foodhealth

हीमोग्लोबिन ची कमी वेगाने दूर करणारे 10 सर्वात शक्तिशाली उपाय

हीमोग्लोबिनच्या कमी मागे सर्वात महत्वाचे कारण हे पौष्टिक आहार कमी खाणे हे मानले जाते. रक्तात हीमोग्लोबिनची कमी बऱ्याच वेळा तेव्हा होते जेव्हा रक्तात आयरनची कमी होते. हीमोग्लोबिनची कमी ही एक अशी समस्या आहे ज्यामुळे इतर अनेक समस्या होण्याची भीती वाढते.

तसे काही आजाराच्यामुळे देखील रक्तामध्ये हीमोग्लोबिनची कमी होऊ शकते.

रक्तामध्ये हीमोग्लोबिनची कमी असण्याचे सामान्य लक्षणे

नखे पातळ, खरबडीत आणि चपटे होतात तसेच त्यामध्ये लांबलांब रेषा दिसू शकतात.

डोकेदुखी राहणे.

श्वास घेण्यात त्रास होणे किंवा दम लागणे.

चक्कर येणे हे एनीमिया ग्रस्त व्यक्ती सामान्यपणे दिसणारे लक्षण आहे.

रक्ताची कमी किंवा एनीमिया मध्ये हृदयाचे ठोके वाढतात आणि चिडचिडा स्वभाव होऊ शकतो.

छाती मध्ये कमी किंवा जास्त दुखणे किंवा छातीत चमक येणे.

त्वचा आणि नखे पिवळे पडणे.

डोळ्यांचे पिवळे पडणे.

हीमोग्लोबिन ची कमी दूर करण्याचे आयुर्वेदिक घरगुती उपाय

अंजीर : 3 ते 5 अंजीर दुधामध्ये उकळवून किंवा अंजीर खाऊन दुध पिण्यामुळे हीमोग्लोबिनची मात्रा वेगाने वाढते.

बीट रूट : शरीरात हीमोग्लोबिनचा स्तर वाढवण्यासाठी बीट रूट सर्वात चांगला खाद्य पदार्थ आहे. बीटरूट पोषक तत्वांनी भरपूर आहे. यामध्ये आयरन, फोलिक एसिड, फाइबर आणि पोटेशियम हे सर्व योग्य प्रमाणात असते. हे शरीरातील लाल रक्त कोशिकांची संख्या वेगाने वाढवतो.

तीळ : दोन तास 2 चमचे तीळ पाण्यात भिजत ठेवा आणि नंतर पाणी गाळून त्याची पेस्ट तयार करा. आता यामध्ये 1 चमचा मध मिक्स करा आणि दिवसातून 2 वेळा सेवन करा.

अश्वगंधा : 1 ते 2 ग्राम अश्वगंधा चूर्ण आवळ्याच्या 10 ते 40 मिलीग्राम रसाच्या सोबत घेण्यामुळे हिमोग्लोबिन स्वर वाढतो.

किसमिस : एक ग्लास पाण्यामध्ये 1 लिंबूचा रस पिळून त्यामध्ये 20 ते 25 किसमिस रात्री भिजत ठेवा. सकाळी गाळून पाणी प्यावे आणि किसमिस चावून खावेत. हा एक अद्भुत शक्तिशाली प्रयोग आहे.

डाळिंब : डाळिंब हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी फार फायदेशीर आहे. डाळिंब मध्ये आयरन आणि कैल्शियम सोबत प्रोटीन, कार्बोहाईड्रेट आणि फाइबर असते, यामुळे शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढण्यास मदत होते.

हळद : संध्याकाळी गरम पाण्यात दोन चिमुट हळद टाकून पिण्यामुळे शरीर नेहमी निरोगी आणि बलवान राहते तसेच हा प्रयोग हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवण्यास मदत करते.

जांभूळ : जांभळाचा रस आणि आवळ्याचा रस सम प्रमाणात मिक्स करून पिण्यामुळे हिमोग्लोबिनचा स्तर वाढतो.

गुळ : गुळाचे सेवन करणे हा देखील एक अत्यंत उत्तम प्रयोग आहे. गुळामध्ये आयरन फोलेट आणि अनेक विटामिन बी शामिल आहेत जे हिमोग्लोबिन स्तर वाढवण्यासाठी आणि लाल रक्त कोशिका निर्मितीसाठी मदत करतो.

आवळा : विटामिन सी ची कमी झाल्यामुळे देखील हिमोग्लोबिनचा स्तर कमी होतो. जेव्हा शरीरात विटामिन सी ची कमी असते तेव्हा याचे कारण तुमचे शरीर योग्य प्रकारे आयरन शोषण करत नाही आहे. यासाठी विटामिन सी भरपूर असलेले खाद्यपदार्थ सेवन केल्याने हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते. विटामिन सी ची कमी दूर करण्याचा सर्वात सोप्पा आणि चांगला उपाय आहे आवळा. याचा वापर तुम्ही चटणी आणि मुरंबा करून देखील करू शकता. याच्या नियमित सेवनामुळे हिमोग्लोबिनचा स्तर वेगाने वाढतो.

अत्यंत महत्वाची सूचना : फेसबुकच्या नवीन नियमानुसार आमचे पेज आता तुमच्या न्यूज फीडवर अतिक्षय कमी दिसणार आहे त्यामुळे आमच्या नवीन पोस्ट तुमच्या पर्यंत पोहोचणे शक्य होणार नाही यासाठी जर तुम्हाला आमचे लेख आवडत असतील तर कृपया आमचे एंड्राइड एप्प आजच डाउनलोड करा त्याची लिंक खाली दिली आहे.

Marathi Gold Android Application Download Link

लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका

वाचा : सावधान… जर तुम्ही जेवल्यानंतर लगेच पाणी पीत असाल तर आधी हे वाचा


Show More

Related Articles

Back to top button