Breaking News

04 मार्च राशी भविष्य: बुधवारी गणपती बाप्पांच्या कृपेने 5 भाग्यवान राशींचे स्वप्न होणार पूर्ण

Rashi Bhavishya, March 04: आम्ही आपल्याला बुधवार 04 मार्च चे राशी भविष्य (Rashi Bhavishya) सांगत आहोत. राशी भविष्य चे आपल्या जीवना मध्ये महत्व आहे. राशी भविष्य समजल्याने आपल्याला भविष्यात होणाऱ्या घटनांचा अंदाज येतो. राशी भविष्याचे निर्मण ग्रह गोचर आणि नक्षत्र यांच्या चालीच्या आधारावर केले जाते. दररोज आपल्या भविष्यावर परिणाम करत असते. या राशी भविष्या मध्ये आपण नोकरी, व्यवसाय, शिक्षण आणि वैवाहिक जीवन तसेच प्रेम संबंध या बद्दल माहिती जाणून घेऊ शकता. तुम्हाला देखील आजचा दिवस कसा राहील हे जाणून घ्यायचे असेल तर वाचा .

मेष राशी भविष्य:

तुमच्या दयाळू स्वभावामुळे आज अनेक आनंदाचे क्षण अनुभवाल. तुमच्या वडिलांचा सल्ला आज तुम्हाला कामाच्या क्षेत्रात धन लाभ करवून देऊ शकते. तुमच्या वेळीच मदत करण्यामुळे एखाद्याचे प्राण वाचतील. या बातमीमुळे तुमचे कुटुंबीय तुमचा अभिमान बाळगतील, प्रेरित होतील. प्रेमात तोंडघशी पडलात तरी आनंदी रहा आणि धैर्य बाळगा. व्यवसायात फसवले जाण्यापासून चौकस राहा. गोष्टींना योग्य प्रकारे समजण्याचा आज तुम्ही प्रयत्न केला पाहिजे अथवा कुठल्या कारणास्तव तुम्ही रिकाम्या वेळी आपल्या गोष्टींचा विचार करत राहाल आणि आपली वेळ खराब कराल. तुमच्या जोडादाराने दिलेल्या सरप्राइझमुळे तुमचा गेलेला मूड परत येईल.

वृषभ राशी भविष्य:

तुम्हाला एखाद्या धार्मिक स्थळी जाण्याची इच्छा होईल. त्यासाठी तुम्ही धार्मिक स्थळी जाऊन ज्ञानी-योगी-दैवी व्यक्तीला भेटून त्यांच्यादजवळून ज्ञान मिळवाल, आशीर्वाद मिळवाल. आज तुम्हाला धन संबंधित काही समस्या असण्याची शक्यता आहे परंतु, तुम्ही तुमच्या कौशल्याने हानीला ही नफ्यामध्ये बदलू शकतात. संवाद, संभाषण आणि चर्चा योग्य मार्गाने जात नसतील तर तुम्ही तुमचा शांतपणा सोडून काहीतरी बोलून बसता. अर्थात त्याबद्दल नंतर क्षमादेखील मागता, पण असे बोलण्याआधी विचार करणे श्रेयस्कर. कधी तुम्ही चॉकलेट, आलं आणि गुलाबाचा एकत्र सुवास घेतला आहे? तुमच्या प्रेमाची चव आज तशीच काहीशी असणार आहे. कामातील प्रगतीमुळे जुजबी तणाव संभवतो. घरातील लहान सदस्यांसोबत गप्पा करून आज तुम्ही आपल्या रिकाम्या वेळेचा चांगला वापर करू शकतात. सातत्याने भांडणे झाल्याने तुम्हाला नातेसंबंध तोडून टाकावेत असे वाटेल. परंतु, इतक्या सहज नातेसंबंध तोडू नका.

मिथुन राशी भविष्य:

आपल्या अनुमान न लावता येणा-या स्वभावाचा परिणाम आपल्या वैवाहिक आयुष्याला हानीकारक ठरणार नाही याची दक्षता घ्या. शक्यतो हे टाळण्याचा प्रयत्न करा, अन्यथा नंतर तुम्हाला पश्चाताप करावा लागू शकतो. परदेशात असलेली तुमची जमीन आज चांगल्या भावात विकली जाऊ शकते यामुळे तुम्हाला नफा होईल. कामानिमित्त खाजगी कार्यक्रमांना जाण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे – त्यामुळे प्रभावी, बड्या व्यक्तींशी निकटचा संपर्क निर्माण होऊ शकेल. प्रेमाचा प्रवास मधुर पण क्षणकाल टिकणारा असेल. भागीदारीतील प्रकल्पातून सकारात्मक फळ मिळण्यापेक्षा अनेक प्रश्न निर्माण होतील. दुस-यांना आपल्या स्वभावाचा फायदा घेऊ दिल्याबद्दल तुम्ही स्वत:वर विशेष रागावलेले असाल. आज तुमच्या जवळ रिकाम्या वेळ असेल आणि यावेळचा वापर तुम्ही ध्यान योग करण्यात घालवू शकतात. तुम्हाला आज मानसिक शांततेचा अनुभव होईल. तुम्हाला तुमचे वैवाहिक आयुष्य कदाचित कंटाळवाणे वाटू शकेल. थोडीशी एक्साइटमेंट शोधा.

कर्क राशी भविष्य:

तुमच्या पुढे जाण्यासाठी कुणीतरी तुमचा मूड बिघडविण्याचा प्रयत्न करेल परंतु तुम्हाला त्रास देण्याचा हा प्रयत्न तुम्ही यशस्वी होऊ देऊ नका. या सगळ्या फुकाच्या चिंता आणि काळज्या यामुळे तुमच्या शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतो आणि कदाचित त्वचाविषयक समस्या उद्भवेल. आर्थिक स्थितीतील बदल हे नक्कीच होणार आहेत. आज तुम्ही कुणाला सल्ला दिलात तर -अन्य कुणाचा सल्ला घेण्याचीही तयारी ठेवा. तुमची ऊर्जा पातळी खूप उच्च असेल – कारण तुमचे प्रियजन तुमच्यासाठी आनंद निर्माण करतील. आज कार्य क्षेत्रात तुमच्या कुणी जुन्या कामाचे कौतुक होऊ शकते. तुमच्या कामाला पाहून आज तुमचे कौतुक आणि प्रगती होण्याची शक्यता आहे. व्यावसायिक आज अनुभवी लोकांसोबत व्यवसायाला पुढे वाढवण्याचा सल्ला घेऊ शकतात. तुमचे व्यक्तित्व लोकांपेक्षा थोडे वेगळे आहे तुम्ही एकटा वेळ घालवणे पसंत करतात. आज तुम्हाला आपल्यासाठी वेळ मिळेल परंतु, ऑफिसच्या बऱ्याच समस्या तुम्हाला त्रास देत राहतील. आज तुमचा जोडीदार रिवाइंडचं बटण दाबणार आहे आणि तुमचं सुरुवातीच्या दिवसातलं प्रेम आणि रोमान्स जागा होणार आहे.

सिंह राशी भविष्य:

प्रदीर्घ आजारातून तुम्ही बरे व्हाल. तुम्ही मागील काळात खूप पैसा खर्च केला आहे ज्याचा परिणाम तुम्हाला आज तुम्हाला भोगावा लागू शकतो. आज तुम्हाला पैश्याची आवश्यकता असेल परंतु, तुम्हाला ते मिळणार नाही. आपल्या स्वभावात चंचलता आणू नका, विशेषत: आपल्या जोडीदाराबरोबर वावरताना तर नकोच, अन्यथा घरातील शांततेला ते मारक ठरू शकते. आजच्या दिवशी डेटवर जाणार असाल तर विवादात्मक विषय काढणे टाळा. महत्त्वाचे जमीनविषयक व्यवहार आणि करमणुकीच्या प्रकल्पामधील अनेक लोकांचे समन्वयन करण्यास सध्याची स्थिती तुमच्यासाठी उत्तम आहे. घरातील कामांना पूर्ण केल्यानंतर या राशीतील गृहिणी आजच्या दिवशी निवांत टीव्ही किंवा मोबाइल वर कुठल्या सिनेमा पाहू शकतात. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला वाटेल. पण दिवसाच्या शेवटी तुम्हाला कळेल की, तुमचा/तुमची तुमच्यासाठीच तयारी करत होता/होती.

कन्या राशी भविष्य:

वडील संपत्तीत आपल्याला बेदखल करतील, पण तुम्ही दु:खी होऊ नका. सुखसमृद्धीने मानसिक लाड खूप होतात, मात्र वंचनेच्या काळात आपण कणखर बनतो. जर प्रवास करत असाल तर आपल्या महत्वाच्या वस्तूंची काळजी घ्या. जर तुम्ही दुर्लक्ष केले तर सामान चोरी होण्याची शक्यता आहे. तुम्ही पार्टी देण्याचा विचार करत असाल तर तुमच्या सर्वात चांगल्या मित्रांना बोलवा. तुमचे कौतुक करणारे अनेकजण असतील. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्यावर अखेरपर्यंत प्रेम करत राहील, हे आज तुम्हाला कळेल. आपल्या कामाबाबत आणि दृष्टीकोनाबाबत प्रामाणिक राहा. आपले दृढ निश्चय आणि कामातील कौशल्याची दखल घेतली जाईल. आज तुम्ही वेळ पाहून आपल्यासाठी वेळ काढू शकतात परंतु, ऑफिसच्या कुठल्या कामाच्या कारणास्तव अचानक तुम्ही असे करण्यात अयशस्वी ठराल. तुम्ही आणि तुमचा जोडीदार यांच्यातील प्रेमसंबंध खराब होतील. परिस्थिती अधिक वाईट बनण्याच्या आधी मतभेद दूर करण्यासाठी संवाद साधा.

तुल राशी भविष्य:

क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी होऊन तुम्ही शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहाल. आज जवळच्या मित्राच्या मदतीने काही लोकांना आज चांगले धन लाभ होण्याची शक्यता आहे. हे धन तुमच्या बऱ्याच समस्यांना दूर करू शकते. आजचा दिवस अत्यंत महान आहे, कारण तुमच्या कामाकडे लक्ष जाईल, ते तुम्हास हवे असेल. आपण अनेक गोष्टी करण्याचे ठरविले असेल, पण नेमके कशाच्या मागे जावे हे ठरविताना अडचणी येतील. आपल्या प्रियजनांबरोबर वेळ जाता जाणार नाही. महत्त्वाच्या व्यक्तींशी चर्चा करताना सजग असा एखादी महत्त्वाची टीप मिळून जाईल. जे लोक बऱ्याच दिवसापासून खूप व्यस्त होते त्यांना आज स्वतःसाठी वेळ मिळू शकतो. तुमच्या जोडीदाराच्या बडबडीचा आज तुम्हाला त्रास होईल, पण तो/ती तुमच्यासाठी काहीतरी खास करेल.

वृश्चिक राशी भविष्य:

आज तुम्ही निवांत राहण्याची गरज आहे आणि त्यासाठी जवळचे मित्र व कुटुंबातील सदस्य यांच्यासोबत आनंद लुटा. दीर्घकालीन दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून गुंतवणूक करणे गरजेचे आहे. सहकुटूंब सामाजिक कार्य केल्याने प्रत्येकजण आनंद आणि निवांत राहील. सायंकाळी तुम्ही जर तुमच्या मित्र/मैत्रिणीबरोबर बाहेर गेलात तर, क्षणिक रोमान्स मिळण्याची शक्यता आहे. आनंद, समाधान आणि व्यवसाय दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या ठेवा. या राशीतील लोक खूप मनोरंजक असतात. हे कधी लोकांमध्ये राहून आनंदी राहतात तर, कधी एकटे राहून तथापि, एकटा वेळ घालवणे इतके शक्य नाही तरी ही आजच्या दिवशी काही वेळ तुम्ही आपल्यासाठी नक्की काढू शकाल. तुमच्या वैवाहिक आयुष्यातील आजचा सर्वोत्तम दिवस असेल.

धनु राशी भविष्य:

सोशलाईज होण्याची चिंता भीती तुम्हाला उदास करेल. तुमच्या आत्मसन्मानाला प्रोत्साहन देऊन ही चिंता नाहिशी करा. धन तुमच्यासाठी गरजेचे आहे परंतु, धनला घेऊन इतके गंभीर होऊ नका की, आपल्या नात्यालाच खराब कराल. दूरवर राहणा-या नातेवाईकांकडून अनपेक्षितपणे गोड बातमी मिळाल्याने संपूर्ण कुटुंबासाठी आनंदाचा दिवस ठरेल. एखाद्या इंटरेस्टिंग व्यक्तीची भेट होण्याचा संभव आहे. आपल्या जोडीदाराने दिलेले वचन पाळले नाही म्हणून त्यावर उखडू नका. शांतपणे एकत्र बसून विचार करून गुंता सोडविणे गरजेचे आहे. वेळेचा सदुपयोग करण्यासाठी आज तुम्ही पार्क मध्ये फिरायला जाण्याचा प्लॅन बनवू शकतात परंतु, तिथे कुणी अज्ञात व्यक्ती सोबत वाद होण्याची शक्यता आहे ज्यामुळे तुमचा मूड खराब होईल. आज तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या पुन्हा एकदा प्रेमात पडाल.

मकर राशी भविष्य:

प्रेम, आशा, विश्वास, सद्भावना, आशावादी आणि निष्ठा अशा सकारात्मक भावना स्वीकारण्यासाठी तुमच्या मनाला उद्युक्त करा. एकदा का अशा भावनांनी तुमच्या मनाचा ताबा घेतला की, कोणत्याही परिस्थितीत तुमचे मन आपसूकपणे सकारात्मक विचार करेल. ही गोष्ट लक्षात घ्या की, दुःखाच्या प्रसंगात तुमचे संचित धनच तुमच्या कामी येईल म्हणून, आजच्या दिवशी धन संचय करण्याचा विचार बनवा. तुमचे जीवन बदलण्यासाठी पत्नी मदत करील. स्वत:च्या प्रयत्नाने तुम्ही तुमचे जीवन फॅशनेबल करू शकाल आणि इतरांवर अवलंबून राहण्याऐवजी किंवा दोष देण्याऐवजी स्वत: काम कराल. तुमच्या रोमॅण्टिक जोडीदाराशी फोनवर बराच काळ न बोलून तुम्ही जोडीदाराला छळाल. आपण केलेल्या कामाचे श्रेय दुस-या कोणालाही घेऊ देऊ नका. आपल्या मनावर काबू ठेवण्याचे शिका कारण, बऱ्याच वेळा तुम्ही मन मारून आपला किमती वेळ बर्बाद करतात. आज ही तुम्ही असे काही करू शकतात. वीज खंडीत झाल्यामुळे किंवा इतर कोणत्यातरी कारणामुळे सकाळी तयार होण्यास उशीर होईल, पण तुमचा/तुमची जोडीदार तुमच्या मदतीला येईल.

कुंभ राशी भविष्य:

नेहमीपेक्षा आज तुमची ऊर्जा कमी आहे असे तुम्हाला जाणवेल – म्हणून अतिरिक्त कामाचा बोजा घेऊ नका – थोडी विश्रांती घ्या आणि आजच्या भेटीगाठींच्या वेळा पुढे ढकला. दुस-यांच्या शब्दावर विसंबून तुम्ही गुंतवणूक केलीत तर आज आर्थिक तोटा होण्याची शक्यता आहे. तुमच्या मुलांच्या बाबत काळजी व्यक्त करून पाठिंबा देणे महत्त्वाचे ठरेल. दरदिवशी कोणाच्यातरी प्रेमात पडण्याचा आपला स्वभाव बदलण्याची गरज आहे. जर तुम्ही नवीन व्यावसायिक भागीदारीचा विचार करत असाल, तर कोणताही शब्द देण्यापूर्वी सर्व महत्त्वाच्या घटकांची माहिती जमा करा. व्यावसायिक आज व्यवसायापेक्षा जास्त आपल्या कुटुंबातील लोकांमध्ये वेळ घालवणे पसंत करतील. यामुळे तुमच्या कुटुंबात सामंजस्य कायम राहील. गैरसमजात वाईट काळ गेल्यानंतर आजच्या दिवशी संध्याकाळी तुमच्या जोडीदाराकडून प्रेमाचा वर्षाव होईल.

मीन राशी भविष्य:

आज तुम्ही एकदम शांततेत राहाल आणि मौजमजा करण्याचा तुमचा मूड बनेल. दीर्घकाळ प्रलंबित असणारी थकबाकी आणि येणे अंतिमत: प्राप्त होईल. आपल्या मनावर खूपच दडपण असेल तर आपल्या नातेवाईकांशी अथवा जवळच्या मित्रांशी बोला, त्यामुळे आपल्यावरील ताण काहीसा हलका होईल. तुमच्या जोडीदाराचे प्रेम हे तुमच्यासाठी भावपूर्ण असेल, हे तुम्हाला आज कळेल. जर तुम्ही आज प्रेम करण्याची संधी वाया दवडली नाहीत तर आजचा दिवस तुम्ही तुमच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय दिवस असेल वेळ पाहून आज तुम्ही सर्व लोकांसोबत दुरी बनवून एकांतात वेळ घालवणे पसंत कराल. असे करणे तुमच्या हिताचे ही असेल. तुमचा/तुमची जोडीदार आज तुमची जास्त काळजी घेईल.

नोट : आपल्या कुंडली आणि राशीच्या ग्रहांच्या आधारावर आपल्या जीवना मध्ये घडणाऱ्या घटना rashi bhavishya 04 March 2020 पेक्षा वेगळ्या होऊ शकतात. संपूर्ण माहितीसाठी आपण कोणत्याही तज्ञ ज्योतिषाचा सल्ला घेऊ शकता.

आपण बारा राशींचे rashi bhavishya 04 March 2020 वाचले. आपल्याला rashi bhavishya 04 March 2020 चे हे राशी भविष्य कसे वाटले? कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया आवश्य द्याव्यात आणि आजचे राशिभविष्य मित्रांसोबत शेयर करावे.

About V Amit

My name is V Amit, I am a blogger, I am the founder of MarathiGold.com. I hope you like the articles written by me.