health

रोज सकाळी पोट साफ नाही होत, तर करा हे घरगुती उपाय

आजकालच्या धावपळीच्या युगा मध्ये स्वताची देखभाल करणे कठीण झाले आहे. व्यस्त लाइफस्टाइल मुळे लोकांच्याकडे एवढा वेळ नसतो कि ते स्वताची आणि कुटुंबातील लोकांची काळजी घेऊ शकतील. नोकरी करणारे आणि विद्यार्थी जे एकटे राहतात ते स्वताची काळजी व्यवस्थित घेऊ शकत नाहीत. त्यांच्याकडे एवढा वेळ नसतो कि ते काही चांगले आणि हेल्दी बनवून खावू शकतील. त्यामुळे ते बाहेरील अन्न सेवन करतात. पण यामुळे नकळतपणे त्यांच्या शरीरावर याचा वाईट परिणाम होतो.

चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयीमुळे हळूहळू अनेक प्रकारचे आजार शरीराला घेरतात. पण सर्वात जास्त जी समस्या होते ती बद्धकोष्ठता. ज्यास इंग्रजी मध्ये constipation असे म्हणतात. यामध्ये व्यक्तीचे पोट व्यवस्थित साफ होत नाही आणि पूर्ण दिवस तो वैतागलेला राहतो. पोट साफ न झाल्यामुळे पोट दुखी, अपचन, चिडचिड, बद्धकोष्ठ आणि मुळव्याध सारखे आजार होऊ शकतात. जर तुम्हाला देखील पोट साफ न होण्याची समस्या असेल तर खालील काही घरगुती उपाय करून पहा.

पाणी

व्यक्तीने दररोज 8-10 ग्लास पाणी प्यायले पाहिजे. पाणी आरोग्यासाठी फायदेशीर असते. मुबलक प्रमाणात पाणी पिण्यामुळे अर्धे रोग निघून जातात. जर तुम्ही बद्धकोष्ठने त्रस्त असाल तर तुम्ही दररोज सकाळी उठल्यावर दोन ग्लास गरम पाणी प्यावे. बद्धकोष्ठचे मुख्य कारण शरीरातील पाण्याची कमी आहे. गरम पाणी पिण्यामुळे वेस्ट शरीरातून निघण्यास मदत मिळते. सकाळी सहजपणे तुमचे पोट साफ होईल.

लसून

व्यक्तीने जेवणामध्ये लसून सेवन आवश्य केले पाहिजे. शक्य असल्यास दररोज 2 कच्चे लसून खाण्याची सवय लावून घ्यावी. पण हे कच्चे खाणे थोडे कठीण वाटत असल्यास पदार्थात याचा वापर करू शकता. या व्यतिरिक्त तुम्ही याचे सेवन लोनचे किंवा चटणी करून देखील करू शकता. लसून मल मुलायम करते आणि सहज आतड्यातून बाहेर काढण्यास मदत करते. यामध्ये असलेले एंटीइंफ्लेमेशन गुण पोटाची सूज पण कमी करतो.

मेथी

मेथी देखील बद्धकोष्ठची समस्या दूर करते. यासाठी तुम्ही रोज झोपण्यापूर्वी एक चमचा मेथीचे चूर्ण कोमट पाण्यात मिक्स करून घ्यावे. यामुळे तुमचे पोट साफ होण्यास मदत होईल. तसेच तुम्ही दररोज दही खाण्याचा प्रयत्न करा. दही तुमच्या पोटातील फायदेशीर बैक्टीरियाची कमी दूर करेल.

वर दिलेल्या माहितीची सत्यता आमच्या कडून पडताळण्यात आलेली नाही तसेच वरील माहिती सत्य असल्याचा कोणाही दावा आम्ही करत नाही याची कृपया वाचकांनी नोंद घ्यावी. वरील माहिती एका प्रसिद्ध वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या पोस्टचा मराठी अनुवाद आपल्या मनोरंजनासाठी येथे प्रकाशित करण्यात आला आहे.

वाचकांनी वरील माहितीचा प्रत्येक्ष वापर करण्याच्या अगोदर सत्यता पडताळून घ्यावी ही विनंती. marathigold.com यापासून होणाऱ्या कोणत्याही प्रत्येक्ष आणि अप्रत्यक्ष फायद्यास किंवा नुकसानीस जबाबदार राहणार नाही.


Show More

Related Articles

Back to top button