Breaking News

12 एप्रिल राशी भविष्य: आज बनत आहे अद्भुत महासंयोग, या 6 राशी च्या लोकांना मिळणार लाभ

Rashi Bhavishya, April 12: आम्ही आपल्याला रविवार 12 एप्रिल चे राशी भविष्य (Rashi Bhavishya) सांगत आहोत. राशी भविष्य चे आपल्या जीवना मध्ये महत्व आहे. राशी भविष्य समजल्याने आपल्याला भविष्यात होणाऱ्या घटनांचा अंदाज येतो. राशी भविष्याचे निर्मण ग्रह गोचर आणि नक्षत्र यांच्या चालीच्या आधारावर केले जाते. दररोज आपल्या भविष्यावर परिणाम करत असते. या राशी भविष्या मध्ये आपण नोकरी, व्यवसाय, शिक्षण आणि वैवाहिक जीवन तसेच प्रेम संबंध या बद्दल माहिती जाणून घेऊ शकता. तुम्हाला देखील आजचा दिवस कसा राहील हे जाणून घ्यायचे असेल तर वाचा.

Rashi-Bhavishya-April-12-2020

मेष राशी भविष्य:

वैरभाव महागात पडू शकतो. त्यामुळे आपल्या सहिष्णूतेला, उदार स्वभावाला सुरुंग लागू शकतोच, पण आपल्या विचार करण्याच्या शक्तीला धक्का लागू शकतो. परिणामी आपल्या नातेसंबंधात कायमस्वरुपी फूट पडू शकते. तुमचे आई-वडिल तुमचा व्यर्थ खर्च पाहून आज चिंतीत होऊ शकतात आणि म्हणून तुम्हाला त्यांच्या रागाचे शिकार ही व्हावे लागू शकते. घरच्या आघाडीवर अडचण संभवते त्यामुळे तुम्ही काय बोलता ते नीट विचार करून बोला. वैयक्तीक मार्गदर्शन तुमचे नातेसंबंध सुधारतील. निकटच्या सहकाºयांशी अनेक मतभेद झाल्याने दिवसभर तणावपूर्ण जाईल. विवाहाचा परमोच्च आनंदाचा क्षण तुम्ही आज अनुभवू शकाल. तुम्ही काही वेळ आपल्या व्यक्तित्वाला निखारण्यात लावू शकतात कारण, आकर्षक व्यक्तित्वाच्या आत्म-निर्माणात महत्वाचे योगदान असते.

वृषभ राशी भविष्य:

आरामात राहण्याचा आनंद आज लुटू शकाल. आर्थिक अडचणी टाळण्यासाठी सांभाळून खर्च करा. कौटुंबिक स्नेह मेळाव्याच्या केंद्रस्थानी व्यग्र राहाल. आपल्या प्रियकर/प्रियसीशी सूड उगविण्याच्या भावनेने वागल्यास काहीही साध्य होणार नाही. त्यापेक्षा शांत डोक्याने, आपल्या ख-या भावना नेमकेपणाने सांगणे योग्य ठरेल. तुमचा रिकामा वेळ आज मोबाइल आणि टीव्ही पाहण्यात खर्च होऊ शकतो. यामुळे तुमच्या जीवनसाथीला खिन्नता होईल कारण, तुम्ही त्यांच्या सोबत बोलण्यात काही ही आवड दाखवणार नाही. तुमचा/तुमची तुमच्या प्रतिष्ठेला आज थोडासा धक्का पोहोचवेल. जर तुम्हाला कुणी लहान व्यक्तीने जरी सल्ला दिला तर, त्याचे बोलणे ऐका कारण, बऱ्याच वेळा लहान लोकांकडून जीवन जगण्याची मोठी शिक्षा मिळते.

मिथुन राशी भविष्य:

सुखी आयुष्यासाठी, वेळेचा निव्वळ व्यय करणा-या हट्टी स्वभावाचा त्याग करा. आज तुम्ही मित्रांसोबत पार्टीमध्ये खूप पैसा खर्च करू शकतात परंतु, तरी ही तुमचा आर्थिक पक्ष आज मजबूत राहील. आपल्या घरातील वातावरण बदलण्यापूर्वी तुम्हाला सर्वांचा होकार असल्याची खात्री करा. एखाद्या इंटरेस्टिंग व्यक्तीची भेट होण्याचा संभव आहे. आज आपल्या प्रेमी सोबत वेळ घालवू शकाल आणि त्यांच्या समोर आपल्या गोष्टींना व्यक्त करू शकाल. तुमच्या वैवाहिक आयुष्यातील आजचा सर्वोत्तम दिवस असेल. कुणाला न सांगता आज तुम्ही घरात लहान-मोठी पार्टीचे आयोजन ठेऊ शकतात.

कर्क राशी भविष्य:

अतिशय प्रभावी व्यक्तींच्या पाठिंब्यामुळे तुमचे मनोधैर्य उंचावेल. रात्रीच्या वेळी तुम्हाला आज धन लाभ होण्याची पूर्ण शक्यता आहे कारण, तुमच्या द्वारे दिले गेलेले धन आज तुम्हाला परत मिळू शकते. कुटुंबातील सदस्यांसमवेत काही निवांत क्षण घालवा. आपल्या जोडीदाराच्या अनुपस्थितीची उणीव भासण्याची शक्यता आहे. परिसंवाद आणि प्रदर्शनांना भेट दिल्याने तुमच्या ज्ञानात भर पडले तसेच तुमचा नवीन लोकांशी संपर्क होईल. तुमचा जोडीदार हा देवदूतच आहे, आणि याची आज तुम्हाला जाणीव होईल. जर तुम्ही आपल्या मनातील गोष्ट ऐकली तर, हा दिवस खरेदी करण्यासाठी उत्तम आहे. तुम्हाला काही चांगले कपडे आणि शूजची आवश्यकता आहे.

सिंह राशी भविष्य:

सातत्याने सकारात्मक विचार करण्याची प्रवृत्ती फलदायी ठरेल. तुम्हाला यश मिळेल. या राशीतील काही लोकांना आज जमिनीने जोडलेल्या काही मुद्यांना घेऊन धन खर्च करावे लागू शकते. भावनिक आत्मविशास वाढविण्यासाठी प्रयत्न करणा-यांच्या मदतीला ज्येष्ठ धावून येतील. तुमच्या नात्यातल्या सगळ्या तक्रारी आज निघून जातील. आज तुम्हाला नात्याचे महत्व कळू शकते कारण, आजच्या दिवशीचा जास्त वेळ तुम्ही आपल्या कुटुंबातील लोकांसोबत घालवाल. जेव्हा तुमच्या जोडीदारासोबत भावनिक नातं घट्ट असतं तेव्हा शृंगार अधिक खुलतो. आपल्या लोकांची काळजी घेणे चांगली गोष्ट आहे परंतु, त्यांची काळजी घेता घेता आपले आरोग्य खराब करू नका.

कन्या राशी भविष्य:

तुमच्या भवतीच्या लोकांचा पाठिंबा मिळाल्याने तुम्ही आनंदी व्हाल. तुम्ही जर अधिक धनप्राप्तीची अपेक्षा करत असाल तर सुरक्षित अशाच आर्थिक योजनांमध्ये पैसे गुंतवा. तुमच्या घरातील साफसफाई करण्याचे काम ताबडतोबीने केले पाहिजे. एखाद्या मौल्यवान वस्तूप्रमाणे आपले प्रेम ताजे असू द्या. तुम्ही स्वतःला वेळ देणे जाणतात आणि आज तुम्हाला बराच रिकामा वेळ मिळण्याची शक्यता आहे. रिकाम्या वेळात आज तुम्ही काही खेळ खेळू शकतात किंवा जिममध्ये जाऊ शकतात. तुमचा/तुमची जोडीदार तुम्हाला खुश करण्यासाठी आज प्रयत्न करेल. आज कुटुंब किंवा मित्रांसोबत वेळ व्यतीत होईल. तुम्हाला आज फसलेले वाटण्याची शक्यता आहे कारण, दुसरे खरेदी करण्यात आनंदी राहू शकतात.

तुल राशी भविष्य:

तुम्ही संपूर्ण आराम करायला हवा अन्यथा थकव्यामुळे तुमच्या निराशावादी दृष्टिकोन कार्यरत होऊ शकतो. पैश्याची कमतरता आज घरात कलहाचे कारण बनू शकते अश्या स्थितीमध्ये आपल्या घरातील लोकांसोबत विचारपूर्वक बोला आणि त्यांचा सल्ला घ्या. मुलांनी अपेक्षापूर्ती न केल्यामुळे तुम्हाला निराशा येईल. तुमच्या स्वप्नपूर्तीसाठी तुम्ही मुलांना प्रोत्साहित करणे गरजेचे आहे. रोमान्ससाठी आजचा दिवस फार काही योग्य नाही, खºया प्रेमाची अनुभूती मिळणे अशक्य आहे. प्रवासामुळे तुम्हाला नवीन ठिकाणे पाहायला मिळतील आणि महत्त्वाच्या व्यक्तींशी गाठभेट होईल. तुमच्या इतर कुटुंबियांमुळे तुमच्या वैवाहिक आयुष्यावर नकारात्मक परिणाम होईल, पण तुम्ही दोघेही ही परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळाल. जीवनात सर्व गोष्टी तेव्हाच चांगल्या राहतात जेव्हा तुमचा व्यवहार सरळ राहतो. तुम्हाला आपल्या व्यवहारात सरळपणा आणण्याची आवश्यकता आहे.

वृश्चिक राशी भविष्य:

आपल्या जीवनसाथीचे आरोग्य हे तणावाचे आणि चिंतेचे कारण ठरू शकेल. आपल्या धनाचा संचय कसा करावा याचे कौशल्य आज तुम्ही शिकू शकतात आणि याच कौशल्याला शिकून तुम्ही आपले धन वाचवू शकतात. भरपूर आनंदाचा दिवस, जेव्हा तुमचा जोडीदार तुम्हाला खुश करण्याचा प्रयत्न करेल. प्रेमामध्ये एकतर्फी वेड, मोह आजच्या दिवशी दुर्भाग्यपूर्ण, अनर्थावह ठरेल. प्रवासाच्या काही योजना असतील तर त्या ऐनवेळी पुढे ढकलाव्या लागतील. तुमच्या जोडीदाराच्या उद्धटपणामुळे तुम्ही दिवसभर निराश असाल. कुठून तरी उधार परत मिळू शकते ज्यामुळे तुमच्या काही आर्थिक समस्या दूर होतील.

धनु राशी भविष्य:

आरामात राहण्याचा आनंद आज लुटू शकाल. दीर्घकालीन दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून गुंतवणूक करणे गरजेचे आहे. कुटुंब-मुले आणि मित्रमंडळी यांच्यासमवेत वेळ घालवल्याने तुमच्या मनाला पुन्हा एकदा उभारी मिळेल. काहीजणांसाठी विवाहाचे योग आहेत तर अन्य लोकांना प्रियाराधन करण्यामुळे उत्साह वाटेल. विनाकारण चिंतेने दूर होऊन आज तुम्ही कुठल्या मंदिर, गुरुद्वारा किंवा कुठल्या धार्मिक स्थळावर आपला रिकामा वेळ घालवू शकतात. तुम्हाला आनंदी करण्यासाठी तुमचा/तुमची जोडीदार प्रयत्नांची पराकाष्ठा करेल. त्या लोकांच्या गोष्टींचे वाईट मानून घेऊ नका ज्याची तुमच्या जीवनात काहीच किंमत नाही.

मकर राशी भविष्य:

हवेत इमले बांधण्यात तुमचा वेळ वाया घालवू नका. त्यापेक्षा काहीतरी अर्थपूर्ण गोष्टी करण्यावर आपली ऊर्जा खर्च करा. आजच्या दिवशी तुम्हाला आपल्या त्या मित्रांपासून सावध राहायचे आहे जे तुमच्याकडून उधार मागतात आणि नंतर परत करत नाही. स्वयंपाकघरातील महत्त्वाच्या उपयोगी वस्तूंच्या खरेदीमध्ये तुमची संध्याकाळ व्यस्त राहील. आपले रोमॅण्टीक विचार जगजाहीर होऊ देऊ नका. या राशीतील जातकांना आज रिकाम्या वेळेत अत्याधिक पुस्तकांचे अध्ययन केले पाहिजे. असे करण्याने तुमच्या बऱ्याच समस्या दूर होऊ शकतात. आरामाअभावी तुम्हाला तुमच्या वैवाहिक आयुष्यात गुदमरल्यासारखे वाटेल. तुमच्या आयुष्यात सुसंवादाची आवश्यकता आहे. केश-सज्जा आणि मालिश जश्या क्रियाकलापांमध्ये बराच वेळ लागू शकतो आणि यानंतर तुम्हाला खूप चांगले वाटेल.

कुंभ राशी भविष्य:

इतरांवर टीका करण्यात तुमचा वेळ वाया घालवू नका, त्याने तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. आज तुम्हाला आपले धन खर्च करण्याची गरज पडणार नाही कारण, घरातील कुणी मोठे व्यक्ती तुम्हाला धन धन देऊ शकतात. तुमच्या दुराग्रही स्वभावामुळे तुमच्या पालकांची शांती तुम्ही भंग कराल. त्यांच्या सल्ल्याकडे तुम्ही लक्ष देण्याची गरज आहे. दुखावले जाण्यापेक्षा त्यांच्या आज्ञांचे पालन करा. तुम्हाला आनंदी ठेवण्यासाठी तुमची प्रिय व्यक्ती काहीतरी करेल. अफवा आणि फुकाच्या गप्पाटप्पा करणे यापासून दूर राहा. हा तुमच्या वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस असणार आहे. आज तुम्हाला प्रेमाच्या परमानंदाची अनुभूती येईल. तुमचे मित्र तुमच्या कामी येत नाही ही तक्रार आज तुम्हाला होऊ शकते.

मीन राशी भविष्य:

तुमच्या प्रकृतीची काळजी घ्या. अनपेक्षित बिलांमुळे आर्थिक बोजा वाढेल. घरातील कामं पुरी करण्यासाठी मुलं तुम्हाला मदत करतील. आज दिवसभर तुमचे प्रेम बहरत जाणार आहे. आज तुम्ही सर्व कामांना सोडून त्या कामाला पसंत कराल ज्याला तुम्ही बालपणात करणे पसंत करत होते. तुमचा/तुमची जोडीदार आज तुमची जास्त काळजी घेईल. शक्यता आहे की, अद्यात्मिकतेकडे तुमची तीव्र ओढ असेल. सोबतच, तुम्ही योग कॅम्प मध्ये जाऊ शकतात. धर्मगुरूचे प्रवचन ऐकण्याचा ही योग बनू शकतो किंवा कुठले आध्यत्मिक पुस्तक तुम्ही वाचू शकतात.

नोट: आपल्या कुंडली आणि राशीच्या ग्रहांच्या आधारावर आपल्या जीवना मध्ये घडणाऱ्या घटना rashi bhavishya 12 April 2020 पेक्षा वेगळ्या होऊ शकतात. संपूर्ण माहितीसाठी आपण कोणत्याही तज्ञ ज्योतिषाचा सल्ला घेऊ शकता.

आपण बारा राशींचे rashi bhavishya 12 April 2020 वाचले. आपल्याला rashi bhavishya 12 April 2020 चे हे राशी भविष्य कसे वाटले? कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया आवश्य द्याव्यात आणि आजचे राशिभविष्य मित्रांसोबत शेयर करावे.

About V Amit

My name is V Amit, I am a blogger, I am the founder of MarathiGold.com. I hope you like the articles written by me.