Beauty Tips in Marathi

वाढत्या वयाला थांबवा या घरगुती उपायाने, एकदा जरूर वापरून पहा

सुंदर दिसावे असे प्रत्येकाची इच्छा असते आणि आपली सुंदरता टिकवण्यासाठी महिला बाजारातून अनेक प्रोडक्ट्स विकत घेतात. या बाजारातील प्रोडक्ट्स मध्ये अनेक प्रकारचे केमिकल्स असतात जे त्वचेला नुकसान करतात आणि सुंदर होण्याच्या आशेने आपण वापरात असलेले प्रोडक्ट्स आपली स्किन खराब करत असतात. पण आज आम्ही तुम्हाला काही असे नैसर्गिक टिप्स देत आहोत ज्यामुळे आपली त्वचा सुंदर राहील.

गाजर आणि बटाटा

जर आपण आपल्या त्वचेला कायम तरुण ठेवू इच्छित असाल तर बटाटा आणि गाजर ज्यांना खाणे आरोग्यासाठी चांगले मानले जाते, पण हे आपल्या स्किनसाठी देखील तेवढेच फायदेशीर आहे. गाजर आणि बटाटा यांची पेस्ट बनवून लावल्याने आपण तरुण दिसू शकता. गाजर आणि बटाटा आपल्या स्किनची विटामिन A ची कमी पूर्ण करतो.

पद्धत : हा मास्क बनवण्यासाठी गाजर आणि बटाटा उकडवून घ्या आणि त्यांना लहान लहान तुकड्यात कापावे. कापल्या नंतर यांना व्यवस्थित मिक्स करावे सोबतच एक चिमूट हळद आणि बेकिंग सोडा मिक्स करावे आणि तयार झालेली पेस्ट चेहऱ्यावर लावावी. यानंतर २० मिनिटांनी कोमट पाण्याने चेहरा धुवावा. आठवड्यातून २ वेळा हा उपाय केल्याने चेहऱ्या वर झालेला बदल तुम्हाला जाणवेल.

ग्लिसरीन

थंडी मध्ये ग्लिसरीन शरीरावर लावले जाते ग्लिसरीन मध्ये एंटीऑक्सीडेंट असतात जे चेहऱ्या वरील सुरकुत्या कमी करतात. सोबतच हे आपल्या स्किनच्या सॉफ्टनेसला कायम ठेवते. ग्लिसरीन मध्ये मुलतानी माती मिक्स करून देखील तुम्ही चेहऱ्यावर लावू शकता.

ऊस

उसाचा रस उन्हाळ्यात पिणे अत्यंत फायदेशीर असते पण याचे इतर अनेक फायदे आणि वापर आहेत. उसाचा रस आपल्या चेहऱ्यावर लावल्याने आपल्या वाढत्या वयाच्या खुणा कमी होतात. खरंतर उसाचा रस स्किनला हाइड्रेट करते कारण यामध्ये glycolic acid भरपूर प्रमाणात असते.

पद्धत : 3 ते 4 चमचे उसाचा रसामध्ये चिमूटभर हळद मिक्स करावी आणि चेहऱ्यावर लावावे. 10 ते 12 मिनिटांनी चेहरा पाण्याने धुवावा. यामुळे आपला चेहरा तरुण दिसेल.

स्ट्रॉबेरी

स्ट्रॉबेरी खाण्यास जेवढी स्वादिष्ट आहे तेवढीच चांगली आपल्या चेहऱ्याच्या स्किनसाठी आहे. यामध्ये भरपूर प्रमाणात विटामिन C असते. जे चेहऱ्यावरील दाग दूर करून चेहऱ्याला टवटवीत बनवतो.

पद्धत : स्ट्रॉबेरी मास्क बनवण्यासाठी 3-4 स्ट्रॉबेरी मिक्सर मधून पेस्ट बनवून घ्यावी आणि चेहऱ्यावर लावावी. जवळपास 15 मिनिटानंतर पाण्याने चेहरा धुवावा.

दही आणि काकडी

दही आणि काकडी जेवढे आरोग्यासाठी चांगले असते तेवढीच याची पेस्ट चांगली असते. काकडी मध्ये असलेले विटामिन चेहऱ्याला ओलावा देतात सोबतच दही मध्ये असलेले ओक्सीडेंट चेहऱ्यावरील डार्क स्पॉट दूर करून चेहऱ्याला उजळवतात.

पद्धत : फेस मास्क बनवण्यासाठी एक काकडी घेऊन त्याची पेस्ट बनवावी आणि दोन-तीन चमचे दही मिक्स करावे. हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून हलक्या हाताने चेहऱ्यावर लावावे. 10-15 मिनिटांनी चेहरा धुवावा आणि मिळावा सुंदर त्वचा.


Tags
Show More

Related Articles

Back to top button