foodhealth

उन्हाळ्यात घामापासून दूर राहण्याचे सोपे घरगुती उपाय

उष्णतेमुळे घामाचा त्रास उन्हाळ्यात जास्त होतो, परंतु हा त्रास काही लोकांची कधीच सोडत नाही. तुम्हालासुद्धा या त्रासाला सामोरे जावे लागत असेल तर घरामध्येच उपलब्ध असलेल्या गोष्टींपासून तुम्ही या त्रासातून मुक्त होऊ शकता.

टोमॅटोचा रस

दररोज एक ते दोन ग्लास टोमॅटोचा रस घ्या. याचे सेवन केल्याने घाम कमी येतो. टोमॅटो अँटीऑक्सीडेंट आहेच त्याचबरोबर हे त्वचेवरील छिद्रांना आकुंचित करते ज्यामुळे घाम कमी येतो. यामुळे शरीराला थंडावा मिळतो.

मीठ आणि लिंबू

एक चमचा मीठ लिंबाच्या रसामध्ये मिसळून हातावर चांगल्याप्रकारे मळून घ्या. हे मिश्रण घाम सोडणाऱ्या ग्रंथीची गती मंद करते आणि यामुळे घाम कमी येईल.

द्राक्ष

दररोज द्राक्ष खाल्ल्याने जास्त घाम येण्याची समस्या दूर होऊ शकते.

कापूर आणि नारळाचे तेल

10 ग्रॅम कापूर नारळाच्या तेलामध्ये टाकून हे तेल जास्त घाम येणाऱ्या ठिकाणी लावावे.

बटाटा

बटाट्याचा तुकडा कापून काखेत आणि जास्त घाम येणाऱ्या ठिकाणी रगडा. हा घाम कमी करण्याचा सर्वात सोपा उपाय आहे.

बेकिंग सोडा

घामामध्ये असलेले अॅसिड सूक्ष्म जीवाणू निर्माण करतात, ज्यामुळे दुर्गंध येतो. यामुळे जास्त घाम येणाऱ्या ठिकाणी थोडासा बेकिंग सोडा लावा. या उपायाने घाम येणार नाही.

योग्य आहार

मॅग्नेशियमचे प्रमाण जास्त असलेले पदार्थ भरपूर खा. उदा. हिरव्या भाज्या, बटाटे, केळी, सफरचंद. शरीरात मॅग्नेशियमची कमतरता हे घाम येण्याचे मोठे कारण असू शकते. तसेच जास्त घाम आल्याने शरीरात उपलब्ध असलेले मॅग्नेशियमसुद्धा कमी होऊ लागते. यामुळे याचे प्रमाण संतुलित ठेवण्यासाठी मॅग्नेशियमचे प्रमाण जास्त असलेले पदार्थ खावेत.

पाण्याचे प्रमाण

सर्वात महत्त्वाचे म्हणजे भरपूर पाणी प्यावे. शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होऊ देऊ नये. एवढेच नाही तर पाण्याप्रमाणे इतर पेय पदार्थांचे सेवन करावे. उदा. फळांचा रस, नारळ पाणी, लिंबू-पाणी आणि हर्बल टी.


Show More

Related Articles

Back to top button