घरच्या घरी कैची, चाकू-सूरी आणि किसणीला धारदार या पद्धतीने बनवा

आपल्याला दैनंदिन कामामध्ये घरा मध्ये आणि ऑफिस मध्ये वेगवेगळ्या वस्तू कापण्यासाठी कैची आणि चाकू-सूरी यांची गरज पडते. अनेक वेळा काही वस्तू कापताना अचानक आपल्याला जाणीव होते कि आपण जी वस्तू कापण्याचा प्रयत्न करत आहोत ती कापण्यासाठी वेळ लागत आहे आणि त्रास होत आहे. अश्या आपल्याला जाणीव होते कि आपण वापरात असलेल्या कैची किंवा सुरीची धार कमी झाली आहे त्यामुळे वस्तू मनासारख्या झटपट कापता येत नाही. पण अश्या वेळी बाजारामध्ये जाऊन धार लावून घेणे शक्य नसते आणि तेवढा वेळही नसतो. आपल्याला त्वरित त्या क्षणी धार लावून वस्तू कापायच्या असतात. तुमची ही काळजी आज या पोस्ट मध्ये दूर होणार आहे. या पोस्ट मध्ये आपण कैची, चाकू-सूरी आणि किसणीला धारदार बनवण्याच्या पद्धती जाणून घेऊ.

कैचीला धार लावण्याच्या पद्धत जाणून घेऊ

कैचीला धार लावण्यासाठी आपण एक सैंड पेपर घेऊन त्याचे ज्या कैचीला धार लावायची आहे तिच्याने लहान लहान तुकडे कापा यामुळे कैचीला आपोआप सहज धार येईल.

या पद्धती मध्ये आपण एल्युमिनियम फॉयल घ्या ज्यामध्ये आपण अन्न पदार्थ पेकिंग करतो. एल्युमिनियम फॉयल चार पाच वेळा फोल्ड करून जाड बनवा आणि तीचे कैचीने लहान-लहान तुकडे करा यामुळे कैचीला धार चढेल.

पुढील पद्धती मध्ये आपण काचेची बाटली (सॉफ्ट ड्रिंक किंवा सॉसची) घ्या आणि तिच्या तोंडा कडील भाग कैचीने कापण्याचा प्रयत्न करा. लक्षात घ्या काचेची बाटली कापली जाणार नाही पण आपल्या कैचीवर धार येईल.

तसेच कैचीला धार लावण्याची अजून एक पद्धत आहे ती म्हणजे औषधाच्या गोळ्यांची पाकिटे एल्युमिनियम पेकिंग असलेले घ्यावीत ज्यांचे एक्स्पायरी डेट निघून गेली आहे. त्या पाकिटांची कैचीने बारीक बारीक तुकडे करा यामुळे देखील कैचींवर धार येईल.

वरील पैकी कोणतीही एक पद्धत वापरून आपण कैचींवर धार लावू शकता या अगदी सोप्या आणि कोणतेही कष्ट ने घेता कैची धारदार करण्याच्या पद्धती आहेत.

चाकू-सुरीला धारदार करण्याच्या पद्धती

चाकू-सुरीला घरच्या घरी धार लावण्यासाठी हार्डवेअरच्या दुकाना मधून धार लावण्याचा दगड घेऊन यावा आणि जेव्हा चाकू-सुरीची धार कमी झाली असे वाटेल तेव्हा त्या दगडाच्या वर चाकू-सूरी घासून धार लावावी.

चाकू-सुरीला धार लावण्याची दुसरी पद्धत ज्यामध्ये आपण चिनी मातीच्या कप किंवा बशीच्या तळाकडील रफ भागावर चाकू-सूरी घासून त्यांना धार लावू शकता.

किसणीला धारदार करण्यासाठी काय कराल

किसणीची धार तिचा वापर केल्या नंतर हळूहळू कमी होते अश्या वेळी तिला पुन्हा धार लावावी कशी हे आपल्या पैकी अनेकांना माहीत नसेल आणि त्याची कल्पना देखील नसेल. तर आपण किसणीला धार लावण्यासाठी चिनी मातीच्या कप किंवा बशीचा तळाकडील भाग किसणीवर घासावा ६ ते ७ वेळा घासल्याने किसणी धारदार होईल. खालील फोटो मध्ये ज्यापद्धतीने दाखवण्यात आले आहे अगदी तसेच किसणीला धार लावता येते.

वरील माहिती आपल्याला आवडली असल्यास आपल्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये लिहा. तसेच इतर लोकांना माहिती कळण्यासाठी पोस्ट शेयर करा.