People

भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता? हॉकी, हे उत्तर सांगू नका कारण हे उत्तर चुकीचे आहे

तुम्ही आज पर्यंत अनेक सामान्यज्ञानाच्या पुस्तकात भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकी असे वाचले असेल. पण ते उत्तर चुकीचे आहे. मग बरोबर उत्तर काय हे आज येथे आम्ही तुम्हाला सागत आहोत.

भारताला हॉकीने आता पर्यंत ऑलम्पिक मध्ये 8 सुवर्णपदक आणि एक वेळा विश्व कप विजेता बनवले आहे पण तुम्हाला सांगू इच्छितो की भारताला एवढी प्रतिष्ठा मिळवून देणारा हा खेळ आपला राष्ट्रीय खेळ नाही आहे. हे आम्ही नाही तर भारत सरकारचे खेल मंत्रालय म्हणत आहे.

एका आरटीआई चे उत्तर देताना खेल मंत्रालयाने हे स्पष्ट केले आहे की भारताचा राष्टीय खेळ हॉकी नाही. पण भारत सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर राष्ट्रीय खेळ शिर्षका खाली भारतीय हॉकीची यशोगाथा लिहिली आहे. तरीही खेल मंत्रालय भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकी आहे असे म्हणत नाही आहे.

झाले असे की लखनऊच्या 10 वर्षाच्या ऐश्वर्य पाराशर ने प्रधानमंत्री कार्यालय ला आरटीआई पाठवून राष्ट्रगीत, गीत, खेळ, पक्षी, पशु, फुल आणि प्रतीक यांच्या घोषणेच्या आदेशाची प्रत मिळण्याची मागणी केली होती. त्याचे प्रश्न गृह मंत्रालय कडे पाठवले गेले ज्यामधील राष्ट्रीय खेळ संबंधीचा प्रश्न त्यांनी खेल मंत्रालयकडे पाठवला.

उत्तर देताना खेल मंत्रालयचे अवर सचिव शिवप्रताप सिंह तोमर यांनी ऐश्वर्य ला उत्तर दिले की सरकार ने कोणत्याही खेळाला राष्ट्रीय खेळाचा दर्जा दिलेला नाही आहे.

याचा अर्थ असा होतो की हॉकी भारताचा राष्ट्रीय खेळ नाही. ही एक मोठी शोकांतिकाच म्हणावी लागेल कारण एवढ्या मोठ्या भारत देशात जेथे अनेक खेळ खेळले जातात पण त्यातील एकाही खेळला राष्ट्रीय खेळ म्हणून घोषित करण्याची तसदी कोणत्याही सरकारने अजून पर्यत घेतली नाही आहे.

ही पोस्ट जास्तीत जास्त शेअर करा आणि समजुद्या सर्वांना आज पर्यंत काँग्रेस सरकार आणि आता भाजप सरकार किती कार्यशील आहे की त्यांना अजून पर्यंत आपल्या राष्ट्रीय खेळाची घोषणा करता आली नाही आहे.


Show More

Related Articles

Back to top button