Connect with us

5 फायदे आहेत आरोग्यासाठी अक्रोड खाण्याचे

Food

5 फायदे आहेत आरोग्यासाठी अक्रोड खाण्याचे

अक्रोड आरोग्यदायी गुणांनी भरपूर असते. याच्या बिया मध्ये प्रोटीन, कार्बोहाइड्रेट, विटामिन आणि एसेंशियल मिनरल आरोग्यासाठी फायदेशीर असते. अक्रोडला ब्रेन फूड पण म्हंटले जाते. कारण अक्रोडचा आकार मेंदूच्या आकारा सारखा असतो. याच कारणामुळे अक्रोडला बुद्धीचे प्रतीक बोलले जाते. अक्रोड मध्ये ओमेगा-3 फैटी एसिड असते जे डोक्याच्या एक्टीविटी वाढवण्यास मदत करते. याच सोबत अक्रोड मध्ये एंटीऑक्सीडेंट आणि प्रोटीन असते जे आरोग्यासाठी फायदेशीर असते. चला पाहू अक्रोडचे आरोग्याला होणारे फायदे.

हाडे मजबूत करतो

अक्रोड मध्ये असलेले एसेंशियल फैटी एसिड हाडांना निरोगी ठेवण्यास मदत करतो. हे हाडांमध्ये कैल्शियमला शोषून घेते आणि एकत्रित करण्यासाठी मदत करते. सोबतच युरीनच्या माध्यमातून कमी प्रमाणात कैल्शियम निघून देते.

मेटाबॉल्जिम मध्ये सुधारणा करतो

अक्रोडच्या सेवना मुळे मेटाबॉल्जिम मध्ये सुधारणा होते. अक्रोड मध्ये असलेले एसेंशियल फैटी एसिड आणि मैग्निशियम, कॉपर, कैल्शियम, आयरन, जिंक असे खनिज तत्व असतात जे शरीरासाठी फायदेशीर असतात. हे खनिज पचनक्रिये मध्ये वाढ आणि विकास करण्यास मदत करते.

वजन वाढवण्यासाठी

अक्रोड मध्ये चांगल्या प्रमाणात कैलोरी, कार्बोहायड्रेट्स असतात जे वजन वाढवण्यासाठी मदत करतात. 28 ग्राम अक्रोड मध्ये 18 ग्राम फैट, 190 कैलोरी आणि 4 ग्राम कार्बोहायड्रेट्स असतात जे वजन वाढवण्यासाठी फायदेशीर असतात.

त्वचेची सुरक्षा

अक्रोड विटामिन इ चे अतिशय चांगले स्रोत असते. जे एक लिपिड विरघळणारे एंटीऑक्सीडेंट आहे. अक्रोड मध्ये असणारे विटामिन इ त्वचेला हानिकारक फ्री रेडीकल पासून सुरक्षित ठेवते. विटामिन ई सोबत अक्रोड मध्ये विटामिन के, फोलेट आणि विटामिन बी 6 असते.

हृदय गतीविधी सुधारते

अक्रोड मध्ये चांगल्या प्रमाणात ओमेगा-3 आणि भरपूर प्रमाणात फैटी एसिड असते. वैज्ञानिक अभ्यासाच्या अनुसार अक्रोडचे सेवन केल्यामुळे हृदय गतीविधी मध्ये सुधार आणली जाऊ शकते. रोज 25 ग्राम अक्रोड खाण्यामुळे तुम्हाला दिवसाला जेवढ्या एसेंशियल फैटी एसिडची गरज असते तेवढी पूर्ण केली जाऊ शकते.

तुम्ही हा लेख marathigold.com वर वाचत आहात. तुम्हाला हा लेख आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा. धन्यवाद.

Continue Reading
You may also like...

Trending

Advertisement
To Top