health

हिवाळ्यात अंघोळ करण्याचे टाळल्यामुळे होतात हे पाच मोठे नुकसान

दररोज अंघोळ केल्यामुळे फक्त शरीर स्वच्छ नाही होत तर आपले मन देखील उत्साहित राहते आणि तुम्ही नेहमी निरोगी राहता. खरतर निरोगी राहण्याचा सगळ्यात उत्तम मार्ग म्हणजे दररोज अंघोळ करणे. परंतु कधी कधी असे होते कि नियमित दिनचर्या टाळून किंवा काही कारणामुळे तुम्ही अंघोळ करत नाहीत पण तुम्हाला माहित आहे का अंघोळ केली नाही तर यामुळे आपल्याला अनेक नुकसान होऊ शकतात.

लोक उन्हाळ्याच्या दिवसात तर दररोज अंघोळ करतात पण थंडीच्या दिवसात रोज अंघोळ करणे सगळ्यांसाठी संभव होत नाही कारण लोक थंडी पासून वाचण्यासाठी अंघोळ करत नाहीत, एवढेच नाही तर काही लोक असे देखील असतात जे थंडीच्या मौसमा मध्ये एक-एक महिना देखील अंघोळ करत नाहीत, पण कदाचित त्यांना माहित नाही कि दररोज अंघोळ केली नाही तर आपल्याला पाच प्रकारचे नुकसान होऊ शकतात.

थंडीच्या दिवसात (हिवाळ्यात) अंघोळ नाही केल्यास होणारे नुकसान

दररोज अंघोळ न केल्याने होणारा पहिला नुकसान म्हणजे आपल्या शरीराची स्वच्छता साफसफाई होत नाही कारण आपण दररोज बाहेर निघतो आणि रोज आपल्या शरीरावर धूळ-माती जमा होत असते. ज्यामुळे आपल्या शरीरावर धूळ मातीचा एक थर तयार होत असतो आणि जर तुम्ही याकडे दुर्लक्षित अंघोळ केली नाही तर शरीरावर बैक्तीरीया तयार होतात आणि आपल्याला वेगवेगळ्या समस्या जसे पूर्ण शरीरावर खाज सुटणे किंवा लाल रंगाचे रैशेज होणे इत्यादी समस्या होऊ शकतात.

शरीरावर बैक्टीरिया होणे स्कीनसाठी हानिकारक असते. धूळमातीमुळे आपल्या शरीरावर उत्पन्न झालेले बैक्टीरिया पिंपल्स पासून ते इन्फेक्शन आणि इतर त्वचारोग घेऊन येतात आणि हे शरीराच्या आतील आजारासाठी देखील कारणीभूत होऊ शकतात. त्यासाठी त्वचारोगाच्या समस्ये पासून वाचण्यासाठी दररोज स्नान केले पाहिजे.

लोकांचे असे मानाने आहे कि हिवाळ्यात अंघोळ न केल्यामुळे थंडी पासून वाचता येते किंवा थंडी मध्ये होणाऱ्या आजारा पासून वाचता येऊ शकते परंतु हा विचार चुकीचा आहे कारण अंघोळ न केल्यामुळे आजारापासून वाचता येत नाही तर आजारांना आमंत्रण दिल्या सारखे असते. त्यामुळे आपल्या दिनचर्या प्रमाणे दररोज अंघोळ केली पाहिजे आणि आजारांपासून वाचले पाहिजे.

थंडीच्या दिवसात अंघोळ केली नाही तर शरीरातून घाम येणे बंद होईल पण शरीरातून दुर्गंधी येणे बंद होऊ शकत नाही. यासाठी थंडीच्या दिवसात देखील दररोज अंघोळ करून स्वताला फ्रेश ठेवा आणि हिवाळ्यात होणाऱ्या समस्यांपासून दूर राहा.

हिवाळ्याच्या दिवसात अंघोळ न केल्यामुळे हजारो बैक्टीरिया आणि अनेक प्रकारचे फंगस इन्फेक्शन होऊ शकतात. यासाठी थंडीच्या दिवसात आपल्या स्वच्छतेकडे लक्ष द्यावे. त्यासाठी दररोज अंघोळ करणे आवश्यक आहे. खरतर दररोज अंघोळ केल्यामुळे शरीर स्वच्छ राहते, मन प्रसन्न राहते ज्यामुळे कोणतेही काम करताना उत्साह वाटतो पण याच्या विरुध्द अंघोळ केली नाही तर आळस वाटतो आणि कामामध्ये देखील मन लागत नाही.


Show More

Related Articles

Back to top button