horoscope

मंगळवार 24 जुलै : 5 राशीसाठी राहील आजचा दिवस उत्तम तर 3 राशीसाठी कठीण

आज मंगळवार 24 जुलै चा दिवस तुमच्यासाठी कसा राहील? आजचा दिवस तुमच्या जीवना मध्ये काय परिवर्तन करू शकते? तुमच्या या सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला आज राशिभविष्य मध्ये मिळेल, तर चला पाहू आजचे राशीभविष्य.

मेष राशी भविष्य (Tuesday, July 24, 2018)

आजच्या दिवशी तब्येत एकदम उत्तम असेल. बँकेसंदर्भातील व्यवहार काळजीपूर्वक हाताळा. अभ्यासाच्यावेळी देखील बाहेरील उपक्रमांत भाग घेण्याचा अतिरेक केल्याने पालकांच्या रोषास कारणीभूत व्हावे लागेल. करिअर नियोजन हे खेळाइतकेच महत्त्वाचे आहे. आपल्या पालकांना खुश करण्यासाठी अभ्यास आणि खेळ यांचा समतोल साधा. तुमची प्रिय व्यक्ती आज तुमच्याकडे काही वेळ मागण्याची तसेच भेटवस्तूही मागण्याची शक्यता आहे. आजच्या दिवशी कामाच्या ठिकाणी तुम्ही काहीतरी खास करणार आहात. वरच्या पदावरील व्यक्तींपुढे ढोपर घासावे लागेल. रोजच्या वैवाहिक आयुष्यात, आजचा दिवस मात्र थोडासा वेगळा असणार आहे.

वृषभ राशी भविष्य (Tuesday, July 24, 2018)

आपल्या जीवनसाथी बरोबर चित्रपट पाहणे अथवा रात्रीचे जेवण करणे तुम्हाला शांतता, आराम मिळवून देईल आणि तुमचा मूड एकदम बहारदार राहील. अनियोजित माध्यमातून मिळणारे पैसे तुमचा दिवस उजळून टाकतील. तुमच्या घरातील लोकांसोबत काहीतरी वेगळ्या आणि उत्साहवर्धक गोष्टी कराल. तुमचे मन आणि हृदय यावर प्रणयराधनेची धुंदी चढेल. तुमच्या कामावर लक्ष केंद्रीत केलेत तर यश आणि मान्यता दोन्ही तुमच्याकडे चालत येईल. गुप्तशत्रू तुमच्याविषयीच्या फवा पसरविण्याची शक्यता आहे. तुमच्या जोडीदारासमवेत आजचा दिवस नेहमीपेक्षा चांगला असणार आहे.

मिथुन राशी भविष्य (Tuesday, July 24, 2018)

रक्तदाबाचा विकार असणा-यांनी खचाखच भरलेल्या बसमधून प्रवास करताना अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. तुम्ही प्रवास करणे आणि पैसे खर्च करण्याच्या मूडमध्ये असाल – परंतु नंतर त्याचे तुम्हाला दु:ख होईल. राग हा केवळे काही काळापुरता केलेला वेडेपणा असतो, पण त्यामुळे तुम्ही संकटात सापडू शकता, याची जाणीव ठेवा. प्रेमात आज तुम्ही तुमच्या अधिकाराचा वापर करा. आपल्या व्यवसायात स्थिरस्थावर झालेल्या अनुभवी लोकांशी जवळीक साधा, ते तुम्हाला भविष्याची दिशा दाखवतील. अफवा आणि फुकाच्या गप्पाटप्पा करणे यापासून दूर राहा. अलीकडे काही विपरित घटना घडल्या असल्या तरी तुमचा जोडीदार त्याच्या मनात तुमच्याविषयी असलेलं प्रेम व्यक्त करेल.

कर्क राशी भविष्य (Tuesday, July 24, 2018)

कुटुंबात वैद्यकीय खर्च निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दीर्घकालीन, प्रलंबित अशी गुंतवणूक टाळा. मित्रमैत्रीणींबरोबर फिरायला जा आणि काही आल्हाददायक क्षण अनुभवा. तुमचा कुटूंबातील सदस्यांप्रती असलेला वर्चस्वशाली दृष्टिकोन यामुळे वायफळ वादावादी आणि टीका संभवते. पराभव, अपयशातून तुम्ही काही धडे घ्याल अन्यथा तुमच्या चुका तुमच्यावरच उलटतील. कामाच्या ठिकाणी प्रत्येक जण तुमचे म्हणणे मनापासून ऐकेल. प्रवास केल्याने ताबडतोब निकाल मिळणार नाहीत परंतु त्यामुळे भविष्यातील नफा मिळण्यासाठी चांगला पाया तयार होईल. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्या दैनंदिन गरजा भागविणे थांबवेल, त्यामुळे दिवसभर निराश असाल.

सिंह राशी भविष्य (Tuesday, July 24, 2018)

क्रॉसिंगवर काळजीपूर्वक वाहन चालवा. खर्च वाढतील, पण त्याचबरोबर वाढलेले उत्पन्न तुमच्या या वाढत्या बिलांची काळजी घेईल. कुटुंबातील जवळच्या व्यक्ती तुम्हाला डिवचतील आणि तुमच्या मनात द्वेष निर्माण करतील. अशा वेळेस आक्षेपार्ह काही करण्यापेक्षा तुमच्या भावना त्यांच्यापर्यंत योग्य प्रकारे पोहोचवा. तुमचा जोडीदार आज रोमॅण्टीक मूडमध्ये असेल. तुमचा बॉस तुमच्याशी नेहमी उद्धटपणे का वागतो या मागचे सत्य तुम्हाला आज कळेल. त्यामुळे निश्चितच तुम्हाला बरे वाटेल. प्रवासाच्या संधी शोधाल. आज तुमचा जोडीदार रिवाइंडचं बटण दाबणार आहे आणि तुमचं सुरुवातीच्या दिवसातलं प्रेम आणि रोमान्स जागा होणार आहे.

कन्या राशी भविष्य (Tuesday, July 24, 2018)

काही ठिकाणी तुम्हाला जबरदस्त माघार घ्यावी लागू शकेल. पण त्यामुळे तुम्ही कोसळून न जाता, अपेक्षित ध्येयासाठी कठोर परिश्रम घ्या. ही माघार तुम्ही खुणेच्या दगडाप्रमाणे लक्षात ठेवा. या कठीण प्रसंगी नातेवाईक देखील तुम्हास मदत करतील. पुरातन वस्तू आणि दागदागिन्यांमधील गुंतवणूक फायदा आणि समृद्धी आणेल. मुलांनी अपेक्षापूर्ती न केल्यामुळे तुम्हाला निराशा येईल. तुमच्या स्वप्नपूर्तीसाठी तुम्ही मुलांना प्रोत्साहित करणे गरजेचे आहे. अन्य व्यक्तीच्या नाक खुपसण्यामुळे प्रिय व्यक्तीशी असलेल्या तुमच्या संबंधात दुरावा निर्माण होण्याची शक्यता आहे. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्ही जे काही कष्ट घेत होतात, त्यांचे आज चीज होणार आहे. तुमच्यापैकी काही जण दूरच्या प्रवासासाठी रवाना व्हाल – त्यामुळे तुम्हाला दगदग होईल – परंतु त्यामुळे खूप फायदाही होईल. तुमच्या जोडीदाराच्या वागणूकीचा तुमच्या व्यावसायिक नात्यांवर परिणाम होऊ शकेल.

तुल राशी भविष्य (Tuesday, July 24, 2018)

तुमची ऊर्जा पातळी खूप उच्च आहे आणि ही ऊर्जा तुम्ही प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी वापरली पाहिजे. खर्च करताना पुढाकार घेऊ नका, अन्यथा रिकाम्या खिशाने घरी यावे लागेल. कुटुंबियांसमवेत शांत आणि स्थिर दिवसाचा आनंद घ्या. इतर लोक त्यांचे प्रश्न घेऊन तुमच्याकडे आले तर त्याकडे दुर्लक्ष करा, त्यांना तुमच्या मानसिक स्थितीला धक्का लावू देऊ नका. प्रेमामधील तुमच्या असभ्य वर्तणुकीची माफी मागा. किरकोळ आणि ठोक व्यापाºयांसाठी चांगला दिवस. दूरस्थ ठिकाणाहून एखादी चांगली बातमी संध्याकाळी उशिरापर्यंत येण्याची शक्यता आहे. वैवाहिक आयुष्याकडून आवस्तव अपेक्षा ठेवल्या तर केवळ दु:खी होण्याची शक्यता अधिक.

वृश्चिक राशी भविष्य (Tuesday, July 24, 2018)

समाधानी आयुष्यासाठी आपल्या मनाचा कणखरपणा सुधारा. गुंतवणूक करताना चढउतार खूप घातक ठरू शकतात – म्हणून पूर्ण काळजी घेऊन विचारांती गुंतवणूक करा. शाळकरी प्रकल्पासंबंधी धाकटे तुमच्याकडे सल्ला मागतील. आज तुम्ही तुमची प्रिय व्यक्ती सोबत नसल्याबद्दल खूप खंत कराल. ऑफिसमध्ये व्हिडिओगेम खेळल्यामुळे त्याचे परिमाण तुम्हाला भोगावे लागू शकतात. तुम्ही अवचित काही चुकीचे बोलाल किंवा कृती कराल तर अधिकारी व्यक्ती तुम्हाला समजून घेणार नाहीत. आजच्या दिवशी तुमच्या क्षमता आणि कमतरता दिसून येतील. आजचा दिवस काहीसा कठीण असणार आहे.

धनु राशी भविष्य (Tuesday, July 24, 2018)

नैराश्याच्या जाणीवेला तुमच्यावर हावी होऊन देऊ नका. करमणूक आणि कॉस्मेटिक सुधारणांवर प्रमाणाच्या बाहेर खर्च करू नका. तुमच्या बेफिकीर वृत्तीमुळे पालक काळजीत पडतील. नवीन प्रकल्पात हात घालण्याअगोदर तुम्हाला त्यांना विश्वासात घेण्याची गरज आहे. तुमच्या आयुष्यावर प्रेमाचा वर्षाव होणार आहे. आजुबाजूला काय घडत आहे याची जाणीव ठेवा. आज केलेली गुंतवणूक लाभदायक असेल, पण आपल्या भागीदाराकडून काहीसा विरोध होण्याची शक्यता आहे. पर्यटन आणि प्रवास यामुळे तुम्हाला आनंद मिळेल आणि त्यातून खूप काही शिकायलाही मिळेल. अलीकडच्या काळात तुम्ही आणि तुमचा जोडीदार फार आनंदी नसाल, पण आज मात्र तुम्ही खूप धमाल करणार आहात.

मकर राशी भविष्य (Tuesday, July 24, 2018)

स्वत:बद्दल छान वाटावे अशा गोष्टी घडण्याचा एकदम अद्भूत दिवस. नवीन करार लाभदायक वाटण्याची शक्यता आहे, पण तुमच्या अपेक्षेप्रमाणे लाभ होण्याची शक्यता कमी आहे. पैसे गुंतवताना घाईगडबडीने कोणताही निर्णय घेऊ नका. आपला काही वेळ इतरांना देण्यासाठी चांगला दिवस. तुमच्या स्वप्नातील राजकुमारीशी आज तुमची भेट झाल्यामुळे तुमचा आनंद गगनात मावणार नाही, तुमचे हृदय धडधडेल. तुमच्या कामाच्या ठिकाणी आज तुमची एका छान व्यक्तीशी ओळख होईल. प्रवासाच्या संधी शोधाल. स्त्रिया शुक्रावरच्या असतात आणि पुरुष मंगळावरचे, पण आजच्या दिवशी शुक्र आणि मंगळ एक होणार आहेत.

कुम्भ राशी भविष्य (Tuesday, July 24, 2018)

तुमच्या प्रकृतीची काळजी घ्या. आज तुम्ही जमीन, स्थावर जंगम मालमत्ता, किंवा सांस्कृतिक प्रकल्प यांसारख्या विषयांवर लक्ष केंद्रीत करा. दिवसाची सुरुवात गोड बातमीने होईल. नातेवाईक अथवा जवळचे मित्रमंडळी यांच्याकडून आनंदवार्ता मिळेल. प्रेमामध्ये अनावश्यक मागण्यांसाठी झुकू नका. आजच्या दिवशी कामाच्या ठिकाणी तुम्ही काहीतरी खास करणार आहात. अमर्याद सर्जनशीलता आणि उत्साह तुम्हाला अधिक फायदेशीर दिवसांकडे घेऊन जाईल. एखादा नातेवाईक तुम्हाला सरप्राईझ देईल, पण त्यामुळे तुमची योजना बारगळेल.

मीन राशी भविष्य (Tuesday, July 24, 2018)

आणखी आशावादी राहण्यासाठी स्वत:ला प्रवृत्त करा. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास आणि परिवर्तनशीलता, लवचिकता वाढेल, पण त्याच वेळी भीतीपोटी, चिंतेमुळे निर्माण होणाºया द्वेषमूलक वैरभावाचा त्याग करा. आपली सांपत्तिक स्थिती सुधारली असली, तरी खर्चाचे प्रमाण वाढतच असल्यामुळे तुमच्या योजना राबविण्यात अडचणी निर्माण करेल. कुटुंबाच्या आघाडीवर सारे काही सुरळित असेल, आणि तुमच्या योजनांमध्ये त्यांचा संपूर्ण पाठिंबा तुम्ही अपेक्षित धरू शकता. प्रेम प्रकरणात तुमच्याबद्दल गैरसमज होईल. कामाच्या ताणतणावांचे ढग अजूनही तुमच्या मनात साचल्यामुळे कुटुंब आणि मित्रमंडळींसाठी वेळ देता येणार नाही. दुसºयांना पटवून देण्याच्या क्षमतेमुळे तुम्हाला लाभ होईल. तिऱ्हाईत व्यक्ती तुमच्यात आणि तुमच्या जोडीदारामध्ये भांडण लावून द्यायचा प्रयत्न करेल, पण तुम्ही दोघेही सांभाळून घ्याल.


Show More

Related Articles

Back to top button