health

कापूर वापरणाऱ्या 99% लोकांना माहित नसतील याचे 10 अदभूत फायदे, जाणून घ्या

सर्वसाधारण पणे कापूर हा घरामध्ये आपण पूजेसाठी वापरतो. पण आयुर्वेद मध्ये याचे अनेक फायदे सांगितले आहेत. कापूर तुम्हाला अनेक प्रकारच्या आजरा पासून सुटका मिळवून देऊ शकतो. कापूर त्वचा आणि मासापेशीची सूज कमी करतो. जुन्या सांधेदुखी पासून सुटका मिळवण्यासाठी कापूर उपयोगी औषध आहे. कापूरचे तेल फार फायदेशीर असते. कापराचा उपयोग अनेक औषधांमध्ये पण केला जातो. कापुरा पासून अनेक मलम बनवले जातात. चला पाहूयात कापूर पासून होणारे फायदे.

पोट दुखी : एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा ओवा टाकून उकळवणे. पाणी अर्धे राहील तेव्हा त्यामध्ये थोडेसे कापूर टाकून प्यावे. पोट दुखी मध्ये लवकर आराम मिळतो.

सांधेदुखी : सांधेदुखी किंवा मसल्स वेदनेच्या समस्या असेल तर वेदना असलेल्या जागी कापूरच्या तेलाने मालिश करावी. लवकर आराम मिळतो.

खाज येणे : त्वचेला खाज येत असेल किंवा फंगल इन्फेक्शन झाले असेल तर प्रोब्लेम असलेल्या जागी नारळाच्या तेला मध्ये कापूर टाकून लावल्यास आराम मिळतो.

भाजल्या वर : भाजल्यावर कापूर किंवा कापराचे तेल लावावे. त्वचेची जळजळ कमी होईल आणि इन्फेक्शनची भीती कमी होईल.

इन्फेक्शन पासून बचाव : घरामध्ये कापराचा धूर केल्यास आजूबाजूला असलेले बैक्तीरीया नष्ट होतात. यामुळे इन्फेक्शन करणाऱ्या बैक्तेरीयाचा धोका कमी होतो.

हेल्दी हेयर : नारळाच्या तेला मध्ये कापूर मिसळा. याला कोमट करून डोक्याला मालिश करा आणि एक तासाने डोके धुवून टाका. यामुळे डैंड्रफ प्रोब्लेम संपेल आणि केस मजबूत होतील.

त्वचे वरील डाग : कापूर मिक्स केलेले नारळाचे तेल रोज पिम्पल्स, जळलेले किंवा कापलेले डाग वर लावा. काही दिवसातच डागांच्या खुणा नाहीश्या होतील.

टाचांच्या भेगा : कोमट पाण्यामध्ये थोडेसे कापूर आणि मीठ टाका. यामध्ये थोडावेळ पाय बुडवा आणि नंतर स्क्रब करून मोइश्च्राइजर क्रीम लावा. टाचांच्या भेगा दूर होतील.

स्ट्रेस : ऑलिव ऑइल मध्ये कापूर मिक्स करून डोक्याला मालिश करा. स्ट्रेस आणि डोकेदुखी दूर होईल.

दात दुखी : दात दुखी होत असेल तर दुखत असलेल्या जागेवर कापूर पावडर करून टाकावी. लवकर आराम मिळेल.

सर्दी : सर्दी झाली असल्यास तिळाच्या तेला मध्ये किंवा नारळाच्या तेला मध्ये कापूर टाकून चेस्ट आणि डोक्यावर लावा. तसेच पाण्यामध्ये टाकून याची वाफ घ्या आराम मिळेल.

लूज मोशन : कापूर, ओवा, पिपरमेंट सम प्रमाणात घेऊन काचेच्या भरणीत भरा. याला उन्हा मध्ये ठेवा. 6-8 तासानंतर उन्हातून काढून घ्या. तयार मिश्रणचे 4-5 थेंब टाकून सरबत बनवून प्यावे. आराम मिळेल.


Show More

Related Articles

Back to top button