health

गरिबांच्या घरचा डॉक्टर गुलवेल सर्व प्रकारचे ज्वर, मधुमेह, रक्तदाब इत्यादी रोगांवर औषधी आहे

गुलवेल (गिलोय) ही एक वेल असते. जिचे पाने खायच्या पानांसारखी असतात. आयुर्वेद मध्ये गुलवेल तापावरील उत्तम औषधी मानली गेली आहे. गुलवेलीचा रस पिण्यामुळे शरीरातील विविध प्रकारचे आजार दूर होतात. गुलवेलच्या पानांमध्ये कैल्शियम, प्रोटीन तसेच फॉस्फोरस असते. ही वात, कफ आणि पित्त नाशक असते. गुलवेल आपल्या शरीराची रोगप्रतीशोधक शक्ती वाढवण्यास मदत करते.

या मध्ये विविध प्रकारचे एंटीबायोटीक तसेच एंटीवायरल तत्व असतात जे शारीरिक आरोग्यास लाभ देतात. ही गरीबाच्या घरातील डॉक्टर आहे कारण ग्रामीण भागात ही सहज उपलब्ध आहे.

गुलवेल मध्ये नैसर्गिक पद्धतीने शरीरातील दोष कमी करतो. गुलवेल एक महत्वाची आयुर्वेदिक जडीबुटी आहे. गुलवेल वेगाने वाढणारी वेल आहे. गुलवेलच्या फांद्यांना देखील औषधी म्हणून वापरले जाते. गुलवेल ही जीवनशक्ती ने भरपूर असते कारण या वेलीचा एखादा छोटासा तुकडा पण जर जमिनीत लावला तर त्याची मोठी वेल होण्यास वेळ लागत नाही.

गुलवेल आपल्या लीवर तसेच किडनी मध्ये असणारे विषारी पदार्थ बाहेर काढण्याचे काम करते. गुलवेल आपल्या शरीरात आजारामुळे होणाऱ्या किटाणूचा सामना करतात आणि लीवर तसेच मुत्र संक्रमणा पासून आपल्या शरीराची सुरक्षा करतात.

गुलवेल दीर्घकाळा पासून येत असलेला ताप (ज्वर) बरे करण्यास मदत करते. गुलवेल मध्ये तापाचा प्रतिकार करण्याचे गुण असतात. ही आपल्या रक्तातील प्लेटलेट्स ची मात्रा वाढवते जे कोणत्याही प्रकारच्या तापा सोबत लढण्यास मदत करते. डेंगू सारख्या तापात देखील गुलवेलचा रस अतिक्षय उपयोगी ठरला आहे. मलेरियाच्या उपचारासाठी गुलवेलचा रस आणि मध सम प्रमाणात रुग्णास दिले गेल्यास मलेरियाचा इलाजामध्ये मदत मिळते.

गुलवेल आपले पाचनतंत्र सुधारते. विविध प्रकारचे पोटा संबंधीचे आजार दूर करण्यासाठी गुलवेल प्रसिध्द आहे. आपले पाचनतंत्र नियमित करण्यासाठी एक ग्राम गुलवेल पावडर मध्ये थोडीशी आवळा पावडर मिक्स करून नियमित घेतल्यास चांगला फायदा मिळतो.

मुळव्याध म्हणजेच पाइल्सच्या रुग्णांना जर गुलवेलचा थोडासा रस ताका सोबत मिक्स करून दिल्यास रुग्णाला आराम मिळतो.

जर तुमच्या रक्तात साखरेचे प्रमाण वाढले असेल तर गुलवेलचा रस नियमित घेतल्यामुळे हे प्रमाण कमी होते. म्हणजेच गुलवेल मधुमेहा मध्ये फायदेशीर आहे.

हाई ब्लडप्रेशर मध्ये सुध्दा गुलवेल फायदेशीर आहे. गुलवेल शरीराचा रक्तदाब नियमित करते.

लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका

वाचा : फक्त 15 मिनिटांचा हा प्रयोग 350 असाध्य रोग नष्ट करतो, मग ते कैंसर, किडनी फेल, सांधेदुखी, लिवर सर्वावर एकमेव गुणकारी उपाय


Show More

Related Articles

Back to top button