळे बायकोशी तुमचे संबंध बिघडतील. कुठलाही मूर्खपणा करण्यापूर्वी तुमच्या वागणुकीच्या परिणामांबद्दल विचार करा. शक्य असेल तर तुमचा मूड बदलण्याचा प्रयत्न करा. अधिकचा पैसा स्थावर जंगम मालमत्तेत गुंतवा. कुटुंबातील ताणतणावांमुळे तुमचे लक्ष विचलित होऊ देऊ नका. वाईट काळच आपणास अनेक गोष्टी शिकवतो. स्वत:चे लाड पुरविण्यात, स्वत:ची पाठ थोपटून घेण्यात आपला वेळ वाया घालवू नका. त्यापेक्षा आयुष्याचे धडे गिरवा. आशा आकांक्षा सोडू नका, अपयश हे नैसर्गिक आहे, किंबहुना आयुष्याचे तेच खरे सौंदर्य आहे. महत्त्वाची कामं कोणाच्याही सहकार्याशिवाय हाताळू शकाल असे जर तुम्हाला वाटत असेल तर ती तुमची सर्वात मोठी चूक असेल. आज तुमच्याजवळील उत्तम संकल्पना आणि तुम्ही केलेल्या कृती यामुळे तुमच्या अपेक्षेच्या बाहेर तुम्हाला फायदा होईल. तुमच्या व्यस्त दिनचर्येमुळे तुमच्या जोडीदाराला कमी महत्त्व दिल्यासारखे वाटेल, आणि तो/ती याबाबतचा रोष संध्याकाळी बोलून दाखवेल.

कन्या राशी भविष्य:

चार भिंती बाहेरील खेळांचे तुम्हाला आकर्षित करतील. ध्यानधारणा आणि योगाचा तुम्हाला फायदा होईल. आज तुम्ही मित्रांसोबत पार्टीमध्ये खूप पैसा खर्च करू शकतात परंतु, तरी ही तुमचा आर्थिक पक्ष आज मजबूत राहील. तुमच्या पालकांसोबत तुमचा आनंद वाटा. एकटेपणा आणि उदासीनतेच्या भावनेमुळे दडपणाखाली असलेल्या पालकांना थोडे बरे वाटेल. एकमेकांचे आयुष्य कमी अडचणींचे करू शकला नाहीत तर मग जगण्याला अर्थ काय राहतो. मतभेदांमुळे खाजगी नातेसंबंधात फूट पडण्याची शक्यता आहे. तुमचे सहकर्मचारी यांना तुम्ही काही विशिष्ट विषय ज्या पद्धतीने हाताळत आहात ते आवडणार नाही – परंतु ते तुम्हाला सांगू शकणार नाहीत – तुमच्या अपेक्षेप्रमाणे काम होत नसेल – तर तुमच्या कामाची पद्धत तपासून पाहा आणि त्यानुसार आवश्यक ते बदल तुमच्यात करा. तुम्ही आज खरेदीला गेलात तर तुमच्या स्वत:साठी चांगले कपडे घ्याल. आज तुमच्या जोडीदाराची प्रकृती खालावल्यामुळे तुम्ही तणावाखाली याल.

तुल राशी भविष्य:

इतरांबरोबर आनंद वाटून घेण्याने आपले आरोग्य बहरून जाईल. प्रलंबित देणी आल्यामुळे आपली सांपत्तिक स्थिती सुधारेल. तुमच्या नवीन योजना, प्रकल्प याविषयी तुमच्या पालकांना विश्वासात घेऊन सांगण्यासाठी काळ उत्तम आहे. अचानक प्रणयाराधन करण्याची संधी मिळाल्याने तुम्ही उत्फुल्लीत व्हाल. आज ऑफिस मध्ये तुम्हाला चांगले परिणाम मिळणार नाही. तुमचा कोणी खास आज तुमच्या समोर विश्वासघात करू शकतो. त्यामुळे तुम्ही दिवसभर चिंतेत राहू शकतात. घरातील कामांना पूर्ण केल्यानंतर या राशीतील गृहिणी आजच्या दिवशी निवांत टीव्ही किंवा मोबाइल वर कुठल्या सिनेमा पाहू शकतात. रोमँटिक गाणी, सुगंधी मेणबत्त्या, रुचकर जेवण आणि थोडीशी मदिरा; तुमच्या जोडीदारासमवेत या सगळ्याचा आस्वाद घेणार आहात.

वृश्चिक राशी भविष्य:

चार भिंती बाहेरील खेळांचे तुम्हाला आकर्षित करतील. ध्यानधारणा आणि योगाचा तुम्हाला फायदा होईल. तुम्ही इतरांवर अतिखर्च करण्यासाठी पुढाकार घ्याल. तुमच्या विचित्र वागणुकीनंतरही जोडीदार तुम्हाला सहकार्य करील. तुम्ही प्रेमाच्या मूडमध्ये असाल – म्हणून तुम्ही आणि तुमची प्रिय व्यक्ती यांच्यासाठी खास बेत आखाल. तुमची कलात्कम आणि सर्जनशील क्षमता यामुळे तुम्ही कौतुकाचे धनी व्हाल. आज घरात कुठल्या पार्टीमुळे तुमचा महत्वाचा वेळ बर्बाद होऊ शकतो. स्त्रिया शुक्रावरच्या असतात आणि पुरुष मंगळावरचे, पण आजच्या दिवशी शुक्र आणि मंगळ एक होणार आहेत.

धनु राशी भविष्य:

पुन्हा ऊर्जा मिळविण्यासाठी संपूर्ण विश्रांती घ्या. पैसे मिळविण्याचा नव्या संधी लाभदायक असतील. कुटुंबातील ज्येष्ठ सदस्याची तब्येत तुमच्या तणावाचे कारण ठरू शकते. प्रिय व्यक्तीचा सहवास नसल्यामुळे तुम्हाला रिकामपण वाटेल. तुमच्या कामाच्या ठिकाणी असलेल्या वातावरणात आज सकारात्मक बदल घडेल. आजच्या दिवशी तुम्ही खूप व्यस्त राहाल परंतु, संद्याकाळीच्या वेळी आपल्या मनासारख्या कामांना करण्यासाठी तुमच्या जवळ वेळ असेल. तुमचा/तुमची जोडीदार आज स्वार्थीपणाने वागेल.

मकर राशी भविष्य:

आपल्या पालकांकडे दुर्लक्ष करणे हे आपल्या भविष्यातील प्रगतीसाठी मारक असेल. चांगला काळ सदैव टिकून रहात नाही. माणसाच्या गरजा या ध्वनीलहरींप्रमाणे असतात. त्यांच्या उतारचढावामुळे कधी मुधर संगीत निर्माण होते तर कधी कर्कश आवाज. आपण जसे पेरु तसेच उगवते हे लक्षात ठेवा. तुम्ही मागील काळात खूप पैसा खर्च केला आहे ज्याचा परिणाम तुम्हाला आज तुम्हाला भोगावा लागू शकतो. आज तुम्हाला पैश्याची आवश्यकता असेल परंतु, तुम्हाला ते मिळणार नाही. आजच्या दिवशी आपल्या कुंटुंबातील सदस्यांच्या गरजांवर लक्ष केंद्रीत करणे ही तुमची प्राथमिकता असेल. स्वप्नील चिंता सोडून द्या आणि आपल्या रोमॅण्टीक जोडीदाराच्या सहवासाचा आनंद घ्या. आज तुमच्या कलात्मक क्षमतेमुळे अनेक लोकांची कौतुकाची थाप मिळेल आणि अनपेक्षित बक्षिसही मिळेल. तुमचे चुंबकीयसदृश आत्मविश्वासी आनंदी व्यक्तिमत्व तुम्हाला प्रकाशझोतात आणेल. तुमचा जोडीदार हा खरंच देवदूत आहे! तुमचा आमच्यावर विश्वास बसत नाही? आजच्या दिवशी लक्ष ठेवा आणि त्याची अनुभूती तुम्हाला येईल.

कुंभ राशी भविष्य:

तुमची कमकुवत इच्छाशक्ती यामुळे तुम्ही भावनिक व मानसिकदृष्ट्या कमजोर बनू शकाल. धनची आवश्यकता कधी ही पडू शकते म्हणून, आज जितके शक्य असेल आपल्या पैश्याची बचत करण्याचा विचार करा. सर्वसाधारणपणे लाभदायक दिवस आहे, पण तुमच्यामते ज्याच्यावर विश्वास ठेवावा अशी व्यक्ती तुम्हाला मान खाली घालायला लावू शकते. जे लोक आत्तापर्यंत सिंगल आहे त्यांची भेट आज कुठल्या खास व्यक्तीसोबत होण्याची शक्यता आहे परंतु, गोष्टीला पुढे वाढवण्याच्या आधी हे नक्कीच जाणून घ्या की, ती व्यक्ती कुणासोबत नात्यामध्ये नसावी. कामाच्या ठिकाणी प्रत्येक जण तुमचे म्हणणे मनापासून ऐकेल. तुम्हाला आपल्या घरातील लहान सदस्यांसोबत वेळ घालवणे शिकले पाहिजे. जर तुम्ही असे केले नाही तर, तुम्ही घरात सद्भाव बनवण्यात यशस्वी होणार नाही. आज तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत तुमच्या टीनएजमध्ये जाल, आणि त्यावेळी जी मजा केली होती, तिची उजळणी करून पुन्हा त्याचा अनुभव घ्याल.

मीन राशी भविष्य:

संताकडून मिळणारे दैवी ज्ञान समाधान आणि आराम मिळवू देईल. चैतन्याने सळसळता असा आणखी एक दिवस, अनपेक्षित लाभ दृष्टीपथात असतील. घरगुती प्रश्न आणि प्रलंबित घरगुती कामं पूर्ण करण्यासाठी लाभदायक दिवस. अनोख्या रोमान्सचा अनुभव मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या वरिष्ठांना तुमच्या प्रलंबित कामाची जाणीव होण्यापूर्वीच ते पूर्ण करा. आज लोक तुमचे अभिनंदन करतील – याच अभिनंदनाची, कौतुकाची थाप मिळण्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होतात. सुखी वैवाहिक जीवन म्हणजे काय याची आज तुम्हाला जाणीव होईल.

नोट: आपल्या कुंडली आणि राशीच्या ग्रहांच्या आधारावर आपल्या जीवना मध्ये घडणाऱ्या घटना rashi bhavishya 12 March 2020 पेक्षा वेगळ्या होऊ शकतात. संपूर्ण माहितीसाठी आपण कोणत्याही तज्ञ ज्योतिषाचा सल्ला घेऊ शकता.

आपण बारा राशींचे rashi bhavishya 12 March 2020 वाचले. आपल्याला rashi bhavishya 12 March 2020 चे हे राशी भविष्य कसे वाटले? कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया आवश्य द्याव्यात आणि आजचे राशिभविष्य मित्रांसोबत शेयर करावे.

About V Amit

My name is V Amit, I am a blogger, I am the founder of MarathiGold.com. I hope you like the articles written by me.