Connect with us

हाडांना मजबूत करण्यासाठी घरगुती उपाय

Health

हाडांना मजबूत करण्यासाठी घरगुती उपाय

हाडे शरीराचा मुख्य भाग असतो आणि हाडांचे शक्तिशाली असणे आवश्यक आहे. कैल्शियम, कॉपर इत्यादी अनेक असे पोषक तत्व असतात जे हाडांना मजबूत करतात. या पोषक तत्वांच्या कमीमुळे हाडे कमकुवत होतात. खाद्य पदार्था मध्ये पोषक तत्वांची कमी, शारीरिक कार्य न करणे, तणाव वाढणे इत्यादी समस्यांमुळे हाडे कमजोर होतात. हाडांना मजबूत करण्यासाठी तुम्ही घरगुती उपाय करू शकतात. चला पाहू हाडांना शक्तिशाली बनवण्यासाठी काही घरगुती उपाय.

हाडांची कमजोरी दूर करण्यासाठी घरगुती उपाय

  • टोफू सेवन करणे
  • सूर्य किरणे घेणे
  • पालक ज्यूस
  • एक्सरसाईज
  • विटामिन सी युक्त खाद्य पदार्थ सेवन करणे

टोफू सेवन करणे : टोफू यास सोयापनीर देखील बोलले जाते. यामध्ये मुबलक प्रमाणात कैल्शियम, प्रोटीन आणि विटामिन बी 12 जे हाडांना मजबूत करते ते असते.

सूर्यकिरणे घ्यावीत : सकाळी कोवळ्या सूर्यकिरणांमध्ये हानिकारक युवी किरणे नसतात. सकाळी 10 मिनिट पर्यंत सूर्य किरण घेतल्याने विटामिन डी मिळते. जे कैल्शियमच्या अवशोषणसाठी फायदेशीर असते. यासाठी सकाळी सूर्यकिरणे घेतल्याने हाडे मजबूत होतात.

पालक ज्यूस : हिरव्या पालेभाज्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. पालक मध्ये कैल्शियम आणि मैग्नीशियम मुबलक प्रमाणात असते यासाठी पालक ज्यूस पिण्यामुळे हाडे मजबूत होतात आणि त्यांची कमजोरी दूर होण्यास मदत होते.

एक्सरसाईज : अनेक वेळा फिजिकल एक्तीविटी नसल्याने हाडे कमजोर होतात. दररोज एक्सरसाईज करावी ज्यामुळे शरीर आणि हाडे मजबूत होतात.

विटामिन सी युक्त खाद्य पदार्थांचे सेवन :  विटामिन सी हे एक महत्वाचे एन्टी-ओक्सिडेंट असते जे हाडांच्या विकासामध्ये मदत करतात. विटामिन सी ऑक्सिडेटीव स्ट्रेस कमी करतात आणि हाडांना कमकुवत होण्या पासून वाचवतात. हाडांना मजबूत करण्यासाठी विटामिन सी युक्त खाद्य पदार्थाचे सेवन फायदेशीर असतात.

Trending

Advertisement
To Top