Breaking News

05 मे 2020 राशी भविष्य: आज या 6 राशींचे भाग्य घेणार कलाटणी, जीवनात मोठे बदलाव होण्याचे बनत आहे योग

Rashi Bhavishya, May 05: आम्ही आपल्याला मंगळवार 05 मे चे राशी भविष्य (Rashi Bhavishya) सांगत आहोत. राशी भविष्य चे आपल्या जीवना मध्ये महत्व आहे. राशी भविष्य समजल्याने आपल्याला भविष्यात होणाऱ्या घटनांचा अंदाज येतो. राशी भविष्याचे निर्मण ग्रह गोचर आणि नक्षत्र यांच्या चालीच्या आधारावर केले जाते. दररोज आपल्या भविष्यावर परिणाम करत असते. या राशी भविष्या मध्ये आपण नोकरी, व्यवसाय, शिक्षण आणि वैवाहिक जीवन तसेच प्रेम संबंध या बद्दल माहिती जाणून घेऊ शकता. तुम्हाला देखील आजचा दिवस कसा राहील हे जाणून घ्यायचे असेल तर वाचा.

Rashi-Bhavishya-may-05-2020

मेष राशी भविष्य:

मौज, मस्ती, मजा आणि करमणूकीचा दिवस. आर्थिक प्रश्नांमुळे रचनात्मक विचार करण्याची आपली ताकद नष्ट होईल. ज्येष्ठ नातेवाईक त्यांच्या समस्येवर तुम्ही उपाय शोधण्यासाठी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा बाळगतील. त्यांचे आशीर्वाद तुम्हाला लाभतील.

तुमच्या मनात कामाच्या ताणाचे विचार असले तरी तुमची प्रिय व्यक्ती रोमॅण्टिक आनंद देईल. कलात्मक क्षेत्रातील लोकांना आजचा दिवस यशदायी ठरले. ब-याच काळापासून ते वाट पाहात असलेली कीर्ती आणि मान्यता त्यांना मिळेल. भूतकाळातील कुणी व्यक्ती तुमच्याशी संपर्क साधेल आणि तुमचा आजचा दिवस संस्मरणीय करेल. तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत आज मनसोक्त गप्पा माराल.

वृषभ राशी भविष्य:

अनावश्यक घटनांची चर्चा करण्यात वेळ आणि ऊर्जा वाया नका घालवू. एक लक्षात ठेवा वादविवाद चर्चांमधून काहीही हाती लागत नाही, तर काहीतरी हरवतेच. आजच्या दिवशी चुकून ही कुणाला पैसे उधार देऊ नका आणि जर देणे खूपच गरजेचे असेल तर, देणाऱ्याकडून लिखित स्वरूपात लिहून घ्या की, तो पैसे परत केव्हा करेल. घरातील कामं पुरी करण्यासाठी मुलं तुम्हाला मदत करतील.

आजच्या दिवशी डेटवर जाणार असाल तर विवादात्मक विषय काढणे टाळा. कामाच्या ठिकाणी प्रत्येक जण तुमचे म्हणणे मनापासून ऐकेल. आज टीव्ही किंवा मोबाइलवर काही सिनेमा पाहण्यात तुम्ही इतके व्यस्त होऊ शकतात की, तुम्ही गरजेच्या कामांना करणे विसराल. तिऱ्हाईत व्यक्ती तुमच्यात आणि तुमच्या जोडीदारामध्ये भांडण लावून द्यायचा प्रयत्न करेल, पण तुम्ही दोघेही सांभाळून घ्याल.

मिथुन राशी भविष्य:

तुमच्या आशेचा पतंग एखाद्या उंची अत्तरासारखा आणि डुलणाºया फुलासारखा दरवळेल. अचानक पैसा आल्याने तुमची प्रलंबित बिले आणि ताबडतोब करावयाचे खर्च भागतील. खाजगी आणि गोपनीय माहीत अजिबात उघड करू नका. तुमची ऊर्जा पातळी खूप उच्च असेल – कारण तुमचे प्रियजन तुमच्यासाठी आनंद निर्माण करतील. स्पर्धात्मक परीक्षेला बसणाºयांनी शांत मनाने सामोरे जावे. परीक्षेच्या भीतीमुळे ग्रासून जाऊ नका.

तुमचे प्रयत्न तुम्हाला निश्चितपणे सकारात्मक निकाल मिळवून देतील. वेळेच्या आधी सर्व काम पूर्ण करणे ठीक असते जर तुम्ही असे केले तर, तुम्ही आपल्यासाठी ही वेळ काढू शकतात. जर तुम्ही प्रत्येक कामाला उद्यावर ढकलले तर तुम्ही स्वतःसाठी कधी ही वेळ काढू शकणार नाही. थोडेसे अधिक प्रयत्न केलेत तर आजचा दिवस तुमच्या वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस असेल.

कर्क राशी भविष्य:

आरोग्याच्या दृष्टीने अतिशय चांगला दिवस. तुमचे उल्हसित मन तुम्हाला योग्य ती ऊर्जा पुरवेल आणि आपणास आत्मविश्वास मिळवून देईल. ज्या लोकांनी आपला पैसा सट्टेबाजी मध्ये लावलेला आहे आज त्यांना नुकसान होण्याची शक्यता आहे. सट्टेबाजी पासून दूर राहण्याचा तुम्हाला सल्ला दिला जातो. आपल्या उदार वागण्याचा फायदा मुलांना घेऊ देऊ नका.

प्रेमाची अनुभूती ही पंचेंद्रियांच्या पलीकडची असते, पण आज तुम्ही सर्वांगाने या परमानंदाची अनुभूती घेणार आहात. तुमच्या कामाच्या ठिकाणी असलेल्या वातावरणात आज सकारात्मक बदल घडेल. आपल्या संभाषणाबाबत, बोलण्याबाबत कायम स्पष्ट असावे, अन्यथा अशा गोष्टी आपला कोणताही ठावठिकाणा ठेवणार नाहीत. तुम्हाला जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असल्यासारखे वाटेल, कारण तुमचा/तुमची जोडीदार तुम्हाला ते जाणवून देणार आहे.

सिंह राशी भविष्य:

आजचा दिवस लाभदायक असून, तुम्हाला तुमच्या दीर्घ आजारापासून सुटका मिळण्याची शक्यता आहे. दीर्घकाळ प्रलंबित असणारी थकबाकी आणि येणे अंतिमत: प्राप्त होईल. तुमच्या मनावर असलेले ओझे उचलण्यास आणि तुम्हाला पाठिंबा देण्यात नातेवाईक पुढाकार घेतील. सामाजिक अडथळे ओलांडणे शक्य होणार नाही. काही काळ आपण केवळ स्वत:च्या जिवावरच काम खेचून नेत आहात असे चित्र असेल, सहकारी, सहयोगी तुमच्या मदतीस येतील, पण फार काही मदत देऊ शकतील असे दिसत नाही. गरजवंतांना मदत करण्याच्या तुमच्या क्षमतेमुळे तुम्हाला आदर मिळेल. आज तुमच्या जोडीदाराची प्रकृती खालावल्यामुळे तुम्ही तणावाखाली याल.

कन्या राशी भविष्य:

तुमचे विनयशील वागण्याबद्दल कौतुक होईल. अनेक लोक तुमच्यावर स्तुतिसुमने उधळतील. महत्त्वाच्या व्यक्ती कधीही आर्थिक मदत द्यायला तयार असतील. घरामध्ये तुमची मुलं तुमच्यासमोर अत्यंत बिकट अशी परिस्थिती निर्माण करतील, कोणतीही कृती करण्यापूर्वी सर्व बाजू तपासून पाहा. तुमचे डोळे इतके पाणीदार व तेजस्वी आहेत की तुमच्या प्रिय व्यक्तीची अख्खी रात्र त्यात उजळून जाईल.

कार्य-क्षेत्रात कुणाशी जवळीकता ठेऊ नका तुमची बदनामी होऊ शकते. जर तुम्हाला कुणासोबत जोडायचे आहे तर, ऑफिस पासून दूर राहूनच त्यांच्याशी बोला. तुम्ही मागील काळात बरेच काम अपूर्ण सोडलेले आहे त्याची भरपाई आज तुम्हाला करावी लागू शकते. आज तुमचा रिकामा वेळ ही ऑफिसचे काम पूर्ण करण्यात जाईल. तुमचा /तुमची जोडीदार आज तुमच्या टीनएजमधील काही आठवणींना उजाळा देईल, त्यापैकी काही आठवणी खट्याळसुद्धा असू शकतील.

तुल राशी भविष्य:

वडील संपत्तीत आपल्याला बेदखल करतील, पण तुम्ही दु:खी होऊ नका. सुखसमृद्धीने मानसिक लाड खूप होतात, मात्र वंचनेच्या काळात आपण कणखर बनतो. आजचा दिवस जगून घेण्याच्या आणि करमणुकीवर अति खर्च करण्याच्या आपल्या स्वभावाचे परीक्षण करा घरातील आयुष्य शांततापूर्ण आणि मोहक असेल. तुमच्या खिडकीत फुले ठेवून तुमच्या प्रिय व्यक्तीला दाखवा. तुमच्या नियमित कष्टांचे आज चांगल चीज होईल. अनपेक्षित प्रवासामुळे धावपळ व ताणतणाव वाढेल. तुमची पत्नी आज खूपच छान वागत आहे. तुम्हाला तिच्याकडून कदाचित काही सरप्राइझ मिळण्याची शक्यता आहे.

वृश्चिक राशी भविष्य:

आनंदी दिवसासाठी मानसिक ताणतणाव आणि दडपण बाजूला सारा. तुम्ही अतिशय उत्साहपूर्ण नवीन परिस्थितीचा अनुभव घ्याल – त्यामुळे तुम्हाला आर्थिक फायदा संभवतो. तुम्हाला आनंदी ठेवण्यासाठी तुमची मुले सर्वतोपरीने प्रयत्न करतील. आज तुम्हाला प्रेमाच्या आनंदाची अनुभूती मिळणार आहे.

आपल्या व्यवसायात स्थिरस्थावर झालेल्या अनुभवी लोकांशी जवळीक साधा, ते तुम्हाला भविष्याची दिशा दाखवतील. वेळेपेक्षा अधिक काहीच नाही म्हणून, तुम्ही वेळेचा सदुपयोग करतात परंतु, बऱ्याच वेळा तुम्हाला जीवनाला लवचिक बनवण्याची आवश्यकता ही असते आणि आपल्या घर कुटुंबासोबत वेळ घालवण्याची गरज असते. जेव्हा तुमच्या जोडीदारासोबत भावनिक नातं घट्ट असतं तेव्हा शृंगार अधिक खुलतो.

धनु राशी भविष्य:

आजच्या दिवशी तब्येत एकदम उत्तम असेल. इच्छा आशीर्वाद म्हणून पूर्ण होतील आणि उत्तम नशिब फळफळेल – आणि पूर्वीच्या दिवसांमध्ये केलेली मेहनत फळाला येईल. आता गरजेच्या नसलेल्या वस्तुंवर पैसे खर्च करून तुम्ही जोडीदाराला अस्वस्थ कराल. आपल्या प्रिय व्यक्तीकडून आलेल्या फोनमुळे आपला दिवस उत्तेजनापूर्ण असेल. व्यवसायात फसवले जाण्यापासून चौकस राहा. आज तुम्ही एखाद्याला मदत देऊ केलीत तर गौरव होईल किंवा लोक त्याची दखल घेतील आणि तुम्ही प्रकाशझोतात याल. विवाहाचा परमानंद काय असतो, याची जाणीव आज तुम्हाला होईल.

मकर राशी भविष्य:

खेळ आणि आऊटडोअर अ‍ॅक्टीव्हिटीमधील सहभाग तुमचा हरवलेला उत्साह ऊर्जा परत मिळविण्यास सहाय्यभूत ठरेल. आर्थिक व्यवहार आणि वायदे अतिशय काळजीपूर्वक सांभाळा. इतरांचे लक्ष वेधून घेण्यासाठी तुम्हाला फारसे काही प्रयत्न करावे लागणार नाहीत कारण आजचा दिवस तुमच्यासाठी भला आहे. प्रेम हे नेहमीच चैतन्य देणारे असते आणि आज तुम्हाला याचा अनुभव मिळणार आहे. प्रवसामुळे नवीन व्यवसाय संधी मिळतील. तुमचे घरातील व्यक्ती आज बऱ्याच समस्या शेअर करतील परंतु, तुम्ही आपल्या धून मध्ये मस्त राहाल आणि रिकाम्या वेळात काही असे कराल जे तुम्हाला आवडते. तुमचे वैवाहिक आयुष्य आज एक चांगले वळण घेणार आहे.

कुंभ राशी भविष्य:

तुमच्या मनाला छळणा-या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी तुमचे बुद्धिचातुर्य आणि डावपेच वापरा. जर तुम्ही यात्रेवर जाणार असाल तर आपले किमती वस्तूंची काळजी घ्या कारण, चोरी होण्याची शक्यता आहे. खासकरून आपली पर्स व्यवस्थित सांभाळा. कुटुंबामध्ये वर्चस्ववादी भूमिका ठेवण्याचा आपला स्वभाव तातडीने बदलण्याची गरज आहे.

कुटुंबातील सदस्यांशी जवळिक साधून काम करा, आयुष्यातील चढ-उतार त्यांच्याशी शेअर करा. आपला हा बदललेला स्वभाव त्यांना अमर्याद आनंद मिळवून देईल. प्रेम अमर्याद असते, असीम असते; हे तुम्ही या पूर्वी ऐकले असेल, पण आज तुम्ही त्याचा अनुभव घेणार आहात. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला अनुकूल असे वातावरण असेल. प्रेमीला वेळ देण्याचा प्रयत्न कराल परंतु, कुठल्या गरजेच्या कामामुळे तुम्ही त्यांना वेळ देण्यात यशस्वी होणार नाही. तुमचा/तुमची जोडीदार आज तुम्हाला सरप्राइझ देण्याच्या तयारीत आहे; त्याला/तिला मदत करा.

मीन राशी भविष्य:

आरोग्याच्या दृष्टीने हा काळ एकदम रटाळ आहे, त्यामुळे आपण काय खाता-पिता त्याबाबत काळजी घ्या. आर्थिक स्थितीतील बदल हे नक्कीच होणार आहेत. आपल्या कुटुंबियांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत हे लक्षात ठेऊन आपल्या रागावर नियंत्रण ठेवा. आजचा दिवस विशेष करण्यासाठी अगदी थोडासातरी दयाळूपणा दाखवा, प्रेम करा. रोजच्यापेक्षा आज तुमचे सहकारी तुम्हाला चांगल्या प्रकारे समजून घेतील.

आज तुम्ही निवांत वेळी काही नवीन काम करण्याचा विचार कराल परंतु, या कामात तुम्ही इतके व्यतीत होऊ शकतात की, तुमचे गरजेचे काम ही सुटून जातील. आज तुम्हाला जाणीव होईल, की लग्नाच्या वेळी जी वचनं दिली होती, ती सगळी खरी होती, तुमचा/तुमची जोडीदार ही खरंच सोलमेट आहे.

नोट: आपल्या कुंडली आणि राशीच्या ग्रहांच्या आधारावर आपल्या जीवना मध्ये घडणाऱ्या घटना rashi bhavishya 05 May 2020 पेक्षा वेगळ्या होऊ शकतात. संपूर्ण माहितीसाठी आपण कोणत्याही तज्ञ ज्योतिषाचा सल्ला घेऊ शकता.

आपण बारा राशींचे rashi bhavishya 05 May 2020 वाचले. आपल्याला rashi bhavishya 05 May 2020 चे हे राशी भविष्य कसे वाटले? कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया आवश्य द्याव्यात आणि आजचे राशिभविष्य मित्रांसोबत शेयर करावे.

About V Amit

My name is V Amit, I am a blogger, I am the founder of MarathiGold.com. I hope you like the articles written by me.